ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा मनाला बाह्य जगताची जाणीव असते तेव्हा ते मायेमध्ये अडकते. "
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
' शिवसूत्र ' पुस्तकातील ' न्यू फिमेल डॉन ' या प्रकरणात मी सीतेमाताबद्दल लिहिले की सीतामाता खूप सोशिक आणि सहनशील होती, तरी तिने अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवा होता. आता स्वामी मला हेच सांगताहेत, " तू तुझ्यावर झालेल्या अन्याय शांतपणे का सहन करते आहेस ?" मी असेही लिहिले की सीतामातेने लव आणि कुश या तिच्या दोन मुलांना अयोध्येला पाठवून श्रीरामाकडे न्याय मागायला हवा होता. मी पुढे म्हणाले की मी तिच्यासारखी नाही. मी माझे नाते आणि हक्क सिद्ध करीन. मी परमेश्वराशी लढा देईन. स्वामी परमेश्वर आहेत आणि मी प्रकृती आहे. संपूर्ण सृष्टी ही माझी मुले आहेत. हे मी सिद्ध करीन.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा