ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराशिवाय कोणतीही गोष्ट अपरिवर्तनीय (अविकारी) नाही हे नेहमी लक्षात ठेवा. "
१२
कर्मसंहार
त्याआधी स्वामी म्हणाले होते, " धरती आणि आकाशामध्ये खूप मोठे जाळे आहे. ते जगाचे कर्म आहे. या जाळ्यामुळे दोन पक्षी विलग झाले आहेत. ते तू आणि मी आहोत. आपण एकमेकांना पाहू शकतो. येऊ शकत नाही. "
स्वामींच्या वाढदिवसाला जेव्हा तेल लावण्याचा विधी होत होता, तेव्हा इकडे मुक्ती निलयमला व्हरांड्यात दोन इवलेसे पक्षी येऊन पडले. एका पक्ष्याचा रंग निळा होता. तो निपचित पडला होता, आणि दुसऱ्या पिवळ्या रंगाच्या पक्षाने निळ्या पक्षाचे पाय पकडले होते. स्वामी म्हणाले, ' ते महाविष्णु आणि लक्ष्मी आहेत. ते पक्षी हेच दर्शवितात की जगाची कर्म धुतली गेली की आपण एकत्र येऊ."
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा