ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जीवाला सत्याप्रत नेणारी यात्रा म्हणजे सूक्ष्म जगत होय. "
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
कर्मकायद्याच्या आदेशानुसार माणसाने केलेल्या दुष्कृत्यासाठी त्याला शिक्षा आणि दुःख भोगावीच लागतात. हा यमराजाचा हिशोब आहे. मला मिळालेल्या वरामुळे कर्मकायदा कार्यरत होऊ शकत नाही आणि म्हणूनच शिक्षाही नाहीत. मी यमराजाचे हात बांधून ठेवलेत. मी ते बंध मोकळे केले तरच प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब संपेल आणि त्यांना मुक्ती मिळेल.
तारीख ११ डिसेंबर २००८ ध्यान
वसंता - स्वामी, मला ' परमेश्वर आणि कर्मकायदा ' समजत नाहीये.
स्वामी - तू जर काही न करता शांत राहिली असतीस, तर कर्मकायद्यानुसार त्यांना शिक्षा झाली असती. परंतु तू त्यांना कर्मातून सोडविण्यासाठी नुसता वरच मागितला नाहीस तर त्यांच्यावर ' आयुष्यमान भव, दीर्घायु होवोत ' म्हणून कविताही रचल्यास. तू दोन मार्गांनी त्याचं संरक्षण केल्यामुळे कर्मकायदा कार्यरत होण्यास अडथळा आला आहे. आता कर्मकायदा कार्यरत होण्याचा मार्गच उरला नाही.
वसंता - आता मी काय करायला हवे, स्वामी ?
स्वामी - वैकुंठ एकादशीला सर्वांचा प्रतीकात्मक बळी दे.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा