ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ४२
आगळे वेगळे अती वैशिष्ट्य
गर्भामध्ये बालकाचा जन्म कसा होतो हे स्वामींनी स्पष्ट करून सांगितले. ७ व्या दिवशी गर्भ तयार होतो. ३० ते ६० दिवसाच्या कालावधीत सर्व अवयव आणि इंद्रिये विकसित होतात. २१० व्या दिवशी जीव शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि प्रकृती आणि त्या पाठोपाठ परमेश्वर (आत्मनिवासी ) येतो. ह्याचे हे व्यावहारिक प्रात्यक्षिक आहे. प्रकृती म्हणजे हात, पाय, मस्तक असे अवयव आहेत आणि ते साकारल्या नंतर सत्य प्रवेश करते.
सुरुवातीला सर्व अवयव बनतात. त्यानंतर प्राणशक्ती प्रवेश करते. शरीराचे भाग प्रेमशक्तीचे प्रतिनिधित्व करते. ते एकत्र कार्य करतात. जर एखादा अवयव काम करत नसेल तर त्यामुळे सर्व शरीरावर त्याचा परिणाम होतो. सर्व अवयवांच्या रूपाने प्रेम विस्तार पावते. आत्मतत्वाच्या रूपाने सत्य प्रवेश करते व तेथे स्थित होते. असे कार्य चालते.
त्याचप्रमाणे अखिल सृष्टीचे कार्यही प्रेमाद्वारे चालते. येथे सर्व भाग ऐक्य भावनेने कार्य करतात. ते सुरक्षित आहे. ते सत्ययुग आहे. तथापि जेव्हा एखादा अवयव योग्य तऱ्हेने कार्य करत नसेल तर इतर सर्वांवर त्याचा परिणाम होतो. हे कलियुग आहे. शरीराच्या भागांसारखे, समस्त सृष्टी म्हणजे परमेश्वराचे अवयव आहेत. जेव्हा ते ऐक्यभावाने, ऐकतानतेने कार्य करतात केवळ तेव्हाच मुक्ती प्रदान करणे शक्य आहे.
अनु नावाच्या स्त्रीभक्ताने अम्मांना प्रश्न विचारला :
" अम्मा, तुम्ही जेव्हा एखाद्या भक्ताकडे दृष्टिक्षेप टाकता तेव्हा स्वामींप्रमाणे तुम्ही सुद्धा त्याची कर्म पाहू शकता का ? आणि जर पाहू शकत असाल तर स्वामींसारखे तुम्हीही त्यांच्या कर्मात हस्तक्षेप करणार नाही का ? " अम्मांनी हा प्रश्न स्वामींना विचारला त्यावर स्वामी म्हणाले ," त्यावर चिंतन कर " आदिमूलम स्वतःला दोन भागात विभागते. शिवाच्या संकल्पाने हे घडते. कारण शिव क्रियाशक्तीस प्रकट करते (विश्व, प्रकृति ).
गवताच्या पात्यापासून ब्रम्हापर्यंत सर्वकाही प्रकृतिमयम आहे. ही सर्व प्रकृतिचीच रूपे आहेत. शुद्ध सत्व हा प्रकृतिचा स्वभाव आहे. स्वामी आदिमूलम आणि अम्मा आदिशक्ती आहेत. त्या क्रियाशक्ती असल्यामुळे प्रत्येक जीवाच्या कर्मांची त्यांनाही जाणीव आहे. तथापि जरी त्या सर्व जीवांची कर्म जाणत असल्या तरी त्यांचा मातृभाव त्यांच्याही पलीकडे जातो. त्या दयादेवी आहेत व सर्वांवर करुणेचा वर्षाव करून त्या सर्व कर्मांचा संहार करतात. ह्या जगामध्ये वाईट मूल असू शकते पण कधीही वाईट माता नसते. अम्मा सर्वांची कर्मे नष्ट करून त्यांना पुन्हा सुमार्गावर घेऊन जातात. आता हे कार्य प्रचंड प्रमाणात चालू आहे. मातेची आस्था आणि संरक्षण चांगल्या मुलांपेक्षा वाईट मुलांसाठी अधिक असते. तिचे त्यांच्याकडे अधिक लक्ष असते. त्या मुलांना मातेची अधिक गरज असल्यामुळे ती त्यांच्यावर अधिक करुणावर्षाव करते. मातेकडे पक्षपातीपणा नसतो. देह नाशवंत आहे. देहाच्या मृत्यूनंतर, त्याच्याशी संबंधित सर्व नातीगोतीही नाहीशी होतात. केवळ आत्मा - परमात्मा हे नाते शाश्वत असते. ते नित्य असते, चिरंतन असते. परमात्मा पूर्णम आहे, जीवही पुर्णम आहे. जीवात्मा परमात्म्याहून विलग झाला तरी पुर्णम अवस्थेत कमतरता येत नाही.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' वसंतसाई सत्चरित्र - भाग - ३ लेटर गार्लण्ड ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा