ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर आपण अत्यंत एकाग्रतेने एखादी गोष्ट मागितली तर वैश्विक शक्तीकडून आपल्याला त्याचे उत्तर मिळते. "
१
कर्मकायदा - ओळख
स्वामी परमेश्वराचं पितृत्व आणि मानवाच मातृत्व जतन करण्याची शिकवण देतात. फक्त परमेश्वरच सर्वांचा पिता आहे. सर्व मानवजात ही बंधुभगिनी आहेत. जर आपण सर्वांशी प्रेमाने व्यवहार केला तर कर्माचा कायदा निष्प्रभ होईल, मानवी जीवनात तो प्रवेशच करू शकणार नाही.
आपण जन्माच्या वेळी जगात काय घेऊन येतो ? मृत्युसमयी काय बरोबर घेऊन जातो ? काहीच नाही. अस असताना ' मी आणि माझे ' ही भावना का बर निर्माण होते ? याच कारण आपण स्वतःला नाव आणि शरीराशी निगडीत करतो. आपल्याला वाटते की जे काही या शरीराशी संबंधित आहे ते सर ' माझे ' आहे.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा