ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यांसाठी वेदांचा उपयोग एवढाच असतो जेवढा एखाद्या पाण्यानी तुडुंब भरलेल्या ठिकाणी असलेल्या छोट्याशा सरोवराचा !"
प्रस्तावना
पाप म्हणजे काय ? एखादी गोष्ट वाईट आहे हे ठाऊक असूनही ती कृती करणे म्हणजे पाप. जर तुम्हाला माहीत आहे की हे काम वाईट आहे, तर ते घडायलाच नको. तरीसुद्धा जर तुम्ही ते केलत तर ते पाप होईल. प्रत्येकास सद्सद् विवेकबुद्धी आहे. ती आपल्याला ' हे वाईट आहे ' असे सांगत असते. असे असताना आपण पाप का करतो ? त्याला कारण आपला अहंकार, मत्सर आणि क्रोध असतो. हे पाप आहे.
साधूला अहंकार किंवा स्वार्थ नसतो, म्हणून तो पाप करू शकत नाही. त्याला काहीच बंधने किंवा स्वार्थ नसतात. म्हणूनच कर्म त्याला स्पर्श करत नाहीत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा