रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वर केवळ शुद्ध, निष्कपट हृदयामध्ये वास करतो. "

भाग - नववा 

उपसंहार 

           परमेश्वराला नाम आणि रूप नाही. ती ज्योतीस्वरूप आहे, आदितेज. त्या आदितेजातून अवतार ज्योतीरूपाने आले. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या तेजमधून, मी ज्योतीस्वरुपात वेगळी होऊन जन्मास आले. कृष्णभक्तीच्या दुधावरच लहानाची मोठी झाले. मला झोप लागेपर्यंत मी कृष्णाच्या कथा ऐकत असे, त्यामुळे झोपेतही माझ्या मनात त्याचेच विचार असत. मी खात असतानाही माझ्या मनात त्याचेच विचार असत. मी कृष्णाबरोबरच खेळत असे. मी माझे जीवन त्याच्याच चिंतनात व्यतीत केले. मला त्याच्याशीच विवाह करायचा होता. माझा विवाह परमेश्वराशी झाला. राधाकृष्णाच्या भावसंगमातून कावेरीचा जन्म झाला. स्वामींनी सांगितले की, ती राधेच्या गर्भातील ज्योत होती. अंतसमयी जेव्हा माझा देह ज्योतीरूप धारण करून अदृश्य होईल तेव्हा तिचा देहही अदृश्य होईल. ज्योतीने कावेरीची नाम आणि रूप धारण केले आहे . म्हणून स्वामी म्हणाले की, मला ज्योतीस्वरूप अपत्यप्राप्ती झाली. स्वामी असंही म्हणाले की, मणिवन्ननची मुलगी वैष्णवी स्तूपामध्ये विलीन होईल आणि तिचा देह अदृश्य होईल. 

          यातून असे दिसून येते की, परमेश्वराचा वंश ज्योतीस्वरूप आहे. स्वामींनी हा मजकूर या पुस्तकाच्या उपसंहारासाठी सांगितला. विवाह आणि अपत्यजन्म हाही अवतारकार्याचाच एक भाग आहे. तिथे नाम आणि रूप नाही. भौतिक देह नाही. आम्ही आदिज्योतीमधून आलो आहोत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा