रविवार, २८ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" व्यक्तिगत आवडनिवडीने अंतर्ज्ञानाला झोकाळले आहे. "


प्रस्तावना 


          चौथ्या प्रकारचे पाप म्हणजे ऋषी, मुनींना त्रास देणे. स्वामींनी मला प्रस्तावनेत या चार प्रकारच्या पापांविषयी लिहिण्यास सांगितले. 

           या पुस्तकात कर्मकायदा सत्ययुगात कसा कार्य करेल याविषयी लिहिले आहे. जगदोद्धाराच्या आड येणाऱ्या चौथ्या प्रकारच्या पापीजनांना स्वामींनी उघडकीस आणले. स्वामी म्हणाले, " त्यांना शाप दे, वैकुंठ एकादशीला त्यांच्या प्रतिमा यज्ञकुंडात जाळून टाक."

            मी म्हणाले," मी हे कसं करू ? मला माहित नाही ." स्वामी म्हणाले," ते जहरी आहेत."

            सत्ययुग आता सुरु होत आहे आणि २८ वर्षात ते पूर्णपणे उदयास येईल. त्यावेळी सर्वजण परमेश्वराचे पूर्णत्व अनुभवतील. 

            सत्ययुगाच्या उदयास अडथळा तरी कोणता आहे? ह्या पुस्तकात त्याच विवरण केलं आहे. 

           कृपा करून काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर करा. 

जय साईराम 

सत्यमेव जयते

वसंता साई  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २५ मार्च, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " दिव्यत्व आपला खरा स्वभाव आहे, हे सत्य जाणून कोणत्याही गोष्टीने संभ्रमित न होणे हे ज्ञानाचे सौंदर्य आहे. " 

प्रस्तावना 

            धर्म धर्माचं रक्षण करतो आणि अधर्माचा नाश करतो. तमीळ भाषेत एक म्हण आहे, ' देवाची चक्की संथ पण निःसंशय दळतेच .' मानवी कायदा ताबडतोब शिक्षा करतो. दैवी कायदा अचूक वेळी शिक्षा करतो. जर कोणी धर्माने वागण्यात कुचराई केली तर धर्म त्याचा संहार करतो. 

              ' माय डियर स्टुडंट्स ' ह्या पुस्तकात पान नं. १०४ वर स्वामी म्हणतात, " महान ऋषी, ज्ञानी किंवा संताला दुखावणारी व्यक्ती जगाच्या कल्याणास अडथळा असते. दुःखावेगाने त्या साधुने क्रोधाचा एक शब्द जरी उच्चारला तरी तो शाप ठरतो."

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात.....

जय साईराम   

मंगळवार, २३ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३९

वैश्विक पुस्तकालय 

१५ ऑगस्ट २००८ संध्याकाळचे ध्यान 

स्वामी - मी तुझ्या ह्या पुस्तकाची सर्व प्रकरणे का घेतो हे तुला माहिती आहे का ?आपण ध्यानात संभाषण करतो. तू हे सर्व संभाषण लिहून तुझे भाव व्यक्त करतेस. तुझे लेखन जेव्हा मी वाचतो, तेव्हा माझे भाव उद्भवतात. मी ते अंतरिक्षामध्ये पाठवतो. प्रथम भाव त्यानंतर विचार अखेरीस लेखन करून तू ते शब्दबद्ध करतेस. जेव्हा मी ते शब्द वाचतो तेव्हा माझे भाव आणि विचार तुझ्या भाव विचारांशी जोडले जातात. मी त्यांना अंतरिक्ष व्यापून टाकण्यासाठी तेथे पाठवतो. मी तुझी पुस्तके माझ्या हस्ते का प्रकाशित करत नाही असे तू पूर्वी मला विचारले होतेस. मी तुझी पुस्तके माझ्या हातानी अंतरिक्षात प्रकाशित करतो. जर मी ती बुकस्टॉलवर ठेवली असती तर काहींनी वाचली असती काहींनी नाही. काहींनी विश्वास ठेवला असता तर काहींनी नाही. अंतरिक्षातील बुकस्टॉल मध्ये प्रकाशित केल्याने सत्य सर्वांपर्यंत पोहोचेल. 

हे सत्य आहे. ह्याच रितीने सत्य सर्वत्र प्रसारित केले जाऊ शकते. हा आनंद आहे. जर आपल्या भावांनी सर्वांना वेढुन टाकले तरच नवनिर्मिती होऊ शकेल. 

वसंता - स्वामी तुम्ही अनेक गोष्टी सांगत आहात. 

ध्यानसमाप्ती 

प्रत्येक ध्यानामध्ये स्वामी आणि मी संभाषण करतो. आमच्या स्थूलरूपामधून उद्भवलेले भाव अवकाशास व्यापून टाकतात. मी अगोदर लिहिलेल्या पुस्तकांसाठी हे आवश्यक नव्हते. त्या पुस्तकांमध्ये सत्य उघड केले होते. मी ती सर्व पुस्तके स्वामींना पाठवली. स्वामींनी त्याचा स्वीकार केला. परंतु ती त्यांनी अवकाशात पाठवली नाहीत मग ह्याच पुस्तकाची प्रकरणे त्यांनी का मागितली आणि अवकाशात पाठवली ? अनुभव हे त्याचं कारण आहे. जेव्हा स्वामी आणि मी स्थूलरूपात एकत्र येण्याचा अनुभव घेतो तेव्हाच आनंदाची निर्मिती होते. हा अनुभव आणि आनंद ह्यांच्यामुळे कलियुगाची सत्ययुगात परिवर्तन होते. 

मनुष्याचे कुविचार नकारात्मक स्पंदनांनी अवकाशास व्यापून टाकते. ते बदलण्यासाठी आमचे भाव अवकाशात जातात, भाव विचार बनतात व विचार रूप धारण करतात. हे मी बऱ्याच पुस्तकांमध्ये लिहिले आहे. आमचे भाव सत्य अवकाशात गेल्यावर स्पंदनांमध्ये परिवर्तन होऊन जगातील नकारात्मक स्पंदनांचा नाश करतात. आमचा अनुभव नवनिर्मितीचे रूप घेतो. माझी पुस्तके जर प्रशांती निलयममध्ये ठेवली असती तर समस्त जगानी ती वाचली असती वा माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला असता हे आपण सांगू शकत नाही परंतु आता ते वाचोत वा न वाचोत विश्वास ठेवोत या ना ठेवोत सर्वांमध्ये स्पंदने प्रवेश करून त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवतील. हे सत्ययुग आहे. नवनिर्मिती आहे. 

संदर्भ - वसंतसाईंच्या ' आनंद सूत्र '  ह्या पुस्तकातून  

जय साईराम  

रविवार, २१ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " प्रज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान. हे परमज्ञान आपल्या प्रत्येकामध्ये आहे."


प्रस्तावना 

            तिसऱ्या प्रकारचे पाप धर्मग्रंथांशी संबंधित आहे. ह्या ग्रंथांनी आपल्याला धर्म, नियम , व धर्माच्या आज्ञा आखून दिल्या आहेत. शास्त्र म्हणजे नुसते वरवरचे नियम नसून पूर्वजांची आपल्याकडे सोपविण्यात आलेली पिढ्यानपिढ्याची शिकवण आहे. धर्मग्रंथ म्हणजे काय ? मानवाने शास्त्रोक्त जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या धार्मिक विधी व नियम याविषयी वचने व आज्ञा असलेले ग्रंथ म्हणजेच धर्मग्रंथ. उदाहरणार्थ, जन्मापासून निरनिराळी धार्मिक कार्ये काय असतात हे ते सांगतात. मुलाच्या जन्मापासून अकराव्या दिवशी घराची शुद्धी करून नंतरच बारसे केले जाते. त्यानंतर मुलाचा ' अक्षर अभ्यास ' सुरु होतो. नंतर मुंज आणि त्यानंतर  लग्न होते. 

           धर्मग्रंथांनी जीवनाची प्रत्येक अवस्था नियमांच्या चौकटीत बसवली आहे. जर आपण त्याचे शास्त्रोक्त अनुसरण केले नाही तर शास्त्रे आपल्याला शिक्षा करतील. हे धर्मग्रंथ दुर्लक्षिणे हे तिसऱ्या प्रकारचे पाप होय. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १८ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " एखाद्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत उमटलेले भावच मनावर उमटलेले दीर्घ ठसे बनतात. " 


प्रस्तावना 

          पाप चार प्रकारची असतात. 

          पहिला प्रकार म्हणजे चूक आहे हे जाणूनही केलेलं कृत्य. एखादी व्यक्ती जेव्हा देशाचा कायदा, त्याचे नियम, शिस्त पाळत नाही तेव्हा ते दुसऱ्या प्रकारचे पाप होते. राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक देशाचा विशिष्ट कायदा असतो. तो न पाळणाऱ्याला शिक्षा होते. जे अप्रामाणिक आहेत, आपल्या भूमिच्या कायद्याचा अवमान करतात, शहराचे किंवा गावाचे नियम पाळत नाहीत त्यांना शिक्षा भोगावी लागते. हे सर्व मानवी जीवनाचे ढोबळ नियम आहेत. जे देशाचा कारभार चालवतात, जसं की सरकारी कार्यालये, पोलीस, न्याय संस्था हे सर्व, कायदा  अंमलात आणून त्याला आधारही देतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १४ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यांसाठी वेदांचा उपयोग एवढाच असतो जेवढा एखाद्या पाण्यानी तुडुंब भरलेल्या ठिकाणी असलेल्या छोट्याशा सरोवराचा !"


प्रस्तावना 

           पाप म्हणजे काय ? एखादी गोष्ट वाईट आहे हे ठाऊक असूनही ती कृती करणे म्हणजे पाप. जर तुम्हाला माहीत आहे की हे काम वाईट आहे, तर ते घडायलाच नको. तरीसुद्धा जर तुम्ही ते केलत तर ते पाप होईल. प्रत्येकास सद्सद् विवेकबुद्धी आहे. ती आपल्याला ' हे वाईट आहे ' असे सांगत असते. असे असताना आपण पाप का करतो ? त्याला कारण आपला अहंकार, मत्सर आणि क्रोध असतो. हे पाप आहे. 

          साधूला अहंकार किंवा स्वार्थ नसतो, म्हणून तो पाप करू शकत नाही. त्याला काहीच बंधने किंवा स्वार्थ नसतात. म्हणूनच कर्म त्याला स्पर्श करत नाहीत. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ११ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

 

महाशिवरात्री संदेश 


शिवरात्रीस आपण काय केले पाहिजे, आणि परमेश्वराचे नामस्मरण करताना आपल्या मनातील भाव कसा असायला पाहिजे ह्याविषयी भगवान बाबा सांगतात. 

प्रेमस्वरूपलारा, 

आज शिवरात्रीचा मंगल उत्सव आहे. सर्व रात्रींमधील ही सर्वात विशेष रात्र आहे. रात्र म्हणजे अंधःकार हे नेहमीचे समीकरण आहे. परंतु ही विशेष रात्र अंधःकाराशी संलग्न नाही. ही रात्र तुम्ही प्रज्ञान, विज्ञान , सुज्ञान आणि तेजाची मंगलरात्र मानली पाहिजे. म्हणून ह्या रात्री आपण शुद्ध मनाने व पवित्र भावनेने ' लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु ' ही प्रार्थना केली पाहिजे. सर्व जीव सुखी होवोत. सर्व जीवांचे हृदय शुद्ध आणि पवित्र होवो. सर्वांना सुबुद्धी लाभो - धोयोयोनः प्रचोदयात्

काल रात्री मी १ वाजता येथे आलो. सर्व भक्त आणि विद्यार्थी आंनदाने भजने गात होते. परंतु ह्या भक्तांमधील खरे भक्त कोण ? जे स्थिर मनाने आणि अनासक्त भावनेने परमेश्वराचे नामस्मरण करतात ते खरे भक्त होय. ह्या हॉलमध्ये हजारो लोकं बसलेले आहेत परंतु ते सर्वजण भक्त नाहीत. त्यांचा देह येथे आहे परंतु मन परमेश्वरावर केंद्रित नाही. म्हणून मनाला ईश्वराभिमुख करणे हीच खरी भक्ती. तुम्ही कोठेही असा परंतु मन मात्र परमेश्वराच्या सान्निध्यात असायला हवे. तुम्हाला तेथे दिव्यत्वाची अनुभूती होऊ शकते. जर तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही झोपू शकता परंतु झोपेत सुद्धा तुमच्या मनात ते दिव्यतत्व असायला हवे. जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा ( सुषुप्ती )- अस्तित्वाच्या ह्या तीन अवस्थांतील ऐक्याच्या अनुभूतीमध्ये, खरे ज्ञान खरी जाणीव सामावलेली आहे. कोणत्याही क्षणी, मनामध्ये दिव्यत्वाची जाणीव ठेवा. केवळ परमेश्वरावरील प्रेमामुळे तुम्ही जागे आहात आणि मध्यरात्रीच्या वेळी येथे येऊन बसला आहात. जर तुमच्या हृदयात प्रेम नसते तर तुम्ही तुमच्या घरी झोपला असता. त्या झोपेचा त्याग करून येथे येऊन झाडाखाली, झाडाला टेकून बसणे हा एक दिव्य अनुभव आहे असे ते मानतात. ही खरी भक्ती आहे. तुम्हाला कोणत्याही सुखसोयी, अन्य कोणताही आनंद, खाणेपिणे कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. शिवरात्र वर्षातून फक्त एकदाच येते असे मानू नका. आपण प्रत्येक रात्र शिवरात्र आहे असे मानले पाहिजे. जेथे मनामध्ये परमेश्वराचे चिंतन चालते, जेथे मनामध्ये उदात्त विचार येतात. तेथे शिवरात्र प्रकट होते. शिवम मंगलम !

जर तुम्ही अहंकाराचे शिंग काढून टाकले नाहीत तर उरते ते शवम (मृत देह ) शिवम आणि शवममध्ये काय फरक आहे ?

अहंकाराचे शिंगासह ते शवम (मृतदेह) आहे. आणि अहंकाराच्या शिंगाविना ते शिवम (मंगल) आहे प्रत्येकाने अहंकाराचा नाश केला पाहिजे. 




*     *     *

जय साईराम 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " आत्मा म्हणजे काय ? ते शुद्ध चैतन्य आहे. जो अविनाशी, अजन्मा, अमर आहे. 


प्रस्तावना 

            ममत्वामुळे आपण कर्माशी बांधले जातो. हेच जन्ममृत्यूच्या चक्राचे कारण होय. आपल्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या भावनांचे विचार बनतात. विचार कृतीत उतरतात. या कृती, चांगल्या अथवा वाईट, त्यांचे मनावर ठसे उमटतात आणि गहिरे संस्कार बनू शकतात. हे संस्कार आपला पुढील जन्म ठरवतात. 

             पत्नी, मुले, कुटुंब, मालमत्ता ह्या विषयांच ममत्व माणसाला पुनः पुनः जन्म घेण्यास कारणीभूत असत. हाच ' कर्मकायदा ' आहे. हे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनीच तत्व आहे. ते माणसाचा पाठलाग करत असते. म्हणूनच कुठलीही कृती सारासार विचार करूनच केली पाहिजे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम  

रविवार, ७ मार्च, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " सर्वकाही परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराचेच रूप आहे. तेथे केवळ परमेश्वरच आहे अन्य काही नाही ."

            आजपासून आपण श्री वसंतसाईंचे अजून एक अत्यंत बोधप्रद असे ' सत्ययुग आणि कर्मकायदा ' ह्या पुस्तकाचे भाग सादर करणार आहोत. 

             आपण - श्री वसंतसाईंच्या शब्दांमधील प्रस्तावनेपासून शुभारंभ करत आहोत. 

*      *     *

सत्ययुग आणि कर्मकायदा

प्रस्तावना 

 

           हे विलक्षण पुस्तक एक नवा विचार आहे. पुस्तक वाचण्यापूर्वी, कृपा करून प्रस्तावना वाचा म्हणजे तुम्हाला ह्या ' कर्मकायदा ' पुस्तकाचा विषय समजण्यास साह्यभूत होईल. 

           कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृतीच कर्म आहे. जर आपण प्रत्येक कृती योग म्हणून भगवंताशी जोडून केली, तर ती आपल्याला स्पर्श करत नाही. ' साई गीता प्रवचनम् ' पुस्तकातील ' कर्मयोग ' या अध्यायात हे मी स्पष्टपणे मांडले आहे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'सत्ययुग आणि कर्मकायदा ' ह्या पुस्तकातून 



उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ४ मार्च, २०२१

 ॐ श्री साईवसंतसाई साय नमः 

सुविचार 

       " प्रेमाला कोणी मर्यादा घालू शकते का ? संकुचित कृती अनिर्बंध प्रेमाची अनुभूती घेऊ देत नाही तर ती केवळ दोष शोधून काढते."

जय साईराम