ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वर म्हणजेच प्रेम, ही शिकवण होय आणि प्रेम म्हणजेच परमेश्वर हे आचरण होय."
१
कर्मकायदा - ओळख
मी सतत अनेक पुस्तके लिहिते आहे. माझे भाव मुक्ती निलयममधील मुक्ती स्तूपात प्रवेशून नंतर संपूर्ण अवकाश व्यापतात. ते सर्वदूर पसरतात आणि सर्वांमध्ये प्रवेश करतात. जे माझी पुस्तके वाचतात, त्यांच्यामध्ये हे सद् भाव प्रवेश करतात. हे सर्व कोण थांबवू शकेल ?
क्षणाक्षणाला आपल्या मनात उठणाऱ्या भावनांचे संस्कार बनतात. तेच आपले जीवन घडवतात. या भावना व्यक्त करण्याऐवजी तुम्ही त्या सहसा आतच दडविता. क्रोध, द्वेष, अहंकार, गर्व आणि मत्सर हे सर्व दुर्गुण म्हणजे मनातील कचराच होय. तुम्ही हे दुर्गुण लपविलेत तरीही कर्मकायदा सतत कार्यरत असतो आणि तो त्याचे कर्तव्य करण्यास कधीही चुकत नाही.
माझ्या लिखाणातून माझे शुद्ध भाव व्यक्त होतात. ही भावकंपने स्तूपात प्रवेश करतात आणि जगातल्या सर्वांना त्याचा फायदा होतो. हा आहे माझा प्रेमकायदा. कोणीही यातून सुटू शकणार नाही. माझे भाव विश्वात्मक प्रेम प्रकट करतात. तुमच्या भावना ' मी आणि माझे ' दर्शवतात.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा