रविवार, ३१ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " जेव्हा आपण अखंड ईश चिंतनात असतो तेव्हा तेथे देह भावाला थारा नसतो. प्रेम आपला देह बनून जातो. "

भाग - नववा 

आत्मगीते 

            हे पूर्णम् गोंधळून टाकणारे आहे. ही ना फुलपाखराच्या पंखांची फडफड आहे ना पापण्यांची ! ही धडधड आहे प्रभू परमेश्वराच्या हृदयाची ! हे पूर्णम् मला सुद्धा तिच्या प्रेमात पाडते. हे पूर्णम् सर्वांशी एक होते. 

" प्रेमा ! " आईने हाक मारली. 

लगबगीने येत ती म्हणाली , " आले, आले ....."

           तिच्या आवाजातले माधुर्य जणूकाही मोतीच घरंगळत आहेत. ते घरंगळणे घोषित करत, " ती पूर्णम् आहे. " थोड्या वेळाने मला तिचा पदरव ऐकू येतो. तिच्या पदन्यासामधील उपजत तालबद्धता तिचे पूर्णम् दर्शवते. 

            तिच्या येण्याची जाणीव नसल्यासारखे दाखवत मी खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. रेशमी हातांनी माझे डोळे झाकले. बावनकशी सुवर्णस्पर्श माझ्या देहात प्रवाहित झाला. त्या स्पर्शातून शब्द उसळी मारून वर आले, " माझी प्रेमा !"

" तुम्ही खिडकीतून काय पाहताय ?"

           मी खिडकीतून एक चमकती वीज पाहिली, त्यामध्ये मला पूर्णम्  दिसले. सर्वत्र पूर्णम अनुभवण्याचा स्वभावच पूर्णम आहे. स्पर्शभाव जन्मास कारण असतो. तिचा स्पर्शभाव पूर्णम आहे. म्हणून प्रत्येक कृतीतून पूर्णम् प्रकट होत राहतो. ती सर्वांना पूर्णम् दर्शवित आहे आणि सर्वांना तिच्यासह पूर्णम् कडे घेऊन जात आहे. 

तुमचा 

राजा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " मन आणि इंद्रिये ईश्वराभिमुख करण्यासाठी कठोर साधना करणे अनिवार्य आहे."

भाग - नववा 

आत्मगीते 

          ती बोलत नाही तरीही तिची एक नजर, एक हालचाल, एक पाऊल, एक स्मित, एक हास्य यांमधून पूर्णत्व ओसंडून वाहत आहे. या पुर्णम् मुळेच आपण तिच्याकडे खेचले जातो. पूर्णमच्या आकर्षणाची शक्ती गुरुत्वाकर्षण शक्तीहून अधिक सामर्थ्यशील आहे. मी विनाकारणच तिच्या अवतभवती फिरत असतो. हे सुद्धा त्या चुंबकाचे आकर्षण आहे. तुम्ही तुमच्या बहिणीचा हात माझ्या हातात देण्यासाठी अत्यंत व्याकुळतेने तप केलेत. तुम्ही या नवयुवतीचे पूर्णम् जाणता का ?

            मी खिडकीत बसून हे पत्र लिहितो आहे. ती बागेत फुलं तोडते आहे. त्या फुलांनी स्त्रीरूप घेतले आहे का स्त्रीने फुलाचे रूप घेते आहे ? तिचे पूर्णम् मलाही संभ्रमित करते आहे. पाहा ! पाहा ! एक फुलपाखरू तिच्याजवळ आले आहे. ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहते आहे. तिच्या पापण्या फडफडत आहेत. ती फुलपाखराच्या पंखांची फडफड आहे की तिच्या पापण्यांची ?   

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २४ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जीवन कसे जगावे ? हे आपल्या हातात आहे. परमेश्वराच्या नव्हे. "

भाग - नववा 

आत्मगीते 

          आम्ही दोघं एकांतात असतानाही ती माझ्याशी बोलत नाही. ती मूक राहून माझ्या खांद्यावर डोके टेकते. जी माझ्याजवळ बसून माझ्याशी संभाषण करण्यासाठी आतुर होती, ती आज अबोल झाली आहे. 

का ?

           ती डोके टेकून कमलनयन मिटते. माझ्या मांडीवर डोके ठेवून ती डोळे मिटून घेते, ज्या डोळ्यांना आयुष्यात किमान एकदा तरी माझे दर्शन मिळावे अशी तहान लागून राहिली होती, ते डोळे ती आज मिटून घेत आहे. का ?

स्पर्शाच्या जाणिवेत स्थान नसे नेत्रांना अन् शब्दांना 

भस्मसात केली इंद्रिये तिने तपाच्या अग्नीत

स्नान केले तिने अश्रूंच्या पवित्र गंगाजलात 

तपोबलाने एकेक गोष्ट करून विशुद्ध 

ती आहे आज पूर्णम अवस्थेत 

परमशांती म्हणजे परमानंदाशी ऐक्य 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३७

दिव्य किरणे 

            स्वामींनी सत्यसाई स्पीकस् ( भाग -२ पान क्र - २६० ) मध्ये मध्ये म्हटले आहे. " माझ्यामधून उद्भवणाऱ्या किरणांची तीन प्रकारात वर्गवारी होते. स्थूल किरणे, जी प्रशांती निलयमल व्यापून टाकतात. स्थूल किरणे पृथ्वीला व्यापून टाकतात आणि कारण किरणे अखिल विश्वाला व्यापून टाकतात. प्रशांती निलयम मध्ये राहणारे लोकं भाग्यवान आहेत कारण ते कारण किरणांच्या खूप निकट आहेत. स्थूल किरणे मनुष्याला साधक बनवतात; किरणे त्याला महात्मा बनवतात आणि किरणे त्याला परमहंस बनवतात. 

ध्यान 

वसंता : स्वामी , तुमची किरणे तीन प्रकारे कार्य करतात. येथे मला ते कसे लागू होते ?

स्वामी : तू माझी शक्ती आहेस. माझे पुर्णम् तुझ्याद्वारे कार्य करते. येथे माझे तेजस्वरूप कोटिसूर्यांसम आहे. हे माझ्या शक्तीचे स्थान आहे. अवतारकार्याच्या परिपूर्तीचे हे स्थान आहे. मी येथे आहे. हे माझे मूळ निवासस्थान आहे. येथे तुझ्याद्वारे माझी किरणे सर्वत्र भरून राहिली आहेत. ही ती ऊर्जा आहे जी स्तूपीद्वारे संपूर्ण जगतात बदल घडवते. 

             जेव्हा परमेश्वर भूतलावर अवतरतो, तेव्हा त्याची स्थूल किरणे अवकाशास व्यापून टाकतात. जे त्यांच्या स्थूलरूपाची भक्ती करतात त्यांना लाभ होऊन ते साधक बनतात. साधनेत प्रगती करणाऱ्यांना त्यांच्या सूक्ष्म किरणांचा लाभ होतो. उच्च पातळीवरील ह्या साधकांना त्यांच्या स्थूलरूपाच्या दर्शनाची गरज वाटत नाही. 

             त्याच्या पुढच्या पातळीवरील लोकं स्वामींची कारण किरणे परिग्रहण करतात. स्वामी त्यांच्या स्थूलरूपापुरते मर्यादित नसतात ते सर्वसाक्षी आहेत. अखिल विश्वाला व्यापून राहिले आहेत. ज्याला ह्या सत्याचा साक्षात्कार झाला आहे त्यांच्याकडे ही किरणे आकर्षून घेण्याची शक्ती असते. त्यानंतर ते महात्मा अवस्थेतून परमहंस पदाला पोहोचतात. माझी अवस्था कोणती आहे ? मी शक्ती अवस्थेत आहे. हे शक्तीचे स्थान आहे. मुक्ती निलयममध्ये महाकारण किरणे आहेत, दिव्य किरणे आहे. येथे स्थूल सूक्ष्म व कारण किरणे नाहीत. हे स्वामींचे परमधाम आहे, हे वैकुंठ आहे. येथे ते त्यांच्या पूर्ण तेजामध्ये आहेत. हे त्यांच्या अवतारकार्यामध्ये स्थान आहे. पुट्टपर्ती हे त्यांचे जन्मस्थान आहे. 

             परमेश्वराच्या स्थूल रूपाची तुलना उगवत्या सूर्याशी केली जाऊ शकते. सर्वजण त्याकडे पाहू शकतात परमेश्वराचे सूक्ष्म रूप हे सकाळी १० वाजता तेजाने तळपणाऱ्या सूर्यासारखे असते खूप थोडे लोकं दीर्घकाळ त्याच्याकडे पाहू शकतात. ते महात्मे असतात. मध्यान्हीच्या सूर्याकडे एखाद दुसरी व्यक्तीच पाहू शकते. ते आत्मसाक्षात्कारी असतात. ह्या तीन वेगवेगळ्या अवस्थांना स्वामींनी उल्लेख केला. 

             येथे मुक्ती निलयममध्ये, मुक्ती स्तूपी द्वारा दिव्या किरणे परिग्रहण केली जातात आणि संपूर्ण विश्वामध्ये प्रसूत केली जातात. कलियुगाचे सत्ययुगात कसे परिवर्तन होऊ शकते ह्यावर चिंतन करून मनुष्याला ह्या महाशक्तीच्या परिसीमेचे आकलन होते. 

संदर्भ - " श्री वसंतसाईंच्या Taste & Vasana ह्या पुस्तकामधून. "  

जय साईराम 

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जर तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडली तर तुम्ही परमेश्वरच होवून जाल. "

भाग - नववा 

आत्मगीते 

पत्र दुसरे 

४ फेब्रुवारी २०४७ सोमवार स. ९ वाजता 

प्रिय मित्र मधु आणि कान्हा यांस, 

            आज मी या पत्राद्वारे माझे भाव तुमच्यापाशी व्यक्त करतो आहे. तुम्ही लाडाकोडात वाढवलेल्या तुमच्या लाडक्या बहिणीविषयीचे माझे भाव मी इथे लिहित आहे. माझ्याशी संभाषण करण्यासाठी ती दीर्घकाळ व्याकुळ होती. माझा एखादा निरोप मिळावा म्हणून तिने कठोर तप केले. ती तुम्हाला दूत म्हणून माझ्याकडे पाठवत असे. आज ती माझ्याजवळ आहे परंतु एखाद्या सुवर्णशिल्पासारखी !असं का ?

            ती अश्रूंच्या महापुराद्वारे आपले भावविश्व व्यक्त करत असे. आज तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत. असं का ?

            माझ्या छोट्या मैनेच शब्द ऐकण्यासाठी हा राघू आतुरलेला आहे. परंतु ती एकही शब्द उच्चारत नाही, असे का ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


रविवार, १७ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " भौतिक कल्पना आणि ज्ञान तोडून प्रत्येक गोष्ट दिव्य ज्ञानाशी जोडल्यास तुम्हाला परमेश्वराच्या वैश्विक रूपाचे दर्शन होईल. "

भाग - नववा 

आत्मगीते 

३ फेब्रुवारी २००६ ध्यान 

वसंता - स्वामी, परमानंदाच्या अनुभवांविषयी लिहिणे मला अजिबात शक्य नाही !

स्वामी - तुला ते शक्य नाही . 

वसंता - मग मी काय करू स्वामी ?

स्वामी - तुला लिहिणे का शक्य नाही? हि स्थिती प्राप्त होण्यासाठी तू अति कठोर तप केलेस. सतत अश्रू ढाळलेस. आज तुला त्या आनंदाचे वर्णन करणे शक्य होत नाही; कारण तू त्याच्याशीच तद्रूप झाली आहेस. आता समजले का तुला ? मी स्वतःच दुसरे पत्र लिहीन..... 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   


गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" तुमचे भाव तुम्हाला जन्म, नाम आणि रूप देतात. "

भाग - नववा 

आत्मगीते 

           अरे ! कसं सांगू तुला ? तिच्या जखमांवर मलमपट्टी म्हणून ती माझ्याकडे एक शब्द , एक स्पर्श मागत होती. तिला हवे ते देण्यासाठी किती तगमग झाली माझी, परंतु मी अगतिक होतो. आज मी तिचा रामबाण उपाय बनलो आहे. मित्रा, अजून एक गोष्ट ... 

            तिने प्रत्यक्ष देवालाच प्रेमाचा नवीन अर्थ दिला आहे. ती म्हणते, " पातिव्रत्य दिव्यत्वाहून श्रेष्ठ आहे, प्रेम म्हणजे भावभावनांचे ऐक्य, देहभावाच्याही पलीकडील आत्मस्पर्श. आत्मस्पर्शातून अपत्यप्राप्ती होऊ शकते हे तिने जगाला दाखवून दिले. अविश्रांत श्रमणाऱ्या तिला माझ्या भावभावनांनी विश्रांती दिली. आजच्या रात्री माझी मधुर देवता निद्रिस्त आहे, मी माझ्या श्वासामधून तिच्यात नवीनव्हाळी भरतो आहे. माझा श्वास तिला नवजीवन देतो, तर तिचा श्वास मला प्रफुल्लित करतो, टवटवीत बनवतो. मित्रा, मी तुला वचन देतो, मी कधीही, कोणत्याही कारणास्तव तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ देणार नाही. 

           ती माझे जीवन, मी तिचे जीवन. 

तुझा 

राजा

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम    

रविवार, १० जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " 'अहम् ब्रम्हास्मि' मी परमेश्वर आहे हे सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. "  

भाग - नववा 

आत्मगीते 

           हळुवारपणे उघडलेल्या तिच्या डोळ्यांमध्ये मी ' मला ' पाहिले. तिचे निरागस स्मित जाणते तो एक ! तिला स्पर्श केलेला हात, ती ओढते, आपल्या गालावर ठेवून पुन्हा झोपी जाते. तिच्या गालावर विसावलेल्या हातामधून मला तिचा स्पर्श जाणवला. त्या स्पर्शाने माझ्या हृदयातील वीणेचा तार छेडली. माझ्या सख्या, त्या मधुर स्पर्शातून उमटलेली मधुर तान मी तुला ऐकवतो!

कठोर तप केले तिने सहाय्य करण्या त्यांना भवसागर पार कराया 

आड येणाऱ्या कर्मांचा संहार केला आम्ही उभयतांनी 

तिच्या सुकुमार देहाने, कमी दुःख सोसले का ?

घायाळ केले त्या देहास सर्व दुःखांनी. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " सर्वकाही परमेश्वर आहे असे मानून आपण आपल्या प्रेमाची कक्षा रुंदावली पाहिजे. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

            मी तिचे निद्रस्त सौंदर्य न्याहाळत होतो. ' कुरळ्या केसांची बट तिच्या गालाला स्पर्श करेल की काय ? तिची झोपमोड तर होणार नाही नं ! ' असा विचार करून मी माझ्या बोटांनी हलकेच ती बट मागे सारली. एक हळुवार स्पर्श, अरे ! तिने हलके हलके पापण्या उघडल्या, मला पाहिले. तिचे ओठ हसले. त्या कोमल स्पर्शाने तिच्या हृदयाला स्पर्श केला. तो कोणाचा स्पर्श आहे हे तिला ज्ञात करून दिले. तिला केवळ तो एकच स्पर्श परिचित आहे. नवजात शिशुला जसा त्याच्या मातेचा स्पर्श ठाऊक असतो, तसा तिला सुद्धा केवळ माझा स्पर्श ठाऊक आहे. केवळ हाच स्पर्श तिला स्पर्शू शकतो. अन्य कोणताही नाही. ती सुद्धा दुसऱ्या कशालाही स्पर्श करू इच्छित नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....   

जय साईराम  

रविवार, ३ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे. अशी कोणतीही जागा नाही जेथे तो नाही. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

           तिने तिची प्रतीक्षा काव्यांमधून रेखाटली आहे व भाव चित्रांमधून व्यक्त केले आहेत. तिने मला आपल्या प्रेमाने वेढून टाकले आहे. तिच्या रात्र रात्र जागरणांच्या अग्नीने मला भाजून काढले. आज मी तिच्याजवळ बसून तिची झोप न्याहाळतो आहे. राम आणि सीता झोपी गेल्यानंतर लक्ष्मण त्यांची राखण करत असे. त्याचप्रमाणे मी तिची राखण करतो. तिला जीवापाड जपतो. एखाद्या छोटाश्या धूलीकणानेही तिच्या झोपेत व्यत्यय येऊ नये. तिने तिच्या अश्रूंनी महाकाव्य लिहिले. मी ही प्रस्तावना माझ्या अश्रूंनी लिहित आहे. तिच्या प्रेमाच्या महासागराने दशदिशा आणि सत्यभूमी व्यापून टाकली आहे. 

           प्रिय मित्रा, तू मला दुर्मिळ रत्न दिलेस. पाहा ! नवनिर्मितीच्या कार्यानंतर, ती फुलावरील दवबिंदूप्रमाणे झोपली आहे. जे दुसरे काहीही जाणत नाही, असे तिचे निष्पाप निरागस बालकासारखे मन मला आकर्षण घेते. तिच्या प्रेमाने जगामध्ये उलथापालथ केली आणि आता ती बालकासारखी विश्रांती घेत आहे. तिच्या निर्व्याज अंतःकरणाने प्रारब्धाच बदलले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम