रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय." 

भाग - नववा 

उपसंहार 

' मी विना मी '

           मी केवळ परमेश्वरासाठी जन्माला आले. माझी गीते, काव्य आणि पुस्तके यांवरून हे सिद्ध होते. मी माझे भाव लिखाणातून का व्यक्त करत होते मला माहीत नाही. हे अवतारकार्यासाठी आहे असे स्वामींनी सांगितले आणि म्हणूनच माझे आत्मचरित्र इतरांहून वेगळे आहे. मी पन्नासहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ही सर्व पुस्तके म्हणजे माझे आत्मचरित्र आहे. 

            मी कोण आहे ? मी सदैव भगवान श्री सत्य साईबाबांचे मार्गदर्शन लाभलेली 'मी विना मी ' आहे. ते माझ्या अंतर्यामी आहेत, माझ्याशी संभाषण करतात आणि मला मार्गदर्शन करतात. ते जे मला सांगतात ते मी जाणते. बाकी मी काहीही जाणत नाही. हे ' मी विना मी ' आहे. केवळ स्वामी आणि त्यांचे प्रेम माझ्यामध्ये कार्यरत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम 

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म ( स्वधर्म ), सदाचरण याच्याशी निष्ठावंत राहिले पाहिजे. "

भाग - नववा 

उपसंहार 

ध्यान 

वसंता - साडीवर काय संदेश आहे ? त्यावर ४१३ , २३ आणि २७ असे आकडे लिहिले आहेत आणि एक ज्योतीचा आकार आणि ३ एस (s) आहेत. 

स्वामी - आपण दोघं एक आहोत - ४ +१+३=८ अष्टाक्षरी मंत्र हे आपले परमधाम आहे हे यातून दर्शवले जाते. २३, २७ आणि ज्योती याचा अर्थ तू ज्योतीतून जन्मलीस आणि ज्योतीत विलीन होशील. तुझा विवाहही ज्योतीच आहे. हा परमात्मा म्हणजेच ' मी ' आहे 

ध्यानसमाप्ती 

            २३ आकडा स्वामींचा आणि माझा जन्मदिन दर्शवतो. २७ हा आमचा विवाहदिन आहे. हा ' मी '. ' मी ' विना ' मी ' म्हणजे ' मी ' आहे ' मी ' असे दर्शवतो. तीन ' s ' स्वामींनी या पुस्तकासाठी दिलेली स्वाक्षरी सूचित करतात. 

- ॐ श्री साई चरणार्पणमस्तु -

जय साईराम    

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३८

           स्वामींनी मला ' वसंतसाई सच्चरित ' हे पुस्तक लिहिण्यास सांगितले. माझ्या जुन्या रोजनिशांमध्ये स्वामींनी केलेल्या नोंदी व टिपणे यामधून ह्या पुस्तकाने रूप धारण केले. माझ्या इतर पुस्तकांच्या हस्तलिखितातही लिहून त्यातील अनेक गोष्टी दयाळूपणे निदर्शनास आणून दिल्या. माझे वडील .व्ही.व्ही मधुरकवी सुद्धा रोजनिशी लिहत असत. एकदा त्यांच्या जुन्या डायऱ्या चाळत असताना आमच्या लक्षात आले की स्वामींनी एक तारीख अधोरेखित केली आहे. त्या दिवशी माझ्या वडिलांनी भगवद्गीतेच्या १३ व्या अध्यायातील पुरुष प्रकृति तत्वाविषयी विवेचन करणाऱ्या २३ व्या श्लोकाच्या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उत्सुकतेने आम्ही ती वाचण्यास सुरुवात केली. माझ्या वडीलांच्या लिखाणातून झालेली हृदयस्पर्शी भाव- वर्षा वाचून आम्ही चकीत झालो. 

          अनेक ज्ञानी जनांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधाराने प्रत्येक श्लोकाचा अर्थ लावून विविध प्रकारे भगवद्गीतेचे समालोचन केले आहे. परंतु वाचकांना त्याचा कायमस्वरूपी असा काय लाभ झाला ? ज्यांचे लिखाण स्वानुभवावर आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित असते ते आपल्या हृदयास भिडते. त्यांच्या अनुभवांची सत्यता आपल्याला त्यांचा मार्ग अनुसरण्यास प्रवृत्त करते. वाचत असताना आपण त्यांचा खडतर प्रवास व विजयाचे क्षण प्रत्यक्ष अनुभवतो. जेव्हा वाचक अनुभव आणि अनुभव घेणारा या दोहोंशी एकतान होतो तेव्हाच त्याच्यामध्ये परिवर्तनाची इच्छा जागृत होते. माझे वडील भग्वद्गीतेशी तन्मय झाले होते व गीतेची शिकवण त्यांनी तंतोतंत आचरणात आणली होती. ते स्वतःच अर्जुन, दुर्योधन , भीष्म , कर्ण झाले. त्यांच्या अनुभवांशी एकतान झाले. भग्वद्गीतेशी एक झाले होते. माझे वडील स्वतःच एक जिती जागती गीता होते. 

अध्याय - २, श्लोक - २१ 

            हे पार्था, जो पुरुष जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अविकारी आहे. तो कोणाला कसा मारेल वा कोणाला कसा मारवेल ?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव -------

            कान्हा ! तू व मी यापूर्वी अविभक्त होतो. यापुढेही अविभक्त असू व आताही आहोत. इतरांच्याही बाबतीत हे असं आहे, याचं परमज्ञान या मुढाला दे. आदिनारायणा ! तूच उद्धारक !शरणो शरणम्. प्रभू , कान्हा, गरुडवाहना, आपद्बांधावा ! शरणो शरणम्. 

             भगवद्गीतेच्या १३ व्या अध्यायात २४ श्लोक आहेत. २४ व्या श्लोकात पुरुष आणि प्रकृती यांचे गुणवर्णन केले आहे आणि जो हे जाणतो त्याला पुनर्जन्म नाही. माझे वडील त्यांच्या डायरीमध्ये ते ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात. स्वामींनी हा श्लोक काडायरीविषयी  सूचित केला? माझ्या वडिलांच्या डायरीमध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक असताना हाच का सूचित केला. स्वामी आणि मी पुरुष आणि प्रकृती म्हणून अवतरलो आहोत आणि ती प्रकृती माझ्या वडिलांच्या पोटी जन्माला येऊन सर्वांना मुक्ती प्रदान करणार आहे. माझ्या वडिलांनी वयाच्या ३९ व्या वर्षीच हे डायरीमध्ये लिहिले. आम्ही त्यांची अगोदरची कोणतीही डायरी पाहिली नाही. तसेच आमच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्या वा माझ्या डायऱ्या वाचल्या नाहीत. आता प्रथमच मला स्वामींनी त्यांच्या डायऱ्या वाचून त्यांच्या लिखाणावर सविस्तर लिहिण्यास सांगितले. मी आधी काही मजकूर लिहिला व त्यानंतर मणिवन्ननने अजून काही डायऱ्या आणून दिल्या. इथे मी जे लिखाण केले आहे ते स्वामींनी सूचित केलेल्या १९५३ च्या डायरीतील आहे. माझ्या डायरीतील नोंदी हाच माझ्या पुस्तकातील मजकूर असतो. आतापर्यंत सुमारे ६० पुस्तके लिहून झाली आहेत. स्वामींनी मला आता वडिलांच्या डायरीविषयी लिहिण्यास सांगितले आहे.  

अध्याय - १३, श्लोक - २३

           अशा रितीने जो मनुष्य पुरुष आणि प्रकृतीला त्रिगुणांसहित तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करत असला, त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी पुन्हा जन्माला येत नाही. 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ----- 

            हे कान्हा, मला पुरुष, प्रकृती व त्यांचे गुण याबद्दलचे शिक्षण दे. हे अनाथरक्षका, तू अनाथांचा नाथ आहेस. हे आपद्बांधवा, तू सर्वांची आपत्तीतून सुटका करतोस. केवळ तूच या निराश्रिताचा आधार आहेस. हे प्रभू, तूच माझा निवारा आहेस. तुला मी अनन्य शरण आलो आहे. तू मला अनासक्त बनव. तू मदुरैमध्ये पेरुमल म्हणून स्थित आहेस. श्रीरंगममध्ये रंगनाथ बनून पहुडला आहेस. तर तिरुपतीमध्ये वैंकटेश्वर होऊन उभा आहेस. वामन अवतार घेऊन तू अवकाश आणि पृथ्वी व्यापतोस. तूच श्रीराम, बलराम, परशुराम, पांडवांचा दूत आहेस. तू पुरुष आणि स्त्री दोन्ही आहेस. तू इथे आहेस आणि नाहीसही. हे आदिनारायणा, तू मला तुझ्या चरणांशी घे. शरणो शरणम्. 

             माझ्या वडिलांनी त्यांच्या डायरीची सुरुवात दि. १ जानेवारी १९५३ साली गीतेच्या १३ व्या अध्यायातील २३ व्या श्लोकापासून केली. हा श्लोक पुरुष - प्रकृती लक्षणांचे विवरण करतो. ज्याला हे माहीत आहे, तो कोणत्याही पथावरून वाटचाल करत असला तरी पुनर्जन्मापासून मुक्त असतो. माझ्या वडिलांनी पुरुष प्रकृती तत्व जाणण्याचा तळमळीने आपले उभारून येणारे भाव व्यक्त केले. ते पुरुष आणि प्रकृती यांच्या समवेत वावरत होते यद्यपि पूर्णतः अजाण होते. 

*     *     *

संदर्भ - वसंतसाईंच्या " जिती जागती गीता " या पुस्तकामधून. 

जय साईराम 

रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वर केवळ शुद्ध, निष्कपट हृदयामध्ये वास करतो. "

भाग - नववा 

उपसंहार 

           परमेश्वराला नाम आणि रूप नाही. ती ज्योतीस्वरूप आहे, आदितेज. त्या आदितेजातून अवतार ज्योतीरूपाने आले. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या तेजमधून, मी ज्योतीस्वरुपात वेगळी होऊन जन्मास आले. कृष्णभक्तीच्या दुधावरच लहानाची मोठी झाले. मला झोप लागेपर्यंत मी कृष्णाच्या कथा ऐकत असे, त्यामुळे झोपेतही माझ्या मनात त्याचेच विचार असत. मी खात असतानाही माझ्या मनात त्याचेच विचार असत. मी कृष्णाबरोबरच खेळत असे. मी माझे जीवन त्याच्याच चिंतनात व्यतीत केले. मला त्याच्याशीच विवाह करायचा होता. माझा विवाह परमेश्वराशी झाला. राधाकृष्णाच्या भावसंगमातून कावेरीचा जन्म झाला. स्वामींनी सांगितले की, ती राधेच्या गर्भातील ज्योत होती. अंतसमयी जेव्हा माझा देह ज्योतीरूप धारण करून अदृश्य होईल तेव्हा तिचा देहही अदृश्य होईल. ज्योतीने कावेरीची नाम आणि रूप धारण केले आहे . म्हणून स्वामी म्हणाले की, मला ज्योतीस्वरूप अपत्यप्राप्ती झाली. स्वामी असंही म्हणाले की, मणिवन्ननची मुलगी वैष्णवी स्तूपामध्ये विलीन होईल आणि तिचा देह अदृश्य होईल. 

          यातून असे दिसून येते की, परमेश्वराचा वंश ज्योतीस्वरूप आहे. स्वामींनी हा मजकूर या पुस्तकाच्या उपसंहारासाठी सांगितला. विवाह आणि अपत्यजन्म हाही अवतारकार्याचाच एक भाग आहे. तिथे नाम आणि रूप नाही. भौतिक देह नाही. आम्ही आदिज्योतीमधून आलो आहोत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम         

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " मृत्युनंतर प्राप्त झालेल्या मोक्षाचा काय उपयोग ? मृत्युनंतर कोणी मोक्षप्राप्ती अनुभवू शकतो का ? साई आनंदापुढे कोणताही स्वर्गीय आनंद फिकाच आहे. साईमधुर अमृताची इथेच या क्षणी अनुभूती घ्या." 

भाग - नववा 

उपसंहार 

             मी आत्मचरित्र पूर्ण केले. स्वामींनी या पुस्तकासाठी उपसंहार द्यावा, अशी स्वामींना विनंती करण्याचे माझ्या मनात आले. 

१० मार्च २००९ सकाळचे ध्यान 

स्वामी - जंगलात लागणाऱ्या आगीला वानवा म्हणतात. घरामध्ये पेटवलेल्या अग्नीला शेकोटी म्हणतात. अन्न शिजवण्यासाठी पेटवलेल्या अग्नीला विस्तव म्हणतात. निरांजनातील अग्नीला अग्नी नव्हे तर ज्योत म्हणतात. प्रज्वलित दीपामध्ये ज्योत तेवत असते. तिला नाम व रूप नसते. स्थान ग्रहण केल्यावर तिला नाम प्राप्त होते. उदा. दिव्याची ज्योत, मेणबत्तीची ज्योत इ. हे आहे 'मी ' विना ' मी '  म्हणजेच तू !

जन्म तुझा ज्योतीतून, ज्योतीरुपातून 

ज्योती तुझा आहार , ज्योती तुझे पेयपान 

ज्योतीरुपात वाढवलीस 

ज्योतीशी विवाहबद्ध झालीस 

ज्योतीरूप अपत्यप्राप्ती तुज 

देह तुझा होऊन ज्योतीस्वरुप

एकत्व पावशील ज्योतीत. 

वसंता - स्वामी, हे खूप छान आहे, ज्योतीरूप अपत्यप्राप्ती म्हणजे काय ?

स्वामी - कावेरी अनंतात विलीन होईल, तिचा देह मागे राहणार नाही. वैष्णवीचेही तसेच होईल. 

ध्यानसमाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    


रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " तेलाच्या संततधारेसारखे आपणही अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे."

भाग - नववा 

आत्मगीते 

            मी खाली उतरून पायरीवर बसतो. तिने केलेली रंगांची उधळण मी साक्षी होऊन पाहतो. तिने माझ्याकडे पाहत पाहत रांगोळी काढली. तिच्या रेशमी हातांनी साकारलेली नवनिर्मिती मी पाहतो. मनामध्ये माझे चिंतन करत तिने काढलेली ही रंगीबेरंगी रांगोळी तिच्या कलेचे सौंदर्य आहे. 

            तिच्या सुंदर नवनिर्मितीमध्ये अनेक अपूर्व नमुने ( डिझाइन्स ) आहेत. नवनिर्मिती करण्यात ती निष्णात आहे, हो नं ? आजपर्यंत कोणत्याही ब्रह्याने अशी निर्मिती केलेली नाही. तिने, या अपूर्व स्त्रीने नवनिर्मिती पूर्ण केली. हातातील रंगांचे तबक दूर भिरकावून ती धावत माझ्याकडे आली. आमचं काम संपलं आहे, आमचं कार्य पूर्णत्वास गेलं आहे. आम्ही आत जातो. 

तुझा प्रेमळ बंधुराया 

राजा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपण केवळ ह्या परमेश्वराच्या निर्मितीचे विश्वस्त आहोत आपण कोणत्याही गोष्टीचे मालक नाही."

भाग - नववा 

आत्मगीते 

        अचानक ती उभी राहाते आणि मला पाहते. रांगोळी खाली ठेवून सुंदर मयुरीसारखी डौलाने ती माझ्याकडे धावत येते. माझ्याजवळ बसते अन् तिचे डोके माझ्या मांडीवर ठेवते. मी हळुवारपणे तिच्या केसांमधून हात फिरवतो. 

        मी तिला म्हणतो," अग, रांगोळी अर्धीच काढलीस, पूर्ण करून ये."

        अर्धोन्मीलित नेत्रांनी ती उत्तरते, " हं! मला आता काही करायचं नाहीये ... तुमची जवळीक पुरेशी आहे. "

         तिची समजूत काढून मी तिला खाली पाठवतो. ती रांगोळीमध्ये रंग भरते. मला मनात ठेवून ती सुवर्णचित्र रेखाटते. ही रंगसंगती खूप सुंदर आहे. ती स्वतःच रंगाचे सौंदर्य आहे. तो आर्जवी नजरेने माझ्याकडे पाहते. 

         मी तिला खुणावून म्हणतो, " रांगोळी पूर्ण कर आणि ये."

         तिचे निरागस मुखमंडल आर्जवते," मला तुमच्याजवळ येऊ द्या ना !"

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम 

रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जेव्हा आपण प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टीवर प्रेम करू लागतो तेव्हा त्यातील प्राणिक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या मूलभूत दिव्य शक्तिचा आपल्याला लाभ होतो. "

भाग - नववा

आत्मगीते 

      संध्याकाळची वेळ, ती दारापुढे रंगीत रांगोळी काढते आहे. 

ती स्वतः एक सुंदर रंगावली 

ओणव्याने चित्रीते ती एक रंगवली 

वेणी तिच्या केसांची सळसळते नागिणीसम 

ओणव्याने चित्रीते ती एक रंगावली

नाजूक कटीस तिच्या होतील वेदना ! नाही, नाही !

हे तर आनंददायी नृत्य इडापिंगलेचे 

सहस्राराचा तिलक ती, काळाच्या तिजोरीवरील 

बुंदके रोखून रंगावलीचे 

खालून वर जोडीते रेषा 

जादुई कला, त्या कोमल करांची 

जोडीते बुंदके वेगवेगळ्या कोनांतून 

प्रकटे सौंदर्य त्या रेषांच्या वाणीतून 

किमया ही तिच्या करकमलांची!  


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपले भाव पूर्णतः परमेश्वरावर केंद्रित असायला हवे. 

आपण जे काही बोलतो,

आपण जे काही खातो,

आपण जे काही विचार करतो,

आपण जेथे जातो,

जर आपली दृष्टी परमेश्वरावर केंद्रित असेल तर जग आपल्याला स्पर्श करणार नाही. "

भाग - नववा 

आत्मगीते 

पत्र तिसरे 

५ फेब्रुवारी २०४७ मंगळवार वेळ - संध्या - ५:३०

प्रिय भगिनीस, 

            तुझ्या मैत्रिणीने - प्रेमाने गेल्या जन्मात खूप दुःख सोसले. तिला 'वसंत , वसंत ' हाक मारून सांत्वन करावे अशी माझी खूप इच्छा होती. मी ते करू शकलो नाही. म्हणून मी आता तुला ह्या  नावाने हाक मारतो. तू तिच्या दुःखाची साक्षीदार होतीस. आज मी तुझ्याशी तिच्याविषयीचे हितगुज करतो. 

            तिने हाताचा वापर न करता माझे चित्र रेखाटले. तिच्या दुखऱ्या शरीराचे तू मलम होतीस. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम