गुरुवार, २५ जून, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहील." 

भाग - नववा

आत्मगीते

शब्द आणि कृती यातील अंतर - अनेक मौलांचे 
हृदय आणि पाषाण यातील अंतर - मोहरीएवढे 
क्षुल्लक लाभासाठी करिती जन शुचितेचा त्याग 
निराश्रिताचे दुःख भोगते मी या मानवी जीवनात.

           लोकांचे उच्चार आणि कृती यांमध्ये एकसूत्रता नसते. ते पाषाणहृदयी असतात, क्षुल्लक लाभासाठी शुचितेचा त्याग करतात. माझ्या मुक्तीसाठी मी परमेश्वराचा धावा करते आहे. या क्रूर जगतात मला शांतीचा लवलेशही दिसत नाही. 

*

तिरुकण्णापुरामचा ईश्वर 

वयाच्या पाचव्या वर्षात मी करिती पदार्पण 
स्थापिलेस मम हृदयी तू तव दिव्य चरण 
बालपणी दिलेस अन् तारुण्यात झाकलेस 
रूप तव धगधगते मम हृदयी निखाऱ्यासम 
अंतसमयी तरी देशील का मज ताव चरणांचे दर्शन ? 

          माझा जन्म ईशचिंतनात का झाला ? मी तारुण्यात अन्य व्यतींशी विवाह का केला ? भगवंताचे रूप माझ्या हृदयात निखाऱ्यासारखे धगधगते आहे. काळ सरतो आहे. माझे रुदन चालूच आहे. ' किमान माझ्या अंतसमयी तरी मला त्यांच्या चरणांचे दर्शन होणार नाही का ?'
*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा