रविवार, २९ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " तुम्ही जेथे आहात आणि जे काही करत आहात ते कार्य परमेश्वराची पूजा समजून करा. "
१५ 
कोळी 

          किडा जाळ्यात इकडून तिकडे फिरत सुटण्याचा प्रयत्न करतो, पण कोळी पाठलाग करत असतो. त्याचप्रमाणे, माणूस त्याच्या अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी इकडेतिकडे धावत असतो. वृद्धापकाळात त्याच शरीर व्याधीग्रस्त होत, जर्जर होत आणि शेवटी त्याला मृत्यु येतो. पुन्हा तो नवीन शरीरात जन्म घेतो. 
          ज्यांना या सृष्टीचा निर्माता, परमेश्वर आणि त्याची निर्मिती, प्रकृती यांच्यामध्ये असलेले नाते समजले, त्यांना सत्य उमगले. कोळ्याप्रमाणे ते मायेच्या जगाच्या जाळ्यात सहजतेने चालू शकतात. कोळी जसा जाळ्यात अडकत नाही, तसेच ज्यांना सत्य उमगले, ते या मायेच्या जगात मुक्तपणे संचार करतात; सगळ्यापासून अलिप्त राहतात. या माया जगतात ते अडकू शकत नाहीत. 

*   *   *  
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " मधुर बोला, मधुर वागा. केवळ तोंडाने नव्हे तर अंतःकरणापासून !"
१५ 
कोळी 

         कोळी चंद्राच्या प्रभावाखाली जगणारा प्राणी आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलांचे या जगावर, जिथे माणसाचा जन्म आणि मृत्यु होतो, तिथे आधिपत्य आहे, त्याचप्रमाणे संहाराच्या कृतीतून दर्शवतो. 
         निर्मितीची शक्ती सर्वांमध्ये असतेच. कोळी जाळे विणण्यासाठी स्वतःच्या शरीरातील धागा वापरतो. तशीच निर्मितीची शक्ती माणसातही आहे. ती शक्ती तो स्वतःचेच जाळे विणण्यासाठी वापरतो. त्याने स्वतःनेच निर्माण केलेल्या स्वतःच्या विश्वात, मायेच्या जाळ्यात तो मध्यभागी बसतो. माझ्या मागील पुस्तकात, 'शिवसूत्र ' मध्ये, मानव इच्छा, कल्पनाशक्ति आणि प्रयत्नांनी कशी निर्मिती करतो हे मी लिहिल आहे. तो त्याच्या इच्छा आकांशांनी मायाविश्व निर्माण करीत असतो. एकदा का तो त्यात अडकला की मग सुटू शकत नाही. 
           कोळ्याच्या जाळ्याच्या चिकटपणामुळे किडे त्यात अडकतात. ते किडे त्या कोळ्याचे खाद्य होते. कोळी हा प्रकृतीचे निदर्शन करतो. प्रकृती म्हणजेच निर्मित जग, मायेचे जाळे ! ती अद्भूत जगाची रचना करीत असते. सर्वजण या विश्वात अडकतात, आणि सुटू शकत नाहीत. या जगात अस काय बर आहे जे माणसाला सुटू देत नाही ? असा कोणता गोंद त्याला या जगाशी जखडून ठेवतोय ? ' स्पर्शज्ञान - हाच तो गोंद ' हे स्पर्शज्ञान सर्वांना बांधून ठेवते. अशाप्रकारे स्वतःच सतत विणत असलेल्या जाळ्यात ते अडकतात. जन्ममृत्युच्या चक्रात फिरत राहतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १३ जानेवारी 
 
      " गोड बोला, गोड वागा.... नुसतं तोंड देखलं नाही,तर हृदयापासून. "

वाणी मधुर असावी,कठोर शब्द वापरू नयेत. आपण जे बोलतो ते हृदयापासून असावं, तोंडदेखलं असू नये. मधुर भाषा फक्त आपल्यालाच आनंद देत नाही तर ऐकणाऱ्याला सुद्धा आनंदी करते. पर्यायानं दोघेही आनंदी होतात. तोंडापुरतं बोलण्याचा काही एक उपयोग नाही. तर तो शक्तीचा अपव्ययच आहे. माफक बोलणं केव्हाही चांगलं. काही लोकं सतत बोलत असतात, अति बोलतात. अति बोलणं म्हणजे सुद्धा तुमच्या शक्तीचा अपव्यय करणंच होय. भगवंतांचे शब्द कसे आहेत? भगवान सत्य साईंनी  चौऱ्याऐंशीं वर्षे शिकवण दिली. त्यांचे बोल प्रत्येकाला आनंद देतात. अगदी लहान मुलंसुद्धा त्यांची शिकवण शांत चित्तानं ऐकतात. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी अवघे जग त्यांच्या जवळ एकवटते. साधारणतः आपल्याला साक्षात भगवंतांची वाणी ऐकण्याचं भाग्य लाभत नाही. ह्या कलियुगातील माणसे अतिशय भाग्यवान आहेत. स्वामींनी आपल्या मधुर वाणीने गेली चौऱ्याऐंशी वर्षे किती प्रवचने दिली ! आपल्याला ती ऐकताना कान पूर्ण तृप्त होतच नाहीत. कारण की, त्यांच्या दिव्य प्रेमामुळे त्यांच्या वाणीला दिव्य माधुर्य येते. सर्वजण त्यांच्या प्रवचनाची अतिशय शांत चित्तानं वाट पाहतात. आपला आवाज प्रेमामुळं गोड होतो. बऱ्याच वेळा एखादा वक्ता बोलत असताना लोकं कंटाळतात, त्यांना तिकडून चक्क पळून जावंसं वाटतं. ह्याचं कारण असं की, त्या वक्त्याचे बोल हृदयापासून येत नाहीत. तो वक्ता स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी यंत्रवत बोलत असतो. हे चांगलं नाही. लोकांना अशी भाषणं  ऐकण्यापासून पासून सुटका करून घ्यायची इच्छा होते.
पक्षपात न करता सर्वांशी गोड वागा. तुम्ही तुमचे कुटुंबीय, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याशी चांगलं वागता, तथापि इतरांचा दुःस्वास करता. काहींशी तुम्ही शत्रुत्वानं वागता, तर काहींचा तुम्हाला मत्सर वाटतो. कुणाला पाहिलं तरी तुमचा संताप होतो. 'मी आणि माझं' हे ह्याचं कारण आहे. ह्या 'मी आणि माझं' मुळे काम,क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे दुर्गुण निर्माण होतात. हे होऊ नये म्हणून आपण सर्वांशी चांगलंच वागावं. इतरांच्या वागण्यामुळे आपल्यातील दुर्गुण उफाळून येतील. त्यांना न पाहता आपण ती जागा सोडून जावं हे उत्तम. प्रत्येकाने स्वतःचा अनुभव लक्षात घेऊन स्वतःचं मन बदला; नाहीतर ती जागा सोडून दूर निघून जा. दुष्प्रवृत्तींना तुमच्या अंतरंगात जागा देऊ नका.  
तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी जसे वागता तसेच सर्वांशी वागा. म्हणजे आपोआप गोडवा येईल. आजकाल कुटुंबीयांमध्ये सुद्धा गोडवा नसतो; भाऊ, बहिणी, पालक, नवरा , बायको आणि मुलं. 
प्रेम सर्व ठिकाणांहून नाहीसे झालेय. त्यामुळं प्रत्येक जण पुनः पुन्हा जन्माला येतो. जे प्रेमाला त्यांच्या जीवनात प्रथम स्थान देतात ते मुक्त होतात. तथापि आता नाव, प्रसिद्धी, सत्ता, आणि कुटुंब यांना प्राधान्य दिले जाते. यामुळेच सर्वोत्तम भगवान येथे अवतरला. त्याने शिकवण दिली. 'प्रेम ईश्वर आहे,प्रेमात जगा .' तुम्ही प्रेममय जीवन जगलात तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल.
२४ जून २०१६ ध्यान :
वसंता : स्वामी, मला तुम्ही हवे आहात. फक्त तुम्ही हवेत.   
स्वामी : मी येईन. मी वचन देतो. रडू नकोस. 
वसंता : माझे सगळे केस गळतायत. पण मला एक छोटा काळा केस मिळाला. तो काय सांगतो स्वामी?
स्वामी : मी माझा केस दिला.  
वसंता : ठीक आहे स्वामी. काल तुम्ही तुमच्या हाताचा ठसा दाखवलात. आज आता तुमचा केस. स्वामी तुम्ही एका वृद्ध व्यक्तीला युवक बनविलेत. त्याचे सगळे केस आणि दात परत आले? तो सशक्त सुद्धा झाला. तुम्ही माझ्यात असा बदल का बरं घडवत नाही?
स्वामी : तुझं शरीर नक्की बदलेल.
                 माझी प्रिय वसंता राणी 
                 मी सर्वत्र तू आणि मी पाहिले  
                 इतर काही नाहीच आहे. 
                 तू हे कसं काय केलंस?
                 ही जादू आहे की काय?
वसंता : स्वामी, तुम्ही आलात तरच ; काय घडलंय ते सर्वजण पाहतील .
स्वामी : हो, मी येईन.
ध्यान समाप्त. 
...आता आपण पाहू यात. काल दुपारी तीन वाजता श्रीलता माझे  केस विंचरत असताना माझे केस मुळापासून गळत होते. केस विंचरून झाल्यानंतर मला एक काळा केस मिळाला. आम्ही तो एका कागदाच्या पुडीत सुरक्षित ठेवला. सायं ध्यानाच्या वेळी मी स्वामींना केसाबद्दल विचारलं. स्वामींनी सांगितलं की तो केस त्यांनी दिलाय. मला खूप आनंद झाला. परवा स्वामींनी हाताचा ठसा दाखवला तर काल स्वतःचा केस दिला.
स्वामी पुट्टपर्तीला असतानाची गोष्ट. खूप दूर राहणारा एक माणूस होता. त्याची पाठ पूर्ण वाकली होती आणि तोंडाचं बोळकं झालं होतं तर केस पांढरे शुभ्र. तो खूप वृद्ध झाला होता. तो स्वामींना प्रार्थना करीत असे. एक दिवस सकाळी उठल्यावर बघतो तर काय; तो खरंच तरुण झाला होता. त्याचे केस काळे झाले, पाठ सरळ आणि सर्व दात पूर्ववत! तारुण्याचा  जोमही  परत आला. ज्यांनी त्याला पाहिले ते सर्व आश्चर्यचकित झाले. म्हणून मी स्वामींना विचारले की, असा बदल ते माझ्यामध्ये का घडवत नाहीत? पण त्यांनी मला आधीच वचन दिलेय, "तुझी काया बदलेल." त्यांनी कवितासुद्धा दिली.  त्यांनी अखिल जगत केवळ 'ते आणि मी' आहोत असं पाहिलं. ते इतर काही सुद्धा पाहू शकले नाहीत. म्हणून त्यांनी विचारलं,"तू हे सगळं कसं काय बदललंस ? तुला कुठली जादू माहीत आहे?" मी उत्तरले,"हो, ही साई जादू आहे."   
राधेला कृष्णाशी एकात्मता हवी होती. जेथे जेथे कृष्ण ; तेथे तिला रहायचं होतं. मी कृष्णाशी विवाह करून त्याच्यात विलीन होण्याकरिता तपश्चर्या केली. १९९५ पासून स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. १९९६ पासून ते माझ्याशी सतत बोलू लागले. मी 'इथेच! या क्षणी !! मुक्ती!!!' हे पुस्तक लिहिलं. माझ्यात आणि स्वामींमध्ये झालेली संभाषणं मी पुस्तकांच्या रुपात शब्दबद्ध केली आहेत. माझे भावतरंग माझ्या कुंडलिनीतून बाहेर जातात. १९९८ मध्ये आम्ही माझे नाडी ग्रंथ वाचले. माझे नाडी ग्रंथ वाचून पुट्टपर्तीच्या व्यवस्थापकांनी मला तेथून बाहेर काढले. पाच वर्षांनंतर स्वामींनी मला बोलावले आणि मग मी परत प्रशांती निलयम मध्ये प्रवेश केला. 
२००७ मध्ये मी 'भगवंतांचे अखेरचे सात दिवस' हे पुस्तक लिहिले. त्यांनी मला परत बाहेर काढले. तदनंतर मी एक प्रतिज्ञा केली. त्यांनी जर मला एका सत्यसाईला पाहण्यापासून परावृत्त केले तर मी सर्व पुरुषांना सत्यसाईंमध्ये  परिवर्तित करेन आणि सर्व स्त्रियांना वसंत साई. माझी तपश्चर्या आणि माझ्या अश्रूंमुळे माझे आणि स्वामींचे भावतरंग सर्वत्र आणि सर्वांभुती प्रवेश करतील. हे सत्ययुग आहे. आमच्या हृदय संगमामधून विश्व् ब्रह्म गर्भ कोट्टम निर्माण झाले. आमचे भावतरंग तेथून स्तुपात जाऊन मग विश्व व्यापतात. आम्ही अखिल मानव जगताची कर्मे आमच्या शरीरांवर  घेऊन सर्वांना रिक्त करतो. अशा रीतीने आमचे भावतरंग  सर्वांभुती प्रवेशतात.
केवळ आम्ही दोघे आमच्या भावतरंगांद्वारे अवघे जग व्याप्त करतो. स्वामींनी हे पाहिलं. सर्वत्र केवळ आमचेच भावतरंग. स्वामी आले की माझी वृद्ध काया तरुण होते. मी ज्योतिस्वरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन होते. माझी वृद्ध काया युवा झाली की वृद्ध कलियुग तरुण होतं म्हणजे सत्ययुगाचा उदय होतो. सर्व मानवता जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करते. पृथ्वी स्वर्गात परिवर्तित होते. हे स्वामींचं अवतार कार्य आहे. 
आज प्रभाकरनी एक बिल्वपत्र दिलं, त्याची तीन पाने तीन आकारात होती. एक पान दोनात विभागलं : परमेश्वर व त्याची शक्ती, तर पानाचा तिसरा भाग सृष्टी. तिन्ही एक आहेत.

जय साईराम 

रविवार, २२ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका."
१५ 
कोळी 
 
          कोळ्याचे प्रतिकात्मक तीन वेगवेगळे गुण आहेत. 
          पहिला, त्याची सर्जनशीलता . ही त्याच्या जाळे विणण्याच्या कृतीतून दिसून येते. दुसरा, त्याची आक्रमकता. कोळी आक्रमक असतो, जगातील माणसेही तशीच असतात. ती नेहमी क्रोधीत, उद्धट आणि वादविवादप्रिय असतात. तिसरा गुण त्याच्या जाळ्याशी संबंध जोडतो. कोळी बसतो त्या केंद्रबिंदूशी ते जाळे एकवटते. हा केंद्रबिंदू म्हणजेच जगाच्या केंद्रबिंदूचे प्रतीक आहे; ज्याला हिंदू तत्वज्ञानात ' माया ' म्हणतात. कोळी हा मायेच जाळ सतत विणणारा एक विणकरचआहे. अविरतपणे जाळ्याचे विणकाम, शिकार, बांधणी आणि मोडतोड करणारा कोळी हा सृष्टीमध्ये फेरबदल करणाऱ्या सनातन शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. ह्याच शक्तिवर सृष्टीचे स्थैर्य अवलंबून असते 
          कोळी ज्याप्रमाणे नवीन जाळे बनवण्यासाठी जुना धागा सोडून देतो, त्याचप्रमाणे एक जीव जुने शरीर सोडून नवीन शरीर घेतो. कोळ्याचे सतत नवीन जाळे बनवणे हे माणसाच्या जुने शरीर सोडून नवीन शरीर घेण्याचेच प्रतिक आहे.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" जसे भाव तसे जीवन."
१५ 
कोळी 

          पूर्वी रॉबर्ट ब्रूस नावाचा स्कॉटलंडच्या राजा होऊन गेला. तो नेहमी इंग्लंडच्या राजाशी युद्ध करत असे आणि पराभूतही होत असे. एकदा तो युद्धातून पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. एक दिवस त्याने कोळ्याला जाळ विणताना पाहिले. कितीतरी वेळा कोळी खाली पडला परंतु त्याने त्याचा नाद सोडला नाही. कोळी आठव्यांदा यशस्वी झाला. कोळ्याच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन त्याने त्याच्या सैनिकांना एकत्र केले आणि म्हणाला, " तुम्ही जरी पहिल्या खेपेत यशस्वी झाला नाहीत, तरी कोळ्याप्रमाणे सतत प्रयत्न करत रहा !" रॉबर्ट पुन्हा युद्धभूमीवर गेला आणि यशस्वी झाला. कोळ्याने त्याला चिकाटी आणि अथक प्रयत्न करण्याचा धडा शिकवला.     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १५ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
" परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "
१५
कोळी 

           गेले काही दिवस मुक्ती निलयममध्ये सगळीकडे कोळी नजरेस पडू लागले. मला वाटले की मी कोळ्यांविषयी लिहावे अशी स्वामींची इच्छा दिसते... 
          कोळी त्याच्या शरीरातील स्रावाने जाळे विणतो. जाळे पूर्ण झाल्यावर, कोळी त्यात राहतो. जाळ वेडवाकड झाल किंवा तुटल, तर कोळी ते लगेच दुरुस्त करतो. तो जाळ्यात मुक्त संचार करतो ; त्याच जाळ जराही तुटत नाही. दुसरा एखादा किडा जर अपघाताने जाळ्यात शिरला तर तो त्यात अडकतो आणि बाहेर पडू शकत नाही. 
           कोळी हा अथक् प्रयत्नांचे निदर्शन करतो. जाळ कितीही वेळा तुटो, तो सतत दुरुस्ती करीत राहतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम   

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " प्रथम भाव निर्माण होतात, त्यानंतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ?" 
१४
आपत्संन्यास

         एकदा मी कोईमतूरला एका वृद्धाश्रमात गेले होते. तिथे मी अनेक नन्सना हसतमुखाने, मनापासून वृद्धांची सेवा करताना पाहिले. हेच आहे स्वामींनी सांगितलेल्या ' सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा ' च खरखुर प्रात्यक्षिक. 
          आपण या जगात जन्माला आलो, इथे राहतो. जेव्हा आपण फक्त परमेश्वरासाठी जगतो तेव्हा त्यात किती बर आनंद असतो ! हा एक प्रकारचा कर्मसंहारच आहे. त्याग हाच त्यावरील खात्रीचा उपाय आहे. 
  •  आदिशंकरांनी सर्वसंगपरित्याग केला - संपूर्ण जगासाठी 
  •  राजाराम स्वामीजींनी सर्वसंगपरित्याग केला - परमेश्वराचा दूत होण्यासाठी 
  •  डॉक्टरांच्या आजोबांनी सर्वसंगत्याग केला - त्यांच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी 
  • कर्माचे भोग भोगणाऱ्या कुटुंबाला एका मुलाचा त्याग करून परमेश्वराच्या कार्यास अर्पण करण्यास सांगितले - कर्म धुतली जाण्यास 
  • वैष्णवीला भौतिक जीवनाचा त्याग करण्यास सांगितले - स्वामींच्या कार्यासाठी 
* भौतिक जीवनाचा त्याग करा आणि परमेश्वरासाठी जगा.

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


श्री वसंत साईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने  
रत्न - १ 

मी तुम्हा सर्वांसाठी मुक्ती सुरक्षित ठेवेन

वसंता : "स्वामी! जगामधील सर्वजणं माझी मुले आहेत. मी त्यांना माझ्या गर्भात धारण करून त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांनी केवळ मी सेवन करत असलेले साई अन्न सेवन केले पाहिजे. मी प्राशन करत असलेले साई अमृत प्राशन केले पाहिजे. ज्याक्षणी ते माझ्या गर्भातून बाहेर पडतील तेव्हा त्यांनी शुक मुनींसारखा केवळ परमेश्वराचा धावा केला पाहिजे. माझ्या मातृभावाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.माझ्या मुलांसाठी मी काहीही करायला तयार आहे. मी माझ्या भावांचे रक्तात रूपांतर करून त्यांना पाजेन. बाह्य जगताचा प्रभाव त्यातील संदेह, भ्रम आणि प्रलोभने ह्या सर्वांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी
मी त्यांना माझ्या गर्भात ठेवू इच्छिते.
स्वामी: तुझे हे जाज्वल्य मातृभाव जगातील प्रत्येकामध्ये परिवर्तन घडवतील आणि सत्ययुग उदयास येईल. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या उपसदमचे हे खरे स्पष्टीकरण आहे. आणि ह्या उपसदमचे तू प्रात्यक्षिक दाखवणार आहेस.

जगाला प्रकृती तत्त्व समजलेले नाही. जगाने  केवळ परमेश्वराची 'सत्य' ही एकच बाजू पहिली आहे. इथून पुढे, ते माझ्या जीवनाद्वारे,परमेश्वराची 'प्रकृती'
ही दुसरी बाजू पाहणार आहेत.

केवळ पूर्ण मातृभाव मनुष्याला सत्याकडे घेऊन जातो. माझा मातृभाव आखिल जगतास सत्यामध्ये विलीन होण्यासाठी घेऊन जाईल. केवळ माताच मुलाला  त्याचा पिता कोण आहे ते दाखवू शकते.

माझा मातृभाव जगत्पित्यास,म्हणजेच परमेश्वरास दाखवील. प्रत्येकास सत्याकडे,सत्यसाईंकडे घेऊन जाणे हे माझे कर्तव्य आहे. ते तुमचे खरे वडील आहेत. सर्वांना ते जेथून आले आहेत, तेथे त्यांच्याकडे परत घेऊन जाणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हा माझ्या जीवनाचा दुसरा भाग आहे.

माझ्या जीवनाच्या पहिल्या भागात, माझ्या प्रेमाद्वारे मी परमेश्वरास प्राप्त केले आणि जीवनाच्या दुसऱ्या भागात मी तुम्हा सर्वांसाठी मुक्ती सुरक्षित करून ठेवणार आहे. माझ्या ह्या कार्यात मी यशस्वी होईन.

कशी? कारण मी सत्याला प्राप्त केले आहे आणि केवळ सत्य विजयी होते. सत्याचा सदैव विजय होतो.

केवळ ह्याच उद्देशाने आदिपुरुष श्री सत्यसाई बाबांनी अवतार धारण केला आहे. प्रत्येकास इथेच याक्षणी मोक्षप्राप्ती झाली पाहिजे!

- श्री वसंत साई अम्मा 
जय साईराम 

रविवार, ८ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "
१४
आपत्संन्यास 

          दुसरे उदाहरण 
          माझ्या खूप जवळचे एक कुटुंब पूर्वकर्मांमुळे त्रास भोगत होते. अनेकवेळा स्वामींनी त्यांचा कर्मसंहार होण्यासाठी मला त्यांच्या घरी तीन रात्री राहण्यास सांगितले होते. एकदा स्वामींनी त्यांच्या मोठ्या मुलीला तिच घर सोडून माझ्या घरी येऊन राहण्यास सांगितले. स्वामी म्हणाले की हे त्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे. परंतु त्या कुटुंबाने तसे केले नाही; त्यांच्या अडचणी चालूच राहिल्या आणि त्यांची दुःख वाढतच गेली. पुन्हा त्यांनी मला फोन केला आणि प्रार्थना करण्याची विनंती केली. मी प्रार्थना केली. स्वामी म्हणाले की हे सर्व त्यांच्या कर्मांमुळे होत आहे. ते आख्ख कुटुंब स्वामींचे खूप चांगले भक्त आहेत. स्वामींनी त्यांना अनेक इंटरव्ह्यूही दिले आहेत. 
         आता स्वामी म्हणालेत की जर त्यांनी त्यांचा मुलगा स्वामींच्या कार्यासाठी दिला तर त्यांची कर्म धुतली जातील. हा झाला आपत्संन्यास. एकदा एक व्यक्ती परमेश्वराला अर्पण केली की सर्व प्रश्न खात्रीने सुटतात. कॅथॉलिक कुटुंबामध्ये मुलगी परमेश्वराच्या सेवेसाठी चर्चला अर्पण केली जाते.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " मनुष्याच्या प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यामधून त्याच्यातील देवत्व प्रतिबिंबित झाले पाहिजे. "
१४
आपत्संन्यास 

          अलीकडेच एका आश्रमवासींयाच्या पायावर मोठा व्रत झाला होता आणि त्यांना रक्तदोषासाठी बरेच दिवस उपचार करावे लागले होते. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना काळजीचे काही कारण नाही असा दिलासा दिला आणि त्यांच्या वडिलांच्या बाबतीत घडलेली एक घटना सांगितली. त्यांच्या वडिलांनाही असाच त्रास झाला होता. त्याकाळी अँटीबायोटिक्स नसतानाही ते बरे झाले होते. खरे तर, त्यांच्या वडिलांचा आजार इतका गंभीर होता की डॉक्टरांनी ते जगणार नाहीत असेच सांगितले होते. त्यावेळी एका साधूने त्यांच्या आजोबांना सांगितले की जर त्यांनी ताबडतोब संन्यास घेतला, तर त्यांचा मुलगा बरा होईल. त्यांनी तसे केले आणि त्यांचा मुलगा चमत्कारिकरित्या बरा झाला. अशारितीने त्यागाची आणि सर्वसंगपरित्यागाची शक्ती परत एकदा दिसून येते.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " जो स्वार्थ आणि अपेक्षा यापासून मुक्त आहे, त्याला कर्माचे परिणाम बाधत नाहीत. "
१४
आपत्संन्यास 

तारीख २८ ऑक्टोबर २००७ ध्यान 
वसंता - स्वामी, पूर्वी तर तुम्ही म्हणाला होतात की जर वैष्णवी मुक्ती निलयमला आली तर तिचे शरीर इथली भावकंपने सहन करू शकणार नाही. 
स्वामी - तेव्हा वेळ आली नव्हती. आता मुक्ती निलयमच तिच्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. तिचे शरीर शिक्षण आणि नोकरीचे जीवन स्विकारू शकणार नाही. म्हणूनच मी म्हटले की आपत्संन्यास घेऊन तिने मुक्ती निलयमला यावे. तिच्या हातून अनेक मोठी कार्ये होणार आहेत. आपण तिला आपल्या अवतारकार्यासाठीच आणले आहे. 
ध्यानाची समाप्ती   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम