ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले भाव पूर्णतः परमेश्वरावर केंद्रित असायला हवे.
आपण जे काही बोलतो,
आपण जे काही खातो,
आपण जे काही विचार करतो,
आपण जेथे जातो,
जर आपली दृष्टी परमेश्वरावर केंद्रित असेल तर जग आपल्याला स्पर्श करणार नाही. "
भाग - नववा
आत्मगीते
पत्र तिसरे
५ फेब्रुवारी २०४७ मंगळवार वेळ - संध्या - ५:३०
प्रिय भगिनीस,
तुझ्या मैत्रिणीने - प्रेमाने गेल्या जन्मात खूप दुःख सोसले. तिला 'वसंत , वसंत ' हाक मारून सांत्वन करावे अशी माझी खूप इच्छा होती. मी ते करू शकलो नाही. म्हणून मी आता तुला ह्या नावाने हाक मारतो. तू तिच्या दुःखाची साक्षीदार होतीस. आज मी तुझ्याशी तिच्याविषयीचे हितगुज करतो.
तिने हाताचा वापर न करता माझे चित्र रेखाटले. तिच्या दुखऱ्या शरीराचे तू मलम होतीस.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा