गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " मधुर बोला, मधुर वागा. केवळ तोंडाने नव्हे तर अंतःकरणापासून !"
१५ 
कोळी 

         कोळी चंद्राच्या प्रभावाखाली जगणारा प्राणी आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलांचे या जगावर, जिथे माणसाचा जन्म आणि मृत्यु होतो, तिथे आधिपत्य आहे, त्याचप्रमाणे संहाराच्या कृतीतून दर्शवतो. 
         निर्मितीची शक्ती सर्वांमध्ये असतेच. कोळी जाळे विणण्यासाठी स्वतःच्या शरीरातील धागा वापरतो. तशीच निर्मितीची शक्ती माणसातही आहे. ती शक्ती तो स्वतःचेच जाळे विणण्यासाठी वापरतो. त्याने स्वतःनेच निर्माण केलेल्या स्वतःच्या विश्वात, मायेच्या जाळ्यात तो मध्यभागी बसतो. माझ्या मागील पुस्तकात, 'शिवसूत्र ' मध्ये, मानव इच्छा, कल्पनाशक्ति आणि प्रयत्नांनी कशी निर्मिती करतो हे मी लिहिल आहे. तो त्याच्या इच्छा आकांशांनी मायाविश्व निर्माण करीत असतो. एकदा का तो त्यात अडकला की मग सुटू शकत नाही. 
           कोळ्याच्या जाळ्याच्या चिकटपणामुळे किडे त्यात अडकतात. ते किडे त्या कोळ्याचे खाद्य होते. कोळी हा प्रकृतीचे निदर्शन करतो. प्रकृती म्हणजेच निर्मित जग, मायेचे जाळे ! ती अद्भूत जगाची रचना करीत असते. सर्वजण या विश्वात अडकतात, आणि सुटू शकत नाहीत. या जगात अस काय बर आहे जे माणसाला सुटू देत नाही ? असा कोणता गोंद त्याला या जगाशी जखडून ठेवतोय ? ' स्पर्शज्ञान - हाच तो गोंद ' हे स्पर्शज्ञान सर्वांना बांधून ठेवते. अशाप्रकारे स्वतःच सतत विणत असलेल्या जाळ्यात ते अडकतात. जन्ममृत्युच्या चक्रात फिरत राहतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा