ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम भाव निर्माण होतात, त्यानंतर त्याचे विचार बनतात. त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा. विचार करा, हे सत् कृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का ?"
१४
आपत्संन्यास
एकदा मी कोईमतूरला एका वृद्धाश्रमात गेले होते. तिथे मी अनेक नन्सना हसतमुखाने, मनापासून वृद्धांची सेवा करताना पाहिले. हेच आहे स्वामींनी सांगितलेल्या ' सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा ' च खरखुर प्रात्यक्षिक.
आपण या जगात जन्माला आलो, इथे राहतो. जेव्हा आपण फक्त परमेश्वरासाठी जगतो तेव्हा त्यात किती बर आनंद असतो ! हा एक प्रकारचा कर्मसंहारच आहे. त्याग हाच त्यावरील खात्रीचा उपाय आहे.
- आदिशंकरांनी सर्वसंगपरित्याग केला - संपूर्ण जगासाठी
- राजाराम स्वामीजींनी सर्वसंगपरित्याग केला - परमेश्वराचा दूत होण्यासाठी
- डॉक्टरांच्या आजोबांनी सर्वसंगत्याग केला - त्यांच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी
- कर्माचे भोग भोगणाऱ्या कुटुंबाला एका मुलाचा त्याग करून परमेश्वराच्या कार्यास अर्पण करण्यास सांगितले - कर्म धुतली जाण्यास
- वैष्णवीला भौतिक जीवनाचा त्याग करण्यास सांगितले - स्वामींच्या कार्यासाठी
* भौतिक जीवनाचा त्याग करा आणि परमेश्वरासाठी जगा.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा