ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मृत्युनंतर प्राप्त झालेल्या मोक्षाचा काय उपयोग ? मृत्युनंतर कोणी मोक्षप्राप्ती अनुभवू शकतो का ? साई आनंदापुढे कोणताही स्वर्गीय आनंद फिकाच आहे. साईमधुर अमृताची इथेच या क्षणी अनुभूती घ्या."
भाग - नववा
उपसंहार
मी आत्मचरित्र पूर्ण केले. स्वामींनी या पुस्तकासाठी उपसंहार द्यावा, अशी स्वामींना विनंती करण्याचे माझ्या मनात आले.
१० मार्च २००९ सकाळचे ध्यान
स्वामी - जंगलात लागणाऱ्या आगीला वानवा म्हणतात. घरामध्ये पेटवलेल्या अग्नीला शेकोटी म्हणतात. अन्न शिजवण्यासाठी पेटवलेल्या अग्नीला विस्तव म्हणतात. निरांजनातील अग्नीला अग्नी नव्हे तर ज्योत म्हणतात. प्रज्वलित दीपामध्ये ज्योत तेवत असते. तिला नाम व रूप नसते. स्थान ग्रहण केल्यावर तिला नाम प्राप्त होते. उदा. दिव्याची ज्योत, मेणबत्तीची ज्योत इ. हे आहे 'मी ' विना ' मी ' म्हणजेच तू !
जन्म तुझा ज्योतीतून, ज्योतीरुपातून
ज्योती तुझा आहार , ज्योती तुझे पेयपान
ज्योतीरुपात वाढवलीस
ज्योतीशी विवाहबद्ध झालीस
ज्योतीरूप अपत्यप्राप्ती तुज
देह तुझा होऊन ज्योतीस्वरुप
एकत्व पावशील ज्योतीत.
वसंता - स्वामी, हे खूप छान आहे, ज्योतीरूप अपत्यप्राप्ती म्हणजे काय ?
स्वामी - कावेरी अनंतात विलीन होईल, तिचा देह मागे राहणार नाही. वैष्णवीचेही तसेच होईल.
ध्यानसमाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा