ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेथे मनुष्याची नजर जाते त्यामागे त्याचे मन धावते आणि इच्छांचा जन्म होतो."
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
तारीख ११ डिसेंबर २००८ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, मला खूप भिती वाटते. तुम्हाला काही होऊ नये.
स्वामी - भ्यायच कशाला ? परमेश्वराला काय होणार ? तुला आणि मला काहीही होणार नाही. तुला नेहमीच हे भय वाटत आले आहे. कोणीही आपली ताटातूट करू शकणार नाही.
वसंता - स्वामी, जे तुमच्या अगदी जवळ आहेत, ते आपल्या ताटातुटीला कारणीभूत आहेत... तेच जास्त उपद्रवी आहेत.
स्वामी - तू त्या सर्वांचा संहार कर.
वसंता - स्वामी, दोन वर्षांपूर्वी मी ' कली काली खाली ' नावाच प्रकरण लिहिले आणि म्हणाले की जे आपल्या दोघांच्या आड येतील, आपल्याला भेटण्यापासून परावृत्त करतील. त्या सर्वांचा मी संहार करीन.
स्वामी - होय. तू असे बोलतेस, लिहितेसही, पण नंतर रडतेस, आणि म्हणतेस, ' नाही नाही..... कोणालाही त्रास होऊ नये.'
वसंता - ते जरी माझ्याशी कितीही वाईट वागले, तरी त्यांना काही त्रास होऊ नये. तुम्ही म्हणता न, ' देणे आणि क्षमा करणे ' हे दैवी गुण आहेत म्हणून...
स्वामी - तू क्षमा करू शकतेस..... पण ते त्याच चुका पुनः पुनः करताहेत. काय करणार ? कृष्णाने शिशुपालाचे शंभर अपमान सहन केले आणि नंतर त्याचा वध केला.
वसंता - स्वामी, वडील बिघडलेल्या मुलांना शिक्षा करू शकतात, पण आई चांगल्या व वाईट मुलात भेदभाव करू शकत नाही. ती दोघांवरही सारखाच प्रेमवर्षाव करते. मी कोणालाही शिक्षा करू शकत नाही.... मी नाही करू शकत.
स्वामी - दुर्योधन जन्माला आला तेव्हा त्याची पत्रिका पाहून भाकित केले होते की त्याला राजमहालात न ठेवता जंगलात सोडावे. नाहीतर तो अतिशय दुष्ट माणूस बनून त्याच्या संपूर्ण वंशाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. पुत्रावरील ममत्वामुळे गांधारीने त्याचा त्याग करण्यास नकार दिला आणि त्यामुळे तिची ९९ मुले मारली गेली. संपूर्ण वंशाचा विनाश झाला. त्याचप्रमाणे तू मला आता चुकीचे वागणाऱ्यांना शिक्षा करण्यापासून परावृत्त करत आहेस. सत्ययुगाच्या विलंबाचे हेच कारण आहे.
वसंता - स्वामी, मी करू तरी काय ? मला सांगा नं.
स्वामी - आधी, ' मला त्रास देणाऱ्यांना कर्माच्या कायद्याचे परिणाम भोगावे लागता कामा नयेत !' अस म्हणून तू कर्माचा कायदाच बांधून ठेवलास. काही मोजक्या व्यक्तिंमुळे वैश्विक मुक्तीमध्ये अडथळा निर्माण झाला. तू पूर्वी लिहिले होतेस की जरी सीतेने तिचे पातिव्रत्य आणि सहनशीलता सिद्ध केली तरीही तिने अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवा होता. आता हा अन्याय तू का बर सहन करते आहेस ? सर्वांचा संहार कर.
वसंता - स्वामी, मी माझ त्रिशूळ घेऊन जे कोणी मला तुमच्याजवळ येण्यास अडथळा निर्माण करताहेत त्यांचा संहार करीन.
स्वामी - तू त्यांचा भावनिक संहार कर. म्हणजे कर्मकायदा कार्य करू शकेल. कृष्णाने अर्जुनास आपल विश्वरूप दाखवून म्हटले,' मी त्यांना अगोदरच मारले आहे. तू फक्त साधनमात्र आहेस.' आता तू फक्त निमित्तकारण हो. त्यांना क्षमा करू नकोस. माझ्याकडून तुला मिळालेल्या वरामुळे कर्मकायदा निष्प्रभ झाला आहे. तू त्यांचा भावनात्मक संहार केलास तरच कर्मकायदा आयुधासारखा कार्यरत होईल. कर्माच्या कायद्याने काहीजणांचा संहार झाला, तरच इतरांसाठी सत्ययुग सुरु होईल.
वसंता - मला कळतय स्वामी. परमेश्वर आणि कर्माच्या कायद्यामधील सूक्ष्म संबंध मला कळताहेत. कृपा करून मला क्षमा करा. आता मी तुमच्या संकल्पामध्ये अडथळा आणणार नाही.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा