गुरुवार, ६ मे, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " एकदा का परमेश्वराने आपल्यामध्ये प्रवेश केला की हळू हळू आपली पूर्व कर्म नष्ट होऊ लागतात."


कर्मकायदा - ओळख 

            येशू ख्रिस्त म्हणाले," एखाद्याने तुमच्या गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा." सर्वांनी ही शिकवण अनुसरली तर सर्वांची कर्म कमी होतील. बालपणापासून मी अशाप्रकारेच वागत आले आहे. कोणी मला दुखवल किंवा माझ्याशी वाईट वागले, तर मी स्वतःला शिक्षा करून घेत असे. मला वाटे की,' दोष माझ्यात आहे.' हे दोष शोधण्यासाठी मी आत्मपरीक्षण करीत असे. हा माझा स्वभाव आहे. ह्या स्वभावामुळे मी स्वामींकडून वर मिळवला की ज्या लोकांनी मला स्वामींचे दर्शन घेण्यास अडवले, ज्यांनी मला वाईट वागणूक दिली आणि मला रडवले त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागू नयेत. 
          आता स्वामींनी त्याचे नवीन स्पष्टीकरण दिले आहे. 
           मी स्वामींच्या अवतारकार्यासाठी अवतरले आहे, म्हणूनच मी विश्वमुक्ती मागितली आहे. आता काही लोक अवतारकार्याच्या विरुद्ध कृत्ये करत आहेत, त्यामुळे विश्वमुक्तीच्या कार्यात खंड पडून सत्ययुगाचा उदय लांबत जात आहे. कर्माचा कायदा सुरळीतपणे कार्यरत होऊन सत्ययुग येण्यासाठी स्वामींनी मला दिलेले वर मागे घेण्यास सांगितले. ज्यांनी अवतारकार्यात अडथळा आणला, त्यांना कर्मकायदा नक्कीच शिक्षा करेल.  
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा