रविवार, ३० मे, २०२१
गुरुवार, २७ मे, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भक्तीचे विस्तृतीकरण म्हणजेच ज्ञान. "
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
जर एखाद्याने साक्षात्कारी महात्म्यांना मानसिक क्लेश देणारे कृत्य केले तर त्याला त्याचे खूप दुःखद परिणाम भोगावे लागतात. अनेक वर्षांपूर्वी स्वामींजवळ मी वर मागितला होता की जो कोणी मला यातना देईल त्याला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागू नयेत. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे मला खूप चिंता वाटायला लागली. तेव्हा ध्यानात मला एक दृश्य दिसले. त्यात मी त्रिशूलधारी कालीमाता होऊन सर्वांचा संहार केला. त्यांनतर मी कालीमाता, सध्याचे कलियुग आणि खाली म्हणजे रिक्त ह्या तीन अवस्थांचा मेळ घालून ' कली, काली, खाली ' हे प्रकरण लिहिले.
ध्यानात हे दृश्य पाहून नंतर मी रडायला लागले. 'मी अस विध्वंसक रूप का घेतल ? मी अस का म्हणाले ? कोणालाही काही होऊ नये. मला त्रास देणाऱ्या कोणालाही दुःख भोगावे लागू नये.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
रविवार, २३ मे, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ४१
संहार
" जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संहार होत आहे. आत्मपरिक्षण आणि स्वतःमध्ये बदल घडवून प्रत्येकाने स्वतःमधील वाईट, पाशवी वृत्तींचा नाश केला पाहिजे. संहार थांबवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. विश्वकल्याणासाठी सर्वांनी एक होऊन दुष्प्रवृत्ती व कुविचार नष्ट केले पाहिजेत. आणि सद् विचारांचा सर्वत्र प्रसार केला पाहिजे. अधर्माविरुद्ध व दुष्प्रवृत्तींविरुद्ध आता आपण धर्मयुद्ध पुकारू या."असा स्वामींनी इशारा दिला.
२८ ऑक्टोबर १९९९ रोजी स्वामींनी सांगितले की जगाला अनेक आपत्तींचा सामना करावा लागेल. हिमालयातील काही भागांचा संहार होईल. कारगिल युद्धाविषयीही स्वामींनी सांगितले तसेच अमेरिकेत व जगाच्या अनेक भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संहार होईल . भूकंप, विमान दुर्घटना. युद्ध , वादळे ह्या सारख्या अनेक विपत्ती आल्याचे आपण पाहिले.
जगामध्ये घडणाऱ्या ह्या उलथा पालथीने लोक अत्यंत भयभयीत झाले. सर्वत्र प्रार्थना आयोजित करण्यात आल्या. जे लोकं परमेश्वराला मानत नव्हते ते आता मनोभावे भक्ती करू लागले. जेव्हा मनुष्याला संकटांचा सामना करावा लागतो ,जेव्हा मृत्यूचे भय वाटु लागते तेव्हाच त्याला परमेश्वराची आठवण होते. तेव्हा त्याच्या भक्तीमध्ये उत्कटता येते. परमेश्वराचे संरक्षण कवच लाभावे ह्यासाठी तो तळमळतो. ह्याच कारणासाठी पांडवांची माता कुंतीने कृष्णाकडे प्रार्थना केली," मला सतत संकट दे ज्यामुळे मला तुझे कधीही विस्मरण होणार नाही. " आज मनुष्याच्या बाबतीत हेच घडते आहे. पूर्वी तो त्याच्या मर्जीनुसार जीवन जगत होता. भौतिक सुखांच्या मागे धावण्यात व्यर्थ वेळ दवडत होता. आज जगामधील विनाश पाहून तो संरक्षणासाठी परमेश्वराच्या मागे धावतो आहे.
आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा असा विनाश संहार का होतो ? जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो , हिंसेचे प्राबल्य वाढते तेव्हा निसर्गाचा कोप होतो. जर आपण सदाचरणाच्या मार्गावरून वाटचाल केली तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चांगल्या वाईट दोन्ही साठी आपणच जबाबदार असतो. आपले दुर्गुण व दुष्कृत्ये ह्यांची नकारात्मक कंपने बनतात व वातावरणात भरून राहतात. हे विनाशास कारणीभूत होते. जसे प्रत्येकाच्या संस्कारानुसार त्याला कर्म भोगावी लागतात. तसेच प्रत्येक देशाच्या इतिहास व संस्कृती नुसार देशाची कर्मे असतात. १९ सप्टेंबर २००१ रोजी स्वामींनी हे स्पष्ट करून सांगितले.
परमेश्वर लोकांच्या संरक्षणार्थ अवतार घेत नाही. तो धर्माच्या संरक्षणासाठी अवतार घेतो. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माला दुःख सोसावे लागते तेव्हा निसर्ग कोपतो व आपत्ती कोसळतात.
आपली भारतमाता आध्यात्मिक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ होती. येथे चारित्र्य संपन्नता होती. आता मात्र मूल्ये हरवत चालली आहेत. द्वेष, घृणा, वैरभाव, खोटेपणा, लोभ ह्यामुळे आपण प्रेमाच्या पारंपरिक ठेव्याला विसरलो आहोत. घराघरातील हृदयातील प्रेम शुष्क झाले आहे. स्वार्थासाठी मनुष्य काहीही करण्यास तयार आहे. हे ह्या विनाशाचे कारण आहे. व्यापक आणि निःस्वार्थ प्रेमाची जोपासना करा. हा एकमात्र उपाय आहे.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' वसंतसाई सत् चरित्र भाग- १ ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण असते तेव्हा मन आपोआपच नियंत्रित होते. "
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
अनेकांना माझा मत्सर वाटतो. द्वेष आणि शत्रुत्वाच्या भावनेने ते अफवा पसरवतात. मी स्वामींच दर्शन घेऊ नये म्हणून त्यांनी अनेक क्लूप्त्या केल्या. यापूर्वी मी स्वामींजवळ रडून वर मागितला होता की माझ्याविरुद्ध कारस्थानं करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची फळ भोगायला लागू नयेत. कर्माच्या कायद्यानुसार आपण केलेल प्रत्येक कृत्य प्रतिबिंब, प्रतिक्रिया व प्रतिध्वनी होऊन आपल्याकडेच परत येत असत. आपल्या आयुष्यातील सर्व अनुभव या नियमावर आधारित आहेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
गुरुवार, २० मे, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेथे मनुष्याची नजर जाते त्यामागे त्याचे मन धावते आणि इच्छांचा जन्म होतो."
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
तारीख ११ डिसेंबर २००८ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, मला खूप भिती वाटते. तुम्हाला काही होऊ नये.
स्वामी - भ्यायच कशाला ? परमेश्वराला काय होणार ? तुला आणि मला काहीही होणार नाही. तुला नेहमीच हे भय वाटत आले आहे. कोणीही आपली ताटातूट करू शकणार नाही.
वसंता - स्वामी, जे तुमच्या अगदी जवळ आहेत, ते आपल्या ताटातुटीला कारणीभूत आहेत... तेच जास्त उपद्रवी आहेत.
स्वामी - तू त्या सर्वांचा संहार कर.
वसंता - स्वामी, दोन वर्षांपूर्वी मी ' कली काली खाली ' नावाच प्रकरण लिहिले आणि म्हणाले की जे आपल्या दोघांच्या आड येतील, आपल्याला भेटण्यापासून परावृत्त करतील. त्या सर्वांचा मी संहार करीन.
स्वामी - होय. तू असे बोलतेस, लिहितेसही, पण नंतर रडतेस, आणि म्हणतेस, ' नाही नाही..... कोणालाही त्रास होऊ नये.'
वसंता - ते जरी माझ्याशी कितीही वाईट वागले, तरी त्यांना काही त्रास होऊ नये. तुम्ही म्हणता न, ' देणे आणि क्षमा करणे ' हे दैवी गुण आहेत म्हणून...
स्वामी - तू क्षमा करू शकतेस..... पण ते त्याच चुका पुनः पुनः करताहेत. काय करणार ? कृष्णाने शिशुपालाचे शंभर अपमान सहन केले आणि नंतर त्याचा वध केला.
वसंता - स्वामी, वडील बिघडलेल्या मुलांना शिक्षा करू शकतात, पण आई चांगल्या व वाईट मुलात भेदभाव करू शकत नाही. ती दोघांवरही सारखाच प्रेमवर्षाव करते. मी कोणालाही शिक्षा करू शकत नाही.... मी नाही करू शकत.
स्वामी - दुर्योधन जन्माला आला तेव्हा त्याची पत्रिका पाहून भाकित केले होते की त्याला राजमहालात न ठेवता जंगलात सोडावे. नाहीतर तो अतिशय दुष्ट माणूस बनून त्याच्या संपूर्ण वंशाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. पुत्रावरील ममत्वामुळे गांधारीने त्याचा त्याग करण्यास नकार दिला आणि त्यामुळे तिची ९९ मुले मारली गेली. संपूर्ण वंशाचा विनाश झाला. त्याचप्रमाणे तू मला आता चुकीचे वागणाऱ्यांना शिक्षा करण्यापासून परावृत्त करत आहेस. सत्ययुगाच्या विलंबाचे हेच कारण आहे.
वसंता - स्वामी, मी करू तरी काय ? मला सांगा नं.
स्वामी - आधी, ' मला त्रास देणाऱ्यांना कर्माच्या कायद्याचे परिणाम भोगावे लागता कामा नयेत !' अस म्हणून तू कर्माचा कायदाच बांधून ठेवलास. काही मोजक्या व्यक्तिंमुळे वैश्विक मुक्तीमध्ये अडथळा निर्माण झाला. तू पूर्वी लिहिले होतेस की जरी सीतेने तिचे पातिव्रत्य आणि सहनशीलता सिद्ध केली तरीही तिने अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवा होता. आता हा अन्याय तू का बर सहन करते आहेस ? सर्वांचा संहार कर.
वसंता - स्वामी, मी माझ त्रिशूळ घेऊन जे कोणी मला तुमच्याजवळ येण्यास अडथळा निर्माण करताहेत त्यांचा संहार करीन.
स्वामी - तू त्यांचा भावनिक संहार कर. म्हणजे कर्मकायदा कार्य करू शकेल. कृष्णाने अर्जुनास आपल विश्वरूप दाखवून म्हटले,' मी त्यांना अगोदरच मारले आहे. तू फक्त साधनमात्र आहेस.' आता तू फक्त निमित्तकारण हो. त्यांना क्षमा करू नकोस. माझ्याकडून तुला मिळालेल्या वरामुळे कर्मकायदा निष्प्रभ झाला आहे. तू त्यांचा भावनात्मक संहार केलास तरच कर्मकायदा आयुधासारखा कार्यरत होईल. कर्माच्या कायद्याने काहीजणांचा संहार झाला, तरच इतरांसाठी सत्ययुग सुरु होईल.
वसंता - मला कळतय स्वामी. परमेश्वर आणि कर्माच्या कायद्यामधील सूक्ष्म संबंध मला कळताहेत. कृपा करून मला क्षमा करा. आता मी तुमच्या संकल्पामध्ये अडथळा आणणार नाही.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साईराम
रविवार, १६ मे, २०२१
गुरुवार, १३ मे, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मातेचा त्याग एवढा महान असतो की फक्त तिच्यापुढे नतमस्तक झाले तरी पुरेसे आहे. "
१
कर्मकायदा - ओळख
तारीख २० डिसेंबर २००८ ध्यान
वसंता - स्वामी, त्यांनी माझ्यावर आणि माझ्या पुस्तकांवर बहिष्कार घातला. ते म्हणतात, ' आम्हाला तुझ ज्ञान नको ' ठीक आहे. मी माझ्या पुस्तकांसह निघून जाते ! तुम्हाला हव ते तुम्ही करा !
स्वामी - कुठे बर जाशील तू ? तुझी पुस्तक भले तू घेऊन जाशील, पण तुझे भाव तर इथेच राहतील नं ! ते भाव सर्व सृष्टी व्यापित आहेत. हे कोण बर थोपवू शकेल ? ते तुझ्या स्थूल शरीरावर आणि पुस्तकावर बंदी घालू शकतील, पण तुझे भाव कसे थोपवतील ? तुझी पुस्तके जे वाचतात, त्यांच्यामध्ये निर्माण होणारे भाव कोणी थोपवू शकेल का ?
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
रविवार, ९ मे, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपली चिंता व आपले अश्रू जे पूर्वनिर्धारीत असते त्यामध्ये बदल करू शकत नाहीत त्याऐवजी तुम्ही परमेश्वरासाठी अश्रू ढाळा, तुमच्या चिंतेचे त्याच्या दर्शनाच्या विनवणीमध्ये परिवर्तन करा. "
१
कर्मकायदा - ओळख
परमेश्वराचे स्वरूप कसे असते, अवतार कसा अवतरीत होतो आणि कर्माच्या कायद्याचे कार्य कसे चालते यासंबंधीच्या ज्ञानावर मी प्रकाश टाकत आहे. हे सर्व मी लिहू शकते का?
स्वामींच्या दर्शनापासून वंचित करणाऱ्यांनी मला पुस्तकेही लिहू नको म्हणून सांगितले. मी फक्त जे स्वामी मला सांगतात तेच लिहिते. मला जर पुस्तके लिहिण्यास प्रतिबंध केला तर जगाला ह्या ज्ञानाचा फायदा कसा मिळणार ? हे पुस्तक कर्मकायद्याविषयी आहे. कर्मकायद्याविषयी ज्ञान झाले तरच लोक चुका करण्यापासून परावृत्त होतील.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
गुरुवार, ६ मे, २०२१
रविवार, २ मे, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" केवळ विनयशीलता तुम्हाला इच्छांपासून मुक्ती देईल."
१
कर्मकायदा - ओळख
माणसा - माणसाच्या विचारानुसार कर्मकायदा वेगवेगळ्या रितीने कार्य करतो. कोणालाही त्याचे सूक्ष्मस्वरूप समजत नाही. रोग आणि त्याचे औषध हे दोन भिन्न माणसांसाठी सारखेच लागू पडत नसते. दोघांच्या शरीराच्या गुणधर्मानुसार ते कार्य करते. कर्मकायदाही तसेच कार्य करतो.
एक व्यक्ती दुसऱ्यास दुखवते, तेव्हा ते दुःष्कृत्य होते. त्यासाठी त्याला शिक्षा भोगावी लागते. शिक्षा ताबडतोब होईल किंवा काही काळाने. तीच व्यक्ती जेव्हा साक्षात्कारी महात्म्याला दुखवते, तेव्हा अधिक कठोर शिक्षा होते. तर मग साक्षात परमेश्वराला दुखवल तर शिक्षेची तीव्रता किती असेल बर ?
एखाद्याने यावर चिंतन केल, तर त्याच्या लक्षात येईल की कर्मकायद्याचे कार्य तीन निरनिराळ्या प्रकारानी चालते.
सहसा अस म्हटल जात की समोरचा आपल्याशी वाईट वागला तरी त्याच्याशी चांगलेच वागावे. क्षमा करणे आणि विसरून जाणे हे दैवी गुण आहेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम