ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ३९
वैश्विक पुस्तकालय
१५ ऑगस्ट २००८ संध्याकाळचे ध्यान
स्वामी - मी तुझ्या ह्या पुस्तकाची सर्व प्रकरणे का घेतो हे तुला माहिती आहे का ?आपण ध्यानात संभाषण करतो. तू हे सर्व संभाषण लिहून तुझे भाव व्यक्त करतेस. तुझे लेखन जेव्हा मी वाचतो, तेव्हा माझे भाव उद्भवतात. मी ते अंतरिक्षामध्ये पाठवतो. प्रथम भाव त्यानंतर विचार अखेरीस लेखन करून तू ते शब्दबद्ध करतेस. जेव्हा मी ते शब्द वाचतो तेव्हा माझे भाव आणि विचार तुझ्या भाव विचारांशी जोडले जातात. मी त्यांना अंतरिक्ष व्यापून टाकण्यासाठी तेथे पाठवतो. मी तुझी पुस्तके माझ्या हस्ते का प्रकाशित करत नाही असे तू पूर्वी मला विचारले होतेस. मी तुझी पुस्तके माझ्या हातानी अंतरिक्षात प्रकाशित करतो. जर मी ती बुकस्टॉलवर ठेवली असती तर काहींनी वाचली असती काहींनी नाही. काहींनी विश्वास ठेवला असता तर काहींनी नाही. अंतरिक्षातील बुकस्टॉल मध्ये प्रकाशित केल्याने सत्य सर्वांपर्यंत पोहोचेल.
हे सत्य आहे. ह्याच रितीने सत्य सर्वत्र प्रसारित केले जाऊ शकते. हा आनंद आहे. जर आपल्या भावांनी सर्वांना वेढुन टाकले तरच नवनिर्मिती होऊ शकेल.
वसंता - स्वामी तुम्ही अनेक गोष्टी सांगत आहात.
ध्यानसमाप्ती
प्रत्येक ध्यानामध्ये स्वामी आणि मी संभाषण करतो. आमच्या स्थूलरूपामधून उद्भवलेले भाव अवकाशास व्यापून टाकतात. मी अगोदर लिहिलेल्या पुस्तकांसाठी हे आवश्यक नव्हते. त्या पुस्तकांमध्ये सत्य उघड केले होते. मी ती सर्व पुस्तके स्वामींना पाठवली. स्वामींनी त्याचा स्वीकार केला. परंतु ती त्यांनी अवकाशात पाठवली नाहीत मग ह्याच पुस्तकाची प्रकरणे त्यांनी का मागितली आणि अवकाशात पाठवली ? अनुभव हे त्याचं कारण आहे. जेव्हा स्वामी आणि मी स्थूलरूपात एकत्र येण्याचा अनुभव घेतो तेव्हाच आनंदाची निर्मिती होते. हा अनुभव आणि आनंद ह्यांच्यामुळे कलियुगाची सत्ययुगात परिवर्तन होते.
मनुष्याचे कुविचार नकारात्मक स्पंदनांनी अवकाशास व्यापून टाकते. ते बदलण्यासाठी आमचे भाव अवकाशात जातात, भाव विचार बनतात व विचार रूप धारण करतात. हे मी बऱ्याच पुस्तकांमध्ये लिहिले आहे. आमचे भाव सत्य अवकाशात गेल्यावर स्पंदनांमध्ये परिवर्तन होऊन जगातील नकारात्मक स्पंदनांचा नाश करतात. आमचा अनुभव नवनिर्मितीचे रूप घेतो. माझी पुस्तके जर प्रशांती निलयममध्ये ठेवली असती तर समस्त जगानी ती वाचली असती वा माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला असता हे आपण सांगू शकत नाही परंतु आता ते वाचोत वा न वाचोत विश्वास ठेवोत या ना ठेवोत सर्वांमध्ये स्पंदने प्रवेश करून त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवतील. हे सत्ययुग आहे. नवनिर्मिती आहे.
संदर्भ - वसंतसाईंच्या ' आनंद सूत्र ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा