सोमवार, २३ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १३ जानेवारी 
 
      " गोड बोला, गोड वागा.... नुसतं तोंड देखलं नाही,तर हृदयापासून. "

वाणी मधुर असावी,कठोर शब्द वापरू नयेत. आपण जे बोलतो ते हृदयापासून असावं, तोंडदेखलं असू नये. मधुर भाषा फक्त आपल्यालाच आनंद देत नाही तर ऐकणाऱ्याला सुद्धा आनंदी करते. पर्यायानं दोघेही आनंदी होतात. तोंडापुरतं बोलण्याचा काही एक उपयोग नाही. तर तो शक्तीचा अपव्ययच आहे. माफक बोलणं केव्हाही चांगलं. काही लोकं सतत बोलत असतात, अति बोलतात. अति बोलणं म्हणजे सुद्धा तुमच्या शक्तीचा अपव्यय करणंच होय. भगवंतांचे शब्द कसे आहेत? भगवान सत्य साईंनी  चौऱ्याऐंशीं वर्षे शिकवण दिली. त्यांचे बोल प्रत्येकाला आनंद देतात. अगदी लहान मुलंसुद्धा त्यांची शिकवण शांत चित्तानं ऐकतात. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी अवघे जग त्यांच्या जवळ एकवटते. साधारणतः आपल्याला साक्षात भगवंतांची वाणी ऐकण्याचं भाग्य लाभत नाही. ह्या कलियुगातील माणसे अतिशय भाग्यवान आहेत. स्वामींनी आपल्या मधुर वाणीने गेली चौऱ्याऐंशी वर्षे किती प्रवचने दिली ! आपल्याला ती ऐकताना कान पूर्ण तृप्त होतच नाहीत. कारण की, त्यांच्या दिव्य प्रेमामुळे त्यांच्या वाणीला दिव्य माधुर्य येते. सर्वजण त्यांच्या प्रवचनाची अतिशय शांत चित्तानं वाट पाहतात. आपला आवाज प्रेमामुळं गोड होतो. बऱ्याच वेळा एखादा वक्ता बोलत असताना लोकं कंटाळतात, त्यांना तिकडून चक्क पळून जावंसं वाटतं. ह्याचं कारण असं की, त्या वक्त्याचे बोल हृदयापासून येत नाहीत. तो वक्ता स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी यंत्रवत बोलत असतो. हे चांगलं नाही. लोकांना अशी भाषणं  ऐकण्यापासून पासून सुटका करून घ्यायची इच्छा होते.
पक्षपात न करता सर्वांशी गोड वागा. तुम्ही तुमचे कुटुंबीय, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याशी चांगलं वागता, तथापि इतरांचा दुःस्वास करता. काहींशी तुम्ही शत्रुत्वानं वागता, तर काहींचा तुम्हाला मत्सर वाटतो. कुणाला पाहिलं तरी तुमचा संताप होतो. 'मी आणि माझं' हे ह्याचं कारण आहे. ह्या 'मी आणि माझं' मुळे काम,क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे दुर्गुण निर्माण होतात. हे होऊ नये म्हणून आपण सर्वांशी चांगलंच वागावं. इतरांच्या वागण्यामुळे आपल्यातील दुर्गुण उफाळून येतील. त्यांना न पाहता आपण ती जागा सोडून जावं हे उत्तम. प्रत्येकाने स्वतःचा अनुभव लक्षात घेऊन स्वतःचं मन बदला; नाहीतर ती जागा सोडून दूर निघून जा. दुष्प्रवृत्तींना तुमच्या अंतरंगात जागा देऊ नका.  
तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी जसे वागता तसेच सर्वांशी वागा. म्हणजे आपोआप गोडवा येईल. आजकाल कुटुंबीयांमध्ये सुद्धा गोडवा नसतो; भाऊ, बहिणी, पालक, नवरा , बायको आणि मुलं. 
प्रेम सर्व ठिकाणांहून नाहीसे झालेय. त्यामुळं प्रत्येक जण पुनः पुन्हा जन्माला येतो. जे प्रेमाला त्यांच्या जीवनात प्रथम स्थान देतात ते मुक्त होतात. तथापि आता नाव, प्रसिद्धी, सत्ता, आणि कुटुंब यांना प्राधान्य दिले जाते. यामुळेच सर्वोत्तम भगवान येथे अवतरला. त्याने शिकवण दिली. 'प्रेम ईश्वर आहे,प्रेमात जगा .' तुम्ही प्रेममय जीवन जगलात तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल.
२४ जून २०१६ ध्यान :
वसंता : स्वामी, मला तुम्ही हवे आहात. फक्त तुम्ही हवेत.   
स्वामी : मी येईन. मी वचन देतो. रडू नकोस. 
वसंता : माझे सगळे केस गळतायत. पण मला एक छोटा काळा केस मिळाला. तो काय सांगतो स्वामी?
स्वामी : मी माझा केस दिला.  
वसंता : ठीक आहे स्वामी. काल तुम्ही तुमच्या हाताचा ठसा दाखवलात. आज आता तुमचा केस. स्वामी तुम्ही एका वृद्ध व्यक्तीला युवक बनविलेत. त्याचे सगळे केस आणि दात परत आले? तो सशक्त सुद्धा झाला. तुम्ही माझ्यात असा बदल का बरं घडवत नाही?
स्वामी : तुझं शरीर नक्की बदलेल.
                 माझी प्रिय वसंता राणी 
                 मी सर्वत्र तू आणि मी पाहिले  
                 इतर काही नाहीच आहे. 
                 तू हे कसं काय केलंस?
                 ही जादू आहे की काय?
वसंता : स्वामी, तुम्ही आलात तरच ; काय घडलंय ते सर्वजण पाहतील .
स्वामी : हो, मी येईन.
ध्यान समाप्त. 
...आता आपण पाहू यात. काल दुपारी तीन वाजता श्रीलता माझे  केस विंचरत असताना माझे केस मुळापासून गळत होते. केस विंचरून झाल्यानंतर मला एक काळा केस मिळाला. आम्ही तो एका कागदाच्या पुडीत सुरक्षित ठेवला. सायं ध्यानाच्या वेळी मी स्वामींना केसाबद्दल विचारलं. स्वामींनी सांगितलं की तो केस त्यांनी दिलाय. मला खूप आनंद झाला. परवा स्वामींनी हाताचा ठसा दाखवला तर काल स्वतःचा केस दिला.
स्वामी पुट्टपर्तीला असतानाची गोष्ट. खूप दूर राहणारा एक माणूस होता. त्याची पाठ पूर्ण वाकली होती आणि तोंडाचं बोळकं झालं होतं तर केस पांढरे शुभ्र. तो खूप वृद्ध झाला होता. तो स्वामींना प्रार्थना करीत असे. एक दिवस सकाळी उठल्यावर बघतो तर काय; तो खरंच तरुण झाला होता. त्याचे केस काळे झाले, पाठ सरळ आणि सर्व दात पूर्ववत! तारुण्याचा  जोमही  परत आला. ज्यांनी त्याला पाहिले ते सर्व आश्चर्यचकित झाले. म्हणून मी स्वामींना विचारले की, असा बदल ते माझ्यामध्ये का घडवत नाहीत? पण त्यांनी मला आधीच वचन दिलेय, "तुझी काया बदलेल." त्यांनी कवितासुद्धा दिली.  त्यांनी अखिल जगत केवळ 'ते आणि मी' आहोत असं पाहिलं. ते इतर काही सुद्धा पाहू शकले नाहीत. म्हणून त्यांनी विचारलं,"तू हे सगळं कसं काय बदललंस ? तुला कुठली जादू माहीत आहे?" मी उत्तरले,"हो, ही साई जादू आहे."   
राधेला कृष्णाशी एकात्मता हवी होती. जेथे जेथे कृष्ण ; तेथे तिला रहायचं होतं. मी कृष्णाशी विवाह करून त्याच्यात विलीन होण्याकरिता तपश्चर्या केली. १९९५ पासून स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. १९९६ पासून ते माझ्याशी सतत बोलू लागले. मी 'इथेच! या क्षणी !! मुक्ती!!!' हे पुस्तक लिहिलं. माझ्यात आणि स्वामींमध्ये झालेली संभाषणं मी पुस्तकांच्या रुपात शब्दबद्ध केली आहेत. माझे भावतरंग माझ्या कुंडलिनीतून बाहेर जातात. १९९८ मध्ये आम्ही माझे नाडी ग्रंथ वाचले. माझे नाडी ग्रंथ वाचून पुट्टपर्तीच्या व्यवस्थापकांनी मला तेथून बाहेर काढले. पाच वर्षांनंतर स्वामींनी मला बोलावले आणि मग मी परत प्रशांती निलयम मध्ये प्रवेश केला. 
२००७ मध्ये मी 'भगवंतांचे अखेरचे सात दिवस' हे पुस्तक लिहिले. त्यांनी मला परत बाहेर काढले. तदनंतर मी एक प्रतिज्ञा केली. त्यांनी जर मला एका सत्यसाईला पाहण्यापासून परावृत्त केले तर मी सर्व पुरुषांना सत्यसाईंमध्ये  परिवर्तित करेन आणि सर्व स्त्रियांना वसंत साई. माझी तपश्चर्या आणि माझ्या अश्रूंमुळे माझे आणि स्वामींचे भावतरंग सर्वत्र आणि सर्वांभुती प्रवेश करतील. हे सत्ययुग आहे. आमच्या हृदय संगमामधून विश्व् ब्रह्म गर्भ कोट्टम निर्माण झाले. आमचे भावतरंग तेथून स्तुपात जाऊन मग विश्व व्यापतात. आम्ही अखिल मानव जगताची कर्मे आमच्या शरीरांवर  घेऊन सर्वांना रिक्त करतो. अशा रीतीने आमचे भावतरंग  सर्वांभुती प्रवेशतात.
केवळ आम्ही दोघे आमच्या भावतरंगांद्वारे अवघे जग व्याप्त करतो. स्वामींनी हे पाहिलं. सर्वत्र केवळ आमचेच भावतरंग. स्वामी आले की माझी वृद्ध काया तरुण होते. मी ज्योतिस्वरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन होते. माझी वृद्ध काया युवा झाली की वृद्ध कलियुग तरुण होतं म्हणजे सत्ययुगाचा उदय होतो. सर्व मानवता जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करते. पृथ्वी स्वर्गात परिवर्तित होते. हे स्वामींचं अवतार कार्य आहे. 
आज प्रभाकरनी एक बिल्वपत्र दिलं, त्याची तीन पाने तीन आकारात होती. एक पान दोनात विभागलं : परमेश्वर व त्याची शक्ती, तर पानाचा तिसरा भाग सृष्टी. तिन्ही एक आहेत.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा