रविवार, २१ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " प्रज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान. हे परमज्ञान आपल्या प्रत्येकामध्ये आहे."


प्रस्तावना 

            तिसऱ्या प्रकारचे पाप धर्मग्रंथांशी संबंधित आहे. ह्या ग्रंथांनी आपल्याला धर्म, नियम , व धर्माच्या आज्ञा आखून दिल्या आहेत. शास्त्र म्हणजे नुसते वरवरचे नियम नसून पूर्वजांची आपल्याकडे सोपविण्यात आलेली पिढ्यानपिढ्याची शिकवण आहे. धर्मग्रंथ म्हणजे काय ? मानवाने शास्त्रोक्त जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या धार्मिक विधी व नियम याविषयी वचने व आज्ञा असलेले ग्रंथ म्हणजेच धर्मग्रंथ. उदाहरणार्थ, जन्मापासून निरनिराळी धार्मिक कार्ये काय असतात हे ते सांगतात. मुलाच्या जन्मापासून अकराव्या दिवशी घराची शुद्धी करून नंतरच बारसे केले जाते. त्यानंतर मुलाचा ' अक्षर अभ्यास ' सुरु होतो. नंतर मुंज आणि त्यानंतर  लग्न होते. 

           धर्मग्रंथांनी जीवनाची प्रत्येक अवस्था नियमांच्या चौकटीत बसवली आहे. जर आपण त्याचे शास्त्रोक्त अनुसरण केले नाही तर शास्त्रे आपल्याला शिक्षा करतील. हे धर्मग्रंथ दुर्लक्षिणे हे तिसऱ्या प्रकारचे पाप होय. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा