रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपलें भाव रूप धारण करून आपले जीवन बनतात."

भाग - नववा 

आत्मगीते 

राजाधिराज साईश्वर 

सामराज्यात त्यांच्या ऐश्वर्य अपार 

नसे कामना मज त्या ऐश्वर्याची 

मोल न मज त्या धनसंपदेचे 

हे विश्व आहे स्वयंप्रकाशिताचे, स्वयंप्रकाशिताचे

*

हे प्रभू, 

मेघ दर्शवितो ताव दिव्य रूप 

गीतात माझ्या उमटते तुझी दिव्य प्रीत 

उमलोनी सुमने देती जगतास तव सुगंध

बहरात प्रतिबिंबीत सुमुखमंडल तुझे 

पाहते मी दिव्य रूप तुझे आप तेज वायू आकाशात 

बद्ध आहे प्रेम आपुले सदा, सर्वकाळ, सर्वत्र 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " जेव्हा भक्त केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा शोध घेत येतो. "

भाग - नववा 

आत्मगीते 

नेत्र माझे आतुरले त्यांच्या दर्शनास 

विस्मरण होई मज स्थळकाळाचे त्यांच्या चिंतनात 

लागली आस त्यांचे ऐश्वर्य पाहण्याची 

मार्ग कधी गवसणार मज पर्तीचा ?

*

अक्षय्य आनंदाची होईल पहाट 

विरून जातील दुःख आणि भोग 

करेल ईश्वर करुणा वर्षाव 

भरभरून होईल अनंत हस्ते 

नाहीसे होईल कर्माधिष्ठित जीवन,

लक्ष लक्ष जन्म आणि कर्म भोग 

आपुले प्रिय प्रभू, साईश्वर !

अवतरले भूतलावर 

करण्या आपुले भवभय हरण 

वेढीतसे जगा त्यांच्या कृपेचा महापूर 

करीत आपुली बुद्धी तल्लख 

त्यांच्या आनंदाचे पोवाडे गाते मी सर्वांसाठी 

मोहक रूप त्यांचे घालीते मोहिनी. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपण इथेच, याक्षणी मुक्ती प्राप्त करू शकतो. "

भाग - नववा 

आत्मगीते 

पाठलाग का तू करिसी माझा 

तव चिंतनात मग्न मी 

दयामाया नाही का तुज, साईदेवा?

अंगाईसम भासे का तुज, माझे आक्रंदन 

ऐकून न ऐकतोस तू, माझे करुण रुदन 

अभिषेक अश्रूंचा करिते मी तव चरणांवर 

अन्य कोण आहे मज तुझ्याविना 

आनंद नसे मना अन्य कशात 

संध्या छाया भिववीत हृदया 

ये, प्रभूवरा ये ! 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम  

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३२  

ध्यान 

वसंता : स्वामी, दर्शनामध्ये तुम्ही त्या विकलांग मनुष्याला पाहून मागे सरलात आणि त्याला तुमच्या चरणांना स्पर्श करू दिला नाहीत, असे का ?

स्वामी : परमेश्वर साक्षीभावात असतो. तो इतरांच्या कर्मात हस्तक्षेप करत नाही. त्याने स्वतः निर्माण केलेले कायदे तो मोडत नाही. तू येथे कर्मामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आली आहेस. कर्मांचे संतुलन करण्यासाठी तू दुःख भोगते आहेस समस्त असूर वंशाचा नाश करण्यासाठी रामाची शक्ती त्याच्यापासून दूर झाली. आपल्या वियोगाद्वारे सर्व कर्मांचा नाश होत आहे. 

ध्यान समाप्ती 

           १९९८ सालची गोष्ट आहे. दर्शनाचे वेळी साई कुलवंत हॉलमध्ये पाठीला  कुबड असलेला एक मनुष्य पहिल्या रांगेत बसला होता. स्वामी त्याच्या जवळून जात असताना त्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ स्वामी मागे सरकले व त्याच्या कडे नापसंतीदर्शक कटाक्ष टाकून त्याला ' चरणांना स्पर्श करू नकोस ' असा हाताने इशारा केला. त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने हा प्रसंग मला कथन केला. मी स्वामींना ह्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले," परमेश्वर इतरांच्या कर्मात हस्तक्षेप करत नाही तो केवळ साक्षीभावात असतो. 

           त्या मनुष्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला असता तर कदाचित त्याची कर्म कमी झाली असती. हे घडणे स्वामींना मान्य नव्हते. परमेश्वर कधीही कोणाच्याही कर्मांमध्ये हस्तक्षेप करत नाही. एखाद्यावर विशेष कृपा करायची असेल तर कधीतरी तो त्याच्या कर्मांमध्ये बदल करतो. केवळ परमेश्वर सर्वांच्या कर्मांचा हिशेब जाणतो.

           परमेश्वराची शक्ती म्हणून मी अवतरलेय. मी कर्मांमध्ये बदल घडवू शकत नाही. वा कर्म संहार करू शकत नाही. मी केवळ माझ्या स्थूल देहावर त्यांच्या पीडा  (क्लेशां) घेऊन कर्मे समतोल करू शकते. यासाठीच मी दुःख भोगते आहे, आणि स्वामीसुद्धा दुःख भोगत आहेत. 

         आम्ही शारीरिक दुःख भोगत आहोत तसेच ह्यावेळी हे वियोगाचे दुःख हृदय पिळवटून टाकणारे आहे ह्या अतीतीव्र दुःखाद्वारेच सर्वांच्या कर्माचा हिशेब चुक्ता होईल. वियोग अश्रू आणि मीलनाची आस हयामुळे कर्मसंहार होऊन वैश्विक मुक्ती साध्य होते. मी माझ्या अनेक पुस्तकांमधून लिहिले आहे. माझे भाव स्तूपाद्वारे बाहेर पाठवले जातात आणि विश्व परिवर्तन घडते. हे लोकांमधील परिवर्तन आहे, संहार नव्हे ह्याच कारणामुळे सध्या दुःखाची तीव्रता अधिक आहे. असे हे विशेष अवतार कार्य पूर्वीच्या अवतारांनी कधीही केले नव्हते. प्रेमावतार पुस्तकात, हा अवतार कसा विशेष आहे, हे स्वामींनी स्पष्ट केले आहे. स्वामी म्हणतात, 

           " देवतेच्या निर्मितीतत्वांच्या  पलीकडे जाऊन तू स्वतःची निर्मिती करत आहेस. 

           उदाहरणार्थ सीतेने मायावी मृग आपल्याला हवा अशी इच्छा केली. तू ह्या क्षुल्लक इच्छेविना स्वतःस तयार करत आहेस. अशा प्रकारे रूक्मिणी, सत्यभामा, दाक्षायिणी आणि इतर देवतांमधील छोट्या छोट्या दोषांविना तू पावित्र्याची परिपूर्ण शिल्पकृती साकारत आहेस. तू निर्दोष महाशक्ती अवतार म्हणून स्वतःस निर्माण करत आहेस, ह्या विश्वाने पूर्वी कधीही पाहिले नाही असे देवता तत्व तू दाखवून देत आहेस. देव देवतांनीही कधी कल्पना केली नसेल असे तुझे पातिव्रत्य श्रेष्ठतम आहे. 

          प्रेम साई अवतारात तुला साजेसे माझे रूप तू साकारत आहेस. राम, कृष्ण आणि सत्य साई ह्यांच्यामधील दोष दूर करून तू प्रेम साई अवतार घेऊन येत आहेस. पुढील अवतार काळात सार काही परिपूर्ण असेल. प्रेम साई अवतार एक परिपूर्ण अवतार असेल. त्याचे प्रेम निर्दोष व परिपूर्ण असेल ! " 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' चैतन्य ' ह्या पुस्तकातून 


जय साईराम 

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करून सर्व इच्छावासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि नंतर स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे." 

भाग - नववा 

आत्मगीते 


स्वामींवर रचलेल्या सहस्त्र काव्यांपैकी काव्ये ..... 

नसे कामना मज राजपद स्वीकारण्याची 

वा राजदंड धारण करण्याची 

दैव माझे खडतर 

नसे पात्रता माझी 

त्या सर्वसत्ताधीश पर्तीपुरीश्वराच्या 

चरणांची धूळ बनण्याची 

*

दिवसभरातील धुमश्चक्रीने थकून भागून 

जन घेती विसावा रात्री 

परि या नेत्रांसी ठाऊक नाही पळभर विश्रांती 

चरणांनी त्यांच्या चोरीला माझी नीज 

अन् घेतला मनाचा ताबा 

दिवस वा रात्र जाणत नाही मी 

वेद म्हणती ह्यांचे चरण हाच आश्रय 

परि सीलबंद केले त्यांनी माझे दैव 

वेदवाक्य नाही सत्य, नाही सत्य !


उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 

जय साईराम  

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " हे विश्व म्हणजे माया आहे त्यामध्ये न अडकता केवळ परमेश्वराच्या विचारात राहा व त्याच्यासाठी जीवन व्यतीत करा." 

भाग - नववा 

आत्मगीते 


नील मेघश्यामाचे चिंतन 

अस्वस्थ मी, अशांत मी 

समस्त जग निद्राहीन 

हे प्रभू, आहे कोठे ही निद्रादेवी ?

दास्यत्व तूझे पत्कारल्यावर 

कोण होईल निद्राधीन ?

हे प्रभू, वृंदावनीची धूलिक होऊन 

असते जरी मी तुझ्यासंगे 

तर आला असता का जन्म माझ्या वाट्याला पुन्हा?

तुझ्या चरणांशी शरणागत असलेला 

ना पहाड, ना वृक्ष मी 

ना जलाशय, ना जलचर मी 

ना धेनु ना, वत्स मी 

यापैकी कोणीच नाही मी एखादा क्षुद्र जीवही नाही 

यास्तव पुन्हा मिळाला जन्म मज वंचिताचा, उपेक्षिताचा 


*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    


गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

चेहरा मनाचा आरसा आहे म्हणून सदैव आनंदी रहा. "

भाग - नववा 

आत्मगीते 


हिरावलेस तू माझे चैतन्य 

हिरावलेस तू माझे जीवन 

हिरावलेस तू माझे सर्वस्व 

उरल्या सुरल्या हृदयाच्या बदल्यात 

दिलेस तू तुझे चरण 

हे प्रभू, का घेतलेस इतके सुंदर रूप ?

माझ्यासारख्या जीवांचा छळ करण्यासाठी तर नव्हे ?

*

ना चाले मात्रा तेथे वैद्याची 

ना चाले मात्रा तेथे औषधाची 

व्यथा ही दुर्धर !

सहाय्य करू शके ना कोणी 

प्रभुचरणांविना अन्य नाही उपाय 


कोणास वाटे मी रोगपीडित 

कोणास वाटे मी भूतबाधित 

ज्ञानीच केवळ जाणती, हे आहे काय 

ते म्हणती, प्रभुचरण हाचि रामबाण उपाय 

घेऊन जा मज त्यांचे चरणी 

अन्यथा अंत निश्चित;

त्यांचे मधुर आलिंगन हाच त्यावर उपाय 

जाणता का हे प्रिय सख्यंनो ?


*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 

जय साईराम 

  




मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

गोकुळाष्टमी संदेश 


" पौर्णिमेच्या शीतल रात्री वृंदावनात रासलीला केली जात असे परंतु येथे मुक्ती निलयममध्ये भर दुपारच्या उन्हात रासलिलेचे नृत्य केले गेले. प्रत्येक गोपीला स्वतःचा एक कृष्ण होता. एक गोपी, एक कृष्ण, एक गोपी, एक कृष्ण असे सर्वांनी हातात हात घालून नृत्य केले ! स्वामींनी म्हटले आहे की सत्ययुगामध्ये प्रत्येक स्त्री राधा असेल व प्रत्येक पुरुष कृष्ण. सत्य आणि प्रेम हातात हात घालून रासलिलेचे नृत्य करतील. प्रत्येक क्षण अन क्षण आनंदाने भरून गेलेला असेल. अखिल विश्व वृंदावन बनून जाईल. प्रत्येकाचे जीवन म्हणजे रासलिलाच असेल. सर्वांना राजविद्या म्हणजेच चंद्र आणि सूर्य ह्यांच्या एकत्वाचे ज्ञान असल्यामुळे ते रासलिलेच्या आनंदात न्हाऊन निघतील. येथे इंद्रियांचे काहीही काम नाही. ह्या परम आनंदाची अनुभूती केवळ भावांद्वारे घेता येते."

तुझ्या लेखनात पाहिले मी सौंदर्य तुझ्या हातांचे 
तुझ्या पदन्यासात पाहिले मी सौंदर्य तुझ्या चरणांचे 
शरीर निवेदनात पाहिले मी सौंदर्य तुझ्या रूपाचे 
ह्या भ्रामक जगात, शोध घेतो मी तुझ्यासाठी 

- बाबा 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' गीत गोविंदम् अगेन ' ह्या पुस्तकातून 

*     *     *

कृष्णाने धरती मातेला दिलेली प्रतिज्ञा पूरी करण्याच्या हेतूने, विश्वाची अनेक दुष्ट राजकर्त्यांपासून मुक्तता केली आहे आणि सज्जनांच्या रक्षणार्थ धर्माधिष्ठित शासन स्थापित केले. सदाचरणाचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांना दंड देण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी दिव्यत्व युगानुयुगे अवतार घेते. असे म्हटले जाते की कृष्णाने अनेक दुष्टांचा विनाश केला परंतु हे कथन बरोबर नाही. दुष्टांचा त्यांच्यामधील दुष्टताच नाश करते. असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की," कृष्णानी कंसाचा वध केला नाही का ? " नाही, बिलकुल नाही. हे पाठ्य पुस्तकातील संस्करण आहे. वास्तविक, हा कंसाचा स्वतःचा भ्रम होता ज्याने त्याचा संहार केला. कृष्णाविषयी असणाऱ्या भयाने तो सदैव अस्वस्थ असे. त्याचा मृत्यु म्हणजे त्या भयाची प्रतिक्रिया व त्याचा परिणाम होता. व्यक्तीचे विचारच व्यक्तीची नियती निर्धारित करते. म्हणून लोकांनी चांगले विचार विकसित केले पाहिजेत सर्व दुर्भावांपासून आपला बचाव केला पाहिजे. ईश्वराला कोणाविषयीही ईर्ष्या वा द्वेषभाव नसतो ना ही त्याच्यासाठी कोणी विशिष्ट व्यक्ती प्रिय असतो. जी व्यक्ती कृपा प्राप्त करते, तो त्याच्या स्वतःच्या भावनांचाच परिणाम असतो.
 
संदर्भ - भगवान बाबांच्या २९ ऑगस्ट १९९४ रोजी दिलेल्या दिव्य संदेशातून.    



जय साईराम  

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " कोणालाही दुखवू नका कारण परमेश्वर प्रत्येकामध्ये विद्यमान आहे."

भाग - नववा 

आत्मगीते  


गौप्यसुखांचा स्वर्ग ! 

अमृताचा माग ठेवी मृत्युस किनाऱ्यावर 

संगीत त्याचे ऐकून 

दाटे अश्रूंचा महापूर 

होई अनिल निश्चल 

फुटे पान्हा धेनुस 

पक्षी विसरती कूजन 

व्याघ्र सेविती गोरस धेनुच्या आचळातून 


समस्त विश्व करिते नर्तन 

पाहा, पाहा ते नृत्यमग्न हरिण 

संगीताने वितळती पाषाण 

चराचरात पहा नारायण 

मोहितसे गोपीस त्याचे मधुर गान 

विसरती घरदार, नुरे देहभान 

अरे ! ही तर रासलीला 

दिव्य आत्मनर्तन ! 

हे कृष्णपंखी कोकिळे, 

भेटसी जरी तू माझ्या माधवला 

सांग त्यासी माझी दुःखमाला 

शरणागत होऊनी चरणकमलांशी, 

सांग त्यासी करण्या मार्गदर्शन 

या व्यथेतून मुक्त होण्यास 

हे प्रिये सखे, कोकिळे 

भेटसी जरी तू माझ्या अच्युताला 

प्रलय होता, सांग त्यासी रक्षण माझे करायला 

व्यर्थ माझे जीवन, या तुफानी भवसागरात 


*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   






गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग. "  

भाग - नववा 

आत्मगीते 

कृष्णावर रचलेली काव्ये 

त्यासी मुख का म्हणावे, जे न करी गुणगान तुझे?
त्यासी नेत्र का म्हणावे, जे न देखती रूप तुझे?
त्यासी हृदय का म्हणावे, जे न गहिवरे तुझ्या चिंतनात?
ते चरण काय कामाचे, जे न जाती तुझ्या निकट?
हे सनातन प्रभू, तू माझी आत्मज्योत 
हे कान्हा, ज्ञात झाले मज एकमेव अविकारी सत्य 
तूचि उगम तूचि सर्व !

*

खेळे खेळे कान्हा गोकुळात 
आनंदात गमला वनी शीतल जलौघात 
मुरली वादन त्याचे, दिव्यानंदाचे निधान 
पृथ्वीतल नव्हे, भासे इंद्राचे नंदनवन !

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" विश्व हा एक आरसा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहता."

भाग - नववा 

आत्मगीते 

           मी केवळ परमेश्वरासाठीच जन्माला आले आहे. माझी गीते, कविता आणि पुस्तके यांतून हे सिद्ध होते. १३ फेब्रुवरी २००९ रोजी ' अव्यक्त भाव ' हे प्रकरण लिहित असताना स्वामी म्हणाले," तू तुझ्या तरुणपणी कृष्णाला पत्रं का लिहिलीस ? कोणी देवाला अशी पत्रं लिहिली आहेत का ? हे सर्व अवतारकार्यासाठी आपण आपले भाव व्यक्त करण्यासाठी आलो आहोत."
           मी माझे भाव लिखाणातून का व्यक्त करते हे मलाही माहीत नाही. स्वामी म्हणाले, हे अवतारकार्यासाठी आहे. माझ्या जीवनाचा गर्भितार्थ आता वाचकांना उमजेल. 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम