सोमवार, ९ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


श्री वसंत साईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने  
रत्न - १ 

मी तुम्हा सर्वांसाठी मुक्ती सुरक्षित ठेवेन

वसंता : "स्वामी! जगामधील सर्वजणं माझी मुले आहेत. मी त्यांना माझ्या गर्भात धारण करून त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांनी केवळ मी सेवन करत असलेले साई अन्न सेवन केले पाहिजे. मी प्राशन करत असलेले साई अमृत प्राशन केले पाहिजे. ज्याक्षणी ते माझ्या गर्भातून बाहेर पडतील तेव्हा त्यांनी शुक मुनींसारखा केवळ परमेश्वराचा धावा केला पाहिजे. माझ्या मातृभावाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.माझ्या मुलांसाठी मी काहीही करायला तयार आहे. मी माझ्या भावांचे रक्तात रूपांतर करून त्यांना पाजेन. बाह्य जगताचा प्रभाव त्यातील संदेह, भ्रम आणि प्रलोभने ह्या सर्वांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी
मी त्यांना माझ्या गर्भात ठेवू इच्छिते.
स्वामी: तुझे हे जाज्वल्य मातृभाव जगातील प्रत्येकामध्ये परिवर्तन घडवतील आणि सत्ययुग उदयास येईल. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या उपसदमचे हे खरे स्पष्टीकरण आहे. आणि ह्या उपसदमचे तू प्रात्यक्षिक दाखवणार आहेस.

जगाला प्रकृती तत्त्व समजलेले नाही. जगाने  केवळ परमेश्वराची 'सत्य' ही एकच बाजू पहिली आहे. इथून पुढे, ते माझ्या जीवनाद्वारे,परमेश्वराची 'प्रकृती'
ही दुसरी बाजू पाहणार आहेत.

केवळ पूर्ण मातृभाव मनुष्याला सत्याकडे घेऊन जातो. माझा मातृभाव आखिल जगतास सत्यामध्ये विलीन होण्यासाठी घेऊन जाईल. केवळ माताच मुलाला  त्याचा पिता कोण आहे ते दाखवू शकते.

माझा मातृभाव जगत्पित्यास,म्हणजेच परमेश्वरास दाखवील. प्रत्येकास सत्याकडे,सत्यसाईंकडे घेऊन जाणे हे माझे कर्तव्य आहे. ते तुमचे खरे वडील आहेत. सर्वांना ते जेथून आले आहेत, तेथे त्यांच्याकडे परत घेऊन जाणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हा माझ्या जीवनाचा दुसरा भाग आहे.

माझ्या जीवनाच्या पहिल्या भागात, माझ्या प्रेमाद्वारे मी परमेश्वरास प्राप्त केले आणि जीवनाच्या दुसऱ्या भागात मी तुम्हा सर्वांसाठी मुक्ती सुरक्षित करून ठेवणार आहे. माझ्या ह्या कार्यात मी यशस्वी होईन.

कशी? कारण मी सत्याला प्राप्त केले आहे आणि केवळ सत्य विजयी होते. सत्याचा सदैव विजय होतो.

केवळ ह्याच उद्देशाने आदिपुरुष श्री सत्यसाई बाबांनी अवतार धारण केला आहे. प्रत्येकास इथेच याक्षणी मोक्षप्राप्ती झाली पाहिजे!

- श्री वसंत साई अम्मा 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा