ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" पुन्हा पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपण जन्म घेतो. आणि पुन्हा मृत्यु न यावा असा मृत्यु आपल्याला यायला हवा. "
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
मी स्वामींशी वाद घातला, " वडील वाईट मुलांना शिक्षा करतात, पण आई करू शकत नाही." हा आईचा नैसर्गिक मातृभाव आहे. तिचे भाव चांगली व वाईट मुले असा भेदभाव करू शकत नाहीत. आई आपल्या सर्व मुलांवर सारखाच प्रेमवर्षाव करते. पण स्वामींनी धर्मग्रंथांची पुष्टी देऊन माता गांधारी आणि तिच्या १०० मुलांचे उदाहरण दिले. दुर्योधनाच्या पत्रिकेप्रमाणे, त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण वंश नाश पावेल असे भाकित होते. भीष्म, विदुरांसारख्या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तींनी गांधारीचे इतर मुले सुरक्षित राहावीत व वंश चालू राहावा यासाठी त्या बाळाला जंगलात सोडावे असा सल्ला दिला. परंतु तिच्या दुर्योधनावरील आंधळ्या प्रेमामुळे तिने तिच्या लाडक्या मुलाचा त्याग करण्यास नकार दिला. शेवटी दुर्योधन आणि इतर ९९ मुलेही मृत्युमुखी पडली. जर गांधारीने एका मुलाचा त्याग केला असता, तर इतर ९९ सुरक्षित राहिली असती. माझा स्वभाव उलगडून दाखवण्यासाठी स्वामींनी हे उदाहरण दिले.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा