रविवार, ३० मे, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जेव्हा आपले परमेश्वराप्रती असणारे प्रेम सर्व मर्यादा ओलांडते तेव्हा देहाच्या मर्यादाही ओलांडल्या जातात. " 

२ 

परमेश्वर आणि कर्मकायदा 

          ह्या घटनेनी मला इतक्या वेदना झाल्या की मी ते प्रकरण प्रेमसाई पुस्तकात घातलच नाही. मी ते कोणत्याच पुस्तकात घातल नाही. माझा स्वभावच असा आहे.मी अशी लहानाची मोठी झाले. जेव्हा मी स्वामींना सांगितले ," देणे आणि क्षमा करणे हे दैवीगुण आहेत," तेव्हा स्वामींनी शिशुपालाचे उदाहरण दिले. शिशुपालाने त्याचा संहार होण्यापूर्वी श्रीकृष्णाचा शंभर वेळा अपमान केला होता. शंभर अपमान सहन केल्यावरच श्रीकृष्णाने त्याला मारले. त्याचप्रमाणे, स्वामी मला म्हणाले की ज्यांनी मला त्रास दिला आहे, त्यांना मी अनेकदा क्षमा केली आहे, तरीही ते चुका करतच आहेत. किती वेळा हे अस झाल आहे ? प्रत्यक्ष नाहीतरी अप्रत्यक्षपणे ते मला त्रास देतच आहेत.    
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा