रविवार, २० जून, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " मनुष्यामध्ये असणारी अतृप्त इच्छांची शक्ती त्याच्या बंधाचे मूळकारण आहे. "

परमेश्वर आणि कर्मकायदा 

           जर मी ह्या काही जणांवर राग व्यक्त केला, तर सत्ययुगाच्या आगमनास उशीर होणार नाही. मी नेहमीच म्हणत आले की ज्यांनी मला त्रास दिला आणि मला दुःखी केले, त्यांना त्रास भोगावा लागू नये. स्वामी म्हणाले," तुझ्या कनवाळू स्वभावाने तू कर्मकायद्याला जखडून टाकलयस. तू त्यांचा भावनात्मक संहार केलास तरच कर्माचा कायदा कार्यरत होईल. "

            महाभारत युद्धाच्या सुरुवातीस, अर्जुन त्याच्याविरुद्ध ठाकलेल्या नातेवाईकांना आणि कुटुंबियांना पाहून म्हणाला, ' मला रक्तपात करून आणि त्यांचा बळी घेऊन राज्य मिळवायच नाहीये. ' त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन देऊन त्याला म्हटले ," हे अर्जुना, मी त्यांना अगोदरच मारले आहे. तू फक्त निमित्तमात्र आहेस. " अगदी तसंच, कर्माचा कायदा एक शस्त्र म्हणून कार्यरत होण्यासाठी स्वामींनी मला, त्यांना क्षमा न करता मारण्यास सांगितले. स्वामींकडून मी वर मिळवला होता की माझ्यामुळे कोणालाही शिक्षा भोगावी लागू नये, त्यामुळे कर्मकायद्याला खीळ पडली. त्यांना शिक्षा झाली तरच सत्ययुगाची पहाट होईल. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा