ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुम्हाला परमेश्वरापासून दूर करणारी प्रत्येक गोष्ट माया आहे. "
१४
आपत्संन्यास
दुसरे उदाहरण
माझ्या खूप जवळचे एक कुटुंब पूर्वकर्मांमुळे त्रास भोगत होते. अनेकवेळा स्वामींनी त्यांचा कर्मसंहार होण्यासाठी मला त्यांच्या घरी तीन रात्री राहण्यास सांगितले होते. एकदा स्वामींनी त्यांच्या मोठ्या मुलीला तिच घर सोडून माझ्या घरी येऊन राहण्यास सांगितले. स्वामी म्हणाले की हे त्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहे. परंतु त्या कुटुंबाने तसे केले नाही; त्यांच्या अडचणी चालूच राहिल्या आणि त्यांची दुःख वाढतच गेली. पुन्हा त्यांनी मला फोन केला आणि प्रार्थना करण्याची विनंती केली. मी प्रार्थना केली. स्वामी म्हणाले की हे सर्व त्यांच्या कर्मांमुळे होत आहे. ते आख्ख कुटुंब स्वामींचे खूप चांगले भक्त आहेत. स्वामींनी त्यांना अनेक इंटरव्ह्यूही दिले आहेत.
आता स्वामी म्हणालेत की जर त्यांनी त्यांचा मुलगा स्वामींच्या कार्यासाठी दिला तर त्यांची कर्म धुतली जातील. हा झाला आपत्संन्यास. एकदा एक व्यक्ती परमेश्वराला अर्पण केली की सर्व प्रश्न खात्रीने सुटतात. कॅथॉलिक कुटुंबामध्ये मुलगी परमेश्वराच्या सेवेसाठी चर्चला अर्पण केली जाते.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा