रविवार, २७ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार
 
" जीवाला सत्याप्रत नेणारी यात्रा म्हणजे सूक्ष्म जगत होय. "

२ 
 
परमेश्वर आणि कर्मकायदा 

           कर्मकायद्याच्या आदेशानुसार माणसाने केलेल्या दुष्कृत्यासाठी त्याला शिक्षा आणि दुःख भोगावीच लागतात. हा यमराजाचा हिशोब आहे. मला मिळालेल्या वरामुळे कर्मकायदा कार्यरत होऊ शकत नाही आणि म्हणूनच शिक्षाही नाहीत. मी यमराजाचे हात बांधून ठेवलेत. मी ते बंध मोकळे केले तरच प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब संपेल आणि त्यांना मुक्ती मिळेल. 
तारीख ११ डिसेंबर २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, मला ' परमेश्वर आणि कर्मकायदा ' समजत नाहीये. 
स्वामी - तू जर काही न करता शांत राहिली असतीस, तर कर्मकायद्यानुसार त्यांना शिक्षा झाली असती. परंतु तू त्यांना कर्मातून सोडविण्यासाठी नुसता वरच मागितला नाहीस तर त्यांच्यावर ' आयुष्यमान भव, दीर्घायु होवोत ' म्हणून कविताही रचल्यास. तू दोन मार्गांनी त्याचं संरक्षण केल्यामुळे कर्मकायदा कार्यरत  होण्यास अडथळा आला आहे. आता कर्मकायदा कार्यरत होण्याचा मार्गच उरला नाही. 
वसंता - आता मी काय करायला हवे, स्वामी ?
स्वामी - वैकुंठ एकादशीला सर्वांचा प्रतीकात्मक बळी दे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २४ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " महाकारण जगतात जीव सत्याशी म्हणजेच परमेश्वाशी एक होतो. 

परमेश्वर आणि कर्मकायदा 

दुर्योधनाशिवाय कर्मकायदा कार्यरत होऊच शकता नसता आणि सर्वजण जिवंत राहिले असते. ह्या एका व्यक्तीमुळे इतर अनेकांच्या संहारासाठी कर्मकायदा क्रियाशील झाला. 

म्हणूनच ..... 

दुर्योधन  - कारण 

कर्मकायदा , जीवसंहार - कार्य 

त्याचप्रमाणे, 

अर्जुन - कारण 

परमेश्वरच कालरूप, युद्धातील विध्वंस - कार्य 

मला उपद्रव करणाऱ्यांना शिक्षा होणं - कारण 

सत्ययुगाची पहाट आणि विश्वमुक्ती - कार्य 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

बुधवार, २३ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४२

आगळे वेगळे अती वैशिष्ट्य

         गर्भामध्ये बालकाचा जन्म कसा होतो हे स्वामींनी स्पष्ट करून सांगितले. ७ व्या दिवशी गर्भ तयार होतो. ३० ते ६० दिवसाच्या कालावधीत सर्व अवयव आणि इंद्रिये विकसित होतात. २१० व्या दिवशी जीव शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि प्रकृती आणि त्या पाठोपाठ परमेश्वर (आत्मनिवासी ) येतो. ह्याचे हे व्यावहारिक प्रात्यक्षिक आहे. प्रकृती म्हणजे हात, पाय, मस्तक असे अवयव आहेत आणि ते साकारल्या नंतर सत्य प्रवेश करते. 

         सुरुवातीला सर्व अवयव बनतात. त्यानंतर प्राणशक्ती प्रवेश करते. शरीराचे भाग प्रेमशक्तीचे प्रतिनिधित्व करते. ते एकत्र कार्य करतात. जर एखादा अवयव काम करत नसेल तर त्यामुळे सर्व शरीरावर त्याचा परिणाम होतो. सर्व अवयवांच्या रूपाने प्रेम विस्तार पावते. आत्मतत्वाच्या रूपाने सत्य प्रवेश करते व तेथे स्थित होते. असे कार्य चालते. 

          त्याचप्रमाणे अखिल सृष्टीचे कार्यही प्रेमाद्वारे चालते. येथे सर्व भाग ऐक्य भावनेने कार्य करतात. ते सुरक्षित आहे. ते सत्ययुग आहे. तथापि जेव्हा एखादा अवयव योग्य तऱ्हेने कार्य करत नसेल तर इतर सर्वांवर त्याचा परिणाम होतो. हे कलियुग आहे. शरीराच्या भागांसारखे, समस्त सृष्टी म्हणजे परमेश्वराचे अवयव आहेत. जेव्हा ते ऐक्यभावाने, ऐकतानतेने कार्य करतात केवळ तेव्हाच मुक्ती प्रदान करणे शक्य आहे. 

अनु नावाच्या स्त्रीभक्ताने अम्मांना प्रश्न विचारला :

         " अम्मा, तुम्ही जेव्हा एखाद्या भक्ताकडे दृष्टिक्षेप टाकता तेव्हा स्वामींप्रमाणे तुम्ही सुद्धा त्याची कर्म पाहू शकता का ? आणि जर पाहू शकत असाल तर स्वामींसारखे तुम्हीही त्यांच्या कर्मात हस्तक्षेप करणार नाही का ? " अम्मांनी हा प्रश्न स्वामींना विचारला त्यावर स्वामी म्हणाले ," त्यावर चिंतन कर " आदिमूलम स्वतःला दोन भागात विभागते. शिवाच्या संकल्पाने हे घडते. कारण शिव क्रियाशक्तीस प्रकट करते (विश्व, प्रकृति ). 

          गवताच्या पात्यापासून ब्रम्हापर्यंत सर्वकाही प्रकृतिमयम आहे. ही सर्व प्रकृतिचीच रूपे आहेत. शुद्ध सत्व हा प्रकृतिचा स्वभाव आहे. स्वामी आदिमूलम  आणि अम्मा आदिशक्ती आहेत. त्या क्रियाशक्ती असल्यामुळे प्रत्येक जीवाच्या कर्मांची त्यांनाही जाणीव आहे. तथापि जरी त्या सर्व जीवांची कर्म जाणत असल्या तरी त्यांचा मातृभाव त्यांच्याही पलीकडे जातो. त्या दयादेवी आहेत व सर्वांवर करुणेचा वर्षाव करून त्या सर्व कर्मांचा संहार करतात. ह्या जगामध्ये वाईट मूल असू शकते पण कधीही वाईट माता नसते. अम्मा सर्वांची कर्मे नष्ट करून त्यांना पुन्हा सुमार्गावर घेऊन जातात. आता हे कार्य प्रचंड प्रमाणात चालू आहे. मातेची आस्था आणि संरक्षण चांगल्या मुलांपेक्षा वाईट मुलांसाठी अधिक असते. तिचे त्यांच्याकडे अधिक लक्ष असते. त्या मुलांना मातेची अधिक गरज असल्यामुळे ती त्यांच्यावर अधिक करुणावर्षाव करते. मातेकडे पक्षपातीपणा नसतो. देह नाशवंत आहे. देहाच्या मृत्यूनंतर, त्याच्याशी संबंधित सर्व नातीगोतीही नाहीशी होतात. केवळ आत्मा - परमात्मा हे नाते शाश्वत असते. ते नित्य असते, चिरंतन असते. परमात्मा पूर्णम आहे, जीवही पुर्णम आहे. जीवात्मा परमात्म्याहून विलग झाला तरी पुर्णम अवस्थेत कमतरता येत नाही. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' वसंतसाई सत्चरित्र - भाग - ३ लेटर गार्लण्ड ' ह्या पुस्तकातून   

जय साईराम 

रविवार, २० जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " मनुष्यामध्ये असणारी अतृप्त इच्छांची शक्ती त्याच्या बंधाचे मूळकारण आहे. "

परमेश्वर आणि कर्मकायदा 

           जर मी ह्या काही जणांवर राग व्यक्त केला, तर सत्ययुगाच्या आगमनास उशीर होणार नाही. मी नेहमीच म्हणत आले की ज्यांनी मला त्रास दिला आणि मला दुःखी केले, त्यांना त्रास भोगावा लागू नये. स्वामी म्हणाले," तुझ्या कनवाळू स्वभावाने तू कर्मकायद्याला जखडून टाकलयस. तू त्यांचा भावनात्मक संहार केलास तरच कर्माचा कायदा कार्यरत होईल. "

            महाभारत युद्धाच्या सुरुवातीस, अर्जुन त्याच्याविरुद्ध ठाकलेल्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना पाहून म्हणाला, ' मला रक्तपात करून आणि त्यांचा बळी घेऊन राज्य मिळवायच नाहीये. ' त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन देऊन त्याला म्हटले ," हे अर्जुना, मी त्यांना अगोदरच मारले आहे. तू फक्त निमित्तमात्र आहेस. " अगदी तसंच, कर्माचा कायदा एक शस्त्र म्हणून कार्यरत होण्यासाठी स्वामींनी मला, त्यांना क्षमा न करता मारण्यास सांगितले. स्वामींकडून मी वर मिळवला होता की माझ्यामुळे कोणालाही शिक्षा भोगावी लागू नये, त्यामुळे कर्मकायद्याला खीळ पडली. त्यांना शिक्षा झाली तरच सत्ययुगाची पहाट होईल. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम    


गुरुवार, १७ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

           " जेव्हा मनाला बाह्य जगताची जाणीव असते तेव्हा ते मायेमध्ये अडकते. "

परमेश्वर आणि कर्मकायदा

            ' शिवसूत्र '  पुस्तकातील ' न्यू फिमेल डॉन ' या प्रकरणात मी सीतेमाताबद्दल लिहिले की सीतामाता खूप सोशिक आणि सहनशील होती, तरी तिने अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवा होता. आता स्वामी मला हेच सांगताहेत, " तू तुझ्यावर झालेल्या अन्याय शांतपणे का सहन करते आहेस ?" मी असेही लिहिले की सीतामातेने लव आणि कुश या तिच्या दोन मुलांना अयोध्येला पाठवून श्रीरामाकडे न्याय मागायला हवा होता. मी पुढे म्हणाले की मी तिच्यासारखी नाही. मी माझे नाते आणि हक्क सिद्ध करीन. मी परमेश्वराशी लढा देईन. स्वामी परमेश्वर आहेत आणि मी प्रकृती आहे. संपूर्ण सृष्टी ही माझी मुले आहेत. हे मी सिद्ध करीन.

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम 

रविवार, १३ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " अधिकाधिक साधना करून ज्ञानाची वृद्धी होते आणि समग्र ज्ञान प्राप्त होते. "

परमेश्वर आणि कर्मकायदा 

           अज्ञानी पापमुक्त होऊन त्यांना मोक्ष मिळेल. पण या थोड्या लोकांना क्षमा करू नये किंवा करुणाही दाखवू नये असे स्वामी का बरे म्हणाले असतील ? या लोकांनी दहा वर्षांपूर्वीच माझे नाडीग्रंथ वाचले आहेत. ऋषीमुनींनी माझ्या आणि स्वामींच्याबद्दल काय म्हटले आहे हे त्यांना माहीत आहे. खरं तर ह्या प्रकटनांमुळेच त्यांनी मला प्रशांती निलयममध्ये प्रवेश नाकारला. 

          आता पुन्हा त्याच व्यक्तींना माझ्या नवीन पुस्तकांतून आताच्या नाडीग्रंथांबद्दल सविस्तर माहिती मिळाली आहे. पुन्हा ते मला त्रास देऊ लागलेत. सर्व काही समजून उमजून ते अस वागत आहेत. म्हणूनच स्वामी म्हणतात की मी त्यांना क्षमा करू नये. ह्या थोड्या लोकांनी मला स्वामींचे दर्शन घेण्यास बंदी घातली, म्हणूनच सत्ययुगाची पहाट होण्यास विलंब होतोय.

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा    


उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम  

गुरुवार, १० जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य बोलणे ही अंतर्गत निर्मलता आहे. मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सत्य असायला हवा." 

२ 

परमेश्वर आणि कर्मकायदा
 
         मी स्वामींकडे मुक्तीचा वर मागितला. चांगल्या वाईट सर्वांना मुक्ती मिळावी. अगदी अज्ञानी व दुष्ट दारुड्यालासुद्धा मुक्तीचे वरदान मिळावे असा मी वर मागितला. परंतु स्वामी आता म्हणतात की, काही लोकांसाठी कर्माचा कायदा कार्यरत व्हायला हवा. काही लोकांना करुणा दाखवू नये आणि क्षमाही करू नये असे स्वामींनी मला का सांगितले ? का ? याच कारण अस की ते स्वामींच्या कार्यातील अडथळे आहेत. ते काही अज्ञानी नाहीत. अज्ञानाला क्षमा करता येते. ह्यांना माझ्याबद्दल पूर्ण ज्ञान असूनही जाणीवपूर्वक ते अस वागत आहेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

रविवार, ६ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


सुविचार 


           " पुन्हा पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपण जन्म घेतो. आणि पुन्हा मृत्यु न यावा असा मृत्यु आपल्याला यायला हवा. "

 

परमेश्वर आणि कर्मकायदा


             मी स्वामींशी वाद घातला, " वडील वाईट मुलांना शिक्षा करतात, पण आई करू शकत नाही." हा आईचा नैसर्गिक मातृभाव आहे. तिचे भाव चांगली व वाईट मुले असा भेदभाव करू शकत नाहीत. आई आपल्या सर्व मुलांवर सारखाच प्रेमवर्षाव करते. पण स्वामींनी धर्मग्रंथांची पुष्टी देऊन माता गांधारी आणि तिच्या १०० मुलांचे उदाहरण दिले. दुर्योधनाच्या पत्रिकेप्रमाणे, त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण वंश नाश पावेल असे भाकित होते. भीष्म, विदुरांसारख्या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तींनी गांधारीचे इतर मुले सुरक्षित राहावीत व वंश चालू राहावा यासाठी त्या बाळाला जंगलात सोडावे असा सल्ला दिला. परंतु तिच्या दुर्योधनावरील आंधळ्या प्रेमामुळे तिने तिच्या लाडक्या मुलाचा त्याग करण्यास नकार दिला. शेवटी दुर्योधन आणि इतर ९९ मुलेही मृत्युमुखी पडली. जर गांधारीने एका मुलाचा त्याग केला असता, तर इतर ९९ सुरक्षित राहिली असती. माझा स्वभाव उलगडून दाखवण्यासाठी स्वामींनी हे उदाहरण दिले. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

शुक्रवार, ४ जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " परमेश्वर हृदयगुंफेमध्ये नीलज्योतीच्या रूपाने वास करतो. जसजशी आपली साधना तीव्र होते तसे त्या ज्योतीचे तेज आपल्याला संपूर्णपणे व्यापून टाकते. "



परमेश्वर आणि कर्मकायदा 

           काही जणांनी मला सांगितले ,'यापुढे पुस्तक लिहू नकोस.' त्यांनी माझ्या लिखाणावर बंदी घातल्यानंतर , मी सहा पुस्तके लिहिली. स्वामींनी मला १ जानेवारी २००९ ला 'शिवसूत्र ' प्रकाशित करण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच त्यांनी दर्शनाच्या वेळी ते पुस्तक घेतले. मी काय करू ?कोणाचे ऐकू ? स्वामींनी सांगितलेल ऐकाव की इतर लोक सांगतात त्यांच ऐकाव ? ह्या सर्व प्रकारांमुळे माझ जीवन भीतीयुक्त झाले आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, " किती वेळा त्यांना क्षमा करणार ? आता पुरे झाल !" 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम