रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " अतृप्त इच्छा आपल्याला पुनःपुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. "
१६
गेले ! ते दिन गेले 

         द्वापारयुगात, कृष्णाने भगवद् गीतेचा उपदेश केला. आता सर्वजण ती वाचतात, श्लोकांचा जप करतात आणि अक्षरशः त्याची पारायणेही करतात. देवघरात ठेवून पूजासुद्धा केली जाते. लोक तो ग्रंथ आदराने डोळ्यांना लावतात, पण कितीजण त्याच्या शिकवणीप्रमाणे वागतात ? कलियुग म्हणजे गैरवर्तनांचे युग होय. म्हणूनच कर्माचा कायदा समजून सांगण्यासाठी अवतार पृथ्वीवर आला आहे. 
          मनात उठणारा प्रत्येक भाव संस्कार बनतो. 
          सर्वांना मुक्ती मिळणार अस एकदा समजल तर लोकांना पापाची अजिबात भिती राहणार नाही. ते विचार करतील, ' मुक्ती मिळणारच आहे, तर मग आयुष्याचा पूर्णपणे आनंद लुटू या .' लोकांनी असा विचार करणे चुकीचे आहे. स्वामींना हे मान्य नाही. ते कर्मकायद्याविषयी ध्यानात मला सांगून मग लिहिण्यासही सांगतात. काही लोकांना वाटते की त्यांना कसेही वागण्याचा परवाना आहे. कृपाकरुन अशी समजूत करून घेऊ नका. सत्ययुगानंतर तुमची कर्म भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुम्ही दुसऱ्या कलित, अतिशय भयंकर अशा कलित जन्म घ्याल, आणि भोग भोगाल. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १४ जानेवारी 

      " तुम्ही कुठेही असा आणि काहीही करीत असा, त्यावेळचं तुमच्या हातातील कार्य भक्तिभावानं  करा. "

हा अतिशय महत्वाचा सुविचार आहे. लोकं सहसा देवपुजेसाठी ठराविक वेळ राखून ठेवतात. ते सकाळी आणि संध्याकाळी यंत्रवत देवघरात जाऊन पुजापाठ करतात. ते देवासाठी दिवसाकाठी  पाच ते दहा मिनिटं वेळ काढतात. हे काही बरोबर नाहीये.  भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण कर्मयोगावर नि:संदिग्धपणे सांगतात की, तुम्ही जे कोणतेही कार्य हाती घेता ; ते श्रद्धेने पूजा म्हणून करा. तुम्ही प्रत्येक कृती भक्तिभावाने करावयास हवी. अशा रीतीनं साधं काम सुद्धा कर्मयोगात परिवर्तीत होते आणि भगवंतास अर्पण होते. स्वामींनी मला भगवतगीतेवर भाष्य लिहायला सांगितले. भगवतगीतेची शिकवण मी आचरणात कशी आणली ; ते त्यांनी माझ्या जीवन शैलीमधून दाखविण्यास सांगितले. पुस्तक लिहीत असताना माझ्या लक्षात आलं की, माझ्या नकळत मी गीतेचे अठराही अध्याय माझ्या आचरणात आणले होते. सकाळी दात घासताना मी देवाचा विचार करते. हात जरी दात स्वच्छ करण्याचं कार्य करीत असले तरी मन भगवंतामध्ये मग्न असते. ह्यामुळे हे सर्वसाधारण कार्य कर्मयोग होते. कृती पुजेत परिवर्तीत होते. स्नान करतेवेळी मी विचार करते की; हे पवित्र गंगा जल आहे आणि म्हणते, " हे जलनिधे, गंगा माता माझी पापं नष्ट कर.  " मग मी सर्व पवित्र नद्यांना त्यांच्या नावांनी आवाहन करीत असते . ह्यामुळे साधी आंघोळ करण्याची क्रिया पूजा होऊन स्नान योगात बदलली. 
 आता आपण एक गोष्ट पाहू यात. एकदा पार्वतीनं भगवान शंकरांना विचारलं की, पवित्र गंगा नदीत स्नान करणाऱ्या सर्वांना मुक्ती मिळते ना?  भगवान शिवाने नकारात्मक उत्तर दिलं. हे अजून विस्तारानं स्पष्ट करण्यासाठी शिव  पार्वतीसह एका रोगग्रस्त जोडप्याच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. गंगा नदीत डुबकी मारून येणाऱ्या सर्वांना पार्वती देवी विनवत होती की; आता तुम्ही पापमुक्त झाले असाल तर माझ्या नवऱ्याला एक कप पाणी द्या, ते रोगमुक्त होतील. तिच्या असं लक्षात आलं की त्यांची पापं नाहीशी झाली असा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा कुणा एकालाही नव्हती. ती चकित झाली. पर्यायानं एकही जण तिच्या मदतीला आला नाही. अखेरीस एक गुन्हेगार गंगेत आंघोळ करून आला. गंगा स्नानाने आपण पापमुक्त झालो ; यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यानं पार्वतीला तात्काळ मदत केली अन तो रोगग्रस्त वृद्ध बरा झाला.
पुष्कळ लोकं रोज गंगा नदीत स्नान करतात, तथापि ते पापमुक्त होतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास नसतो. असे असेल तर  गंगेत स्नान करण्याचा काय उपयोग? माझ्या बाबतीत मी माझ्या भक्तिभावानं माझ्या घरातील साधं जल गंगाजलात परिवर्तीत केलं. ह्यामुळे साधी आंघोळीची कृती पुजेत बदलते. तुमच्या कृतीमध्ये हा भाव नसेल तर प्रत्यक्ष गंगा स्नानही निरुपयोगी आहे. 
आता आपण स्वयंपाकाविषयी पाहू  यात. स्वयंपाकास सुरुवात करण्यापूर्वी मी स्टोव्हवर विभुतीनं 'साईराम ' लिहून प्रार्थना करते, "हे प्रभू , मी जो काही स्वयंपाक करते तो तुला अर्पण करते. सगळा स्वयंपाक चांगला होवो आणि तो सत्व गुणांनी परिपूर्ण असो." अशा रीतीनं स्वयंपाक करण्याची सामान्य क्रिया पुजापाठात बदलते. सकाळपासून रात्रीपर्यंत मी प्रत्येक घरकाम याच पद्धतीनं करते. आपल्या भावभावनांद्वारे सर्वसाधारण कामेसुद्धा पवित्र होतात. ही देवघरात केलेली यंत्रवत पूजा नाहीये. ही जीवनभर क्षणोक्षणी केलेली पूजा आहे. ह्या पुजेमुळे कलियुगाचं सत्ययुग होतं.    
हा सगळ्यात मोठा फायदा आहे. साधारणपणे लोकं दर दिवशी पुजापाठाकरिता काही मिनिटं राखून ठेवतात. तथापि माझी जीवनभराची क्षण नं क्षण केलेली पूजा आहे. ह्यामुळे वैश्विक मुक्ती प्रदान होते.  म्हणून तुम्ही दिवसाकाठी थोडे क्षण  पूजा करू नका तर पुजापाठ हाच जीवनाचा आधार बनवा. ही पूजा यंत्रवत असता कामा नये, तरच ती तुम्हाला जन्म- मृत्यूच्या चक्रातून सोडवेल. तुमच्या पुजेची जागा देवघरात सीमित करू नका. तुम्ही ऑफिसात असा, प्रवासात असा, कुठेही असा; तुमचे कर्म भगवंताला अर्पण करण्याच्या भावनेने करा. 
आता आपण एक उदाहरण पाहू यात. मी पूर्वी ट्रेननं दिल्ली, मुंबई, पुणे, चंदिगढ असा प्रवास करीत असे. आम्ही सर्वजण एकत्र बसून ध्यान, सत्संग, अभिषेक, मंत्रपठण, आणि भजने , गाणं असं सर्व करीत असू. आमचे सहप्रवासी आमच्या कार्यक्रमात सहभागी होत असत. अशा रीतीनं आम्ही ट्रेनचं रूपांतर मंदिरात करत असू. जेव्हा मी ऑस्ट्रलियाला गेले होते तेव्हा असंच झालं. आम्ही विमानतळावर बसून ध्यान करत होतो, तेव्हा पुष्कळ जण येऊन आमच्याबरोबर ध्यानाला बसले. ध्यानानंतर मी डोळे उघडले आणि मला धक्काच बसला. माझ्या भोवती खूप जणं ध्यानात बसली होती. ह्यामुळे एक साधा विमान तळ पवित्र मंदिर झाला. कारने प्रवास करताना सुद्धा आम्ही सत्संग करीत असू .तसेच मी माझे लिखाणही करीत असे. अशा  पद्धतीनंआम्ही कुठेही असलो तरी, कुठेही जात असताना, आणि कुठलीही कामं करीत असता वातावरणात पावित्र्य निर्माण करीत होतो. 
२५ /६ /२०१६  मध्यान्ह  ध्यान 
वसंता : स्वामी, तुम्ही राधा,कृष्ण आणि आपल्याबद्दल काही सांगा नं. 
स्वामी : कृष्णानं राधेला स्वतःपासून विभागलं. त्याच्या ल्हादिनी शक्तीनं राधेचं रूप धारण केलं. तिनं त्याला आनंदानुभव दिला. मी तुला माझ्यापासून विभागलं. तू  माझी संकल्प शक्ती आहेस. माझ्या कार्याला तू पूर्णत्व देतेस. राधा कृष्ण; तसेच तू आणि मी साधारण  स्त्री व पुरुष नाही आहोत. ही रूपं केवळ आपल्या कार्याकरिता आहेत. 
वसंता : आता मला समजलं स्वामी. तुम्ही लवकर या. तुम्ही आला नाहीत तर माझ्या अव्याहत लिहिण्याचा काय उपयोग?
स्वामी : असं बोलू नकोस गं. मी येईन. केवळ तुझ्या लेखनामुळे जगाचा उद्धार होणार आहे. 
ध्यान समाप्त.  
आता आपण पाहू यात - राधेचा उदभव कृष्णामधून झाला आणि माझा स्वामींमधून. आम्ही स्त्री आणि पुरुष अशा व्यक्ती नाही आहोत. राधा कृष्णाची ल्हादिनी शक्ती आहे. मी स्वामींची संकल्प शक्ती; जी त्यांचा संकल्प पूर्ण करते, ती शक्ती मी आहे. नवसृष्टीची निर्मिती हे स्वामींचं कार्य आहे. जेव्हा भगवान निर्मितीचा संकल्प करतो तेव्हा तो विराट पुरुषाचं रूप धारण करतो. ह्या रूपामध्ये स्त्री व पुरुष आलिंगन अवस्थेत असतात. हे दोघे विभक्त झाले की निर्मितीची सुरुवात होते. हे सर्व प्रतिकात्मक आहे. स्वामी आणि मी;आम्ही भौतिक पातळीवर कधीच एकमेकांना स्पर्श केला नाही, अथवा कधी एकमेकांशी बोललोसुद्धा नाही. आमचा फक्त आणि फक्त भावसंगम, हृदयाचं मीलन आहे. आमच्या हृदयाच्या मीलनानेच बाहेर विश्व् ब्रह्म गर्भ कोट्टम या मंदिराचं रूप धारण केले आहे. येथूनच आमचे भाव स्तुपाद्वारे अवकाशात प्रवेशतात आणि जग परिवर्तन घडून येते. बाल वयातच स्वामींनी घोषित केलं होतं की, " मी माझ्यापासून मला विभक्त केले, जेणेकरून मी स्वतःवर प्रेम करू शकेन." स्वामींनी मला त्यांच्यापासून विभक्त केले. तद्नंतर मी प्रकाशरूपात माझ्या आईच्या गर्भात प्रवेश केला, आणि माझा जन्म झाला. अखेरीस माझ्या कायेचं ज्योतीमध्ये रूपांतर होऊन मी स्वामींमध्ये विलीन होईन. आम्ही साधारण स्त्री पुरुष नाही,याचा हा पुरावा आहे.

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " प्रवाहाबरोबर जाऊन आनंदाची प्राप्ती करून घ्या. परमेश्वराला त्याच्या इच्छेनुसार तुमचे जीवन नियंत्रित करू द्या."
१६ 
गेले ! ते दिन गेले 

           स्वामी आणि मी इथे जगाला कर्मकायदा शिकवायला आलो आहोत. जर जगातल्या सर्वांची कर्म पूर्णपणे धुतली गेली तर ते पुन्हा चुका करतच राहतील. पृथ्वी ही कर्मभूमी आहे. आपण जन्म घेतलाय तो केवळ अनुभवायला आणि कर्म संपवायला. इथे कृती केल्याशिवाय कोणी जगूच शकत नाही. जेव्हा कर्मयोगानुसार कृती होते तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला बांधून ठेवत नाहीत. याप्रमाणे कर्माचा कायदा आपल्याला लागू होणार नाही. 
           ' साई गीता प्रवचनम् ' या पुस्तकात सामान्य कृती ही योगात कशी परिवर्तित करायची याविषयी इ लिहिले आहे. ' ज्ञानगीता ' या पुस्तकात मी याविषयी अधिक सखोल लिहिले आहे. पहिले पुस्तक सामान्य साधकांसाठी आहे. ज्ञानगीता हे उच्चस्तरीय साधकांसाठी आहे.     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " तुमच्या चांगल्या वाईट दोन्ही कर्मांची कार्मिक खात्यात नोंद केली जाते. "
१६ 
गेले ! ते दिन गेले 

           लहानपणापासून आजमितीपर्यंत मी अनेकदा आजारी पडले. किती आजार ! पण डॉक्टरांकडे न जाता मी ते सर्व सहन केले. त्रास होतच राहिला. कलियुगात पंचमहाभूते पूर्णपणे प्रदूषित झाली आहेत. सर्वत्र नकारात्मक भावकंपने आहेत. मी प्रकृती असल्यामुळे माझ्या पंचेंद्रियांना त्रास होतो. सत्ययुगात नवनिर्मितीत सर्व शुद्ध असायला हवे. माझी पंचेंद्रिये स्वस्थ बनतील आणि पंचमहाभूतेही शुद्ध होतील. 
          मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले की संसारी माणसांच्या भावकंपनांमुळे पंचमहाभूते प्रदूषित झाली आहेत. माझी पंचेंद्रिये पंचमभूताचे प्रदूषण शोषून घेतात, त्यामुळे मला त्रास होतो. पंचमहाभूते बदलली तर कलिसुद्धा बदलेल. मी इथे सर्वांना मुक्ती देण्यास आले आहे. मी स्वामींकडे प्रार्थना करते की माझ्या तपश्चर्येचे सर्व सामर्थ्य घ्या आणि वैश्विक मुक्ती द्या. पूर्वी स्वामी म्हणाले की जगाची कर्म समतोल करण्यासाठी मी ती माझ्या देहावर घेते. स्वामी म्हणाले, " आपण जर आपल्या शरीरावर कर्म घेतली नाहीत तर वैश्विक कर्मसंहार होणार नाही. "

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

महाशिवरात्री संदेश

शिवरात्रीचे महत्व

प्रेमस्वरूपलारा !

         आज महाशिवरात्र साजरी होत आहे. शिवरात्री हा शब्द चार अक्षरांनी तयार होतो. अंकशास्त्रानुसार, श व आणि र  एकत्र केल्यावर ११आकडा येतो. ११ ही संख्या पाच जननेन्द्रियं पाच कर्मेंद्रियं आणि मन यांचे प्रतिनिधित्व करते. अकरा रुद्र या अकरा अवयवांचे नियमन करतात.
          हे अकरा अवयव मनुष्याला भौतिक इच्छांमध्ये गुंतवून त्याला भौतिक अस्तित्वाच्या स्तरावर  खाली खेचतात. या अकरा अवयवांच्या पलीकडे असतो तो परमात्मा, सर्वव्यापी! जो पूर्णतः परमेश्वरावर विसंबून असतो तो या अकरांवरही प्रभुत्व मिळवू शकतो. शिवा पांडुरंग राम आणि कृष्ण यांच्यामध्ये कोणीही कोणताही भेद मानू नये कारण कोणत्याही नामाची भक्ती केली तरी दिव्यत्व एकच आहे.
         या रात्री मनुष्याच्या १६ कलांपैकी १५ कला मनुष्याच्या दिव्यत्वामध्ये लय पावतात आणि केवळ एकच कला उरते त्यामुळे या वेळेमध्ये दिव्यत्वाची अनुभूती घेणे सहज सुलभ होते. किमान या एका रात्री जर मनुष्याने त्याच्या इंद्रियांना नियंत्रित केले तर त्याला निश्चितच दिव्यात्वाची अनुभूती होते आणि त्याचबरोबर जर त्याने सर्व कुविचार बाजूला सारून मन परमेश्वराच्या नामावरती केंद्रित केले तर त्याला चैतन्याची अनुभूती होते. या प्रक्रियेस जागरण म्हणतात.आज रात्री अशा प्रकारे पवित्र,दिव्य जागरण करून दिव्यानंदाची अनुभूती घ्या.
- बाबा
१२-२-१९९१ 
 रोजी भगवान बाबांनी दिलेल्या महाशिवरात्री दिव्य संदेश मधून

जय साईराम 


गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " मृत्युसमयी तुमच्या मनात असणारे विचार, तुमच्या पुढील जन्मासाठी बीज निर्मिती करतात. "
१६
गेले, ते दिन गेले !

तारीख १० जानेवारी २००९ ध्यान 
वसंता - स्वामी, आपण आपल्या देहांवर कर्म घेऊन का बर त्रास सहन करतोय ? ही कोणाची कर्म आहेत ?
स्वामी - जगातल्या वाईट भावकंपनांनी पंचमहाभूते प्रदूषित झाली आहेत. सर्वांनाच त्याचा त्रास होतोय. तू कली बदलण्यासाठी आली आहेस. तुला सर्वांना मुक्ती द्यायची आहे, त्रास होतो आहे. 
वसंता - स्वामी, तुमची इच्छा असेल तर तुम्ही कर्म शरीरावर न घेताही धुवून टाकू शकता. 
स्वामी - आपण इथे कर्मकायदा शिकवण्यासाठी आलो आहोत. जर मी एखाद्याची कर्म धुवून टाकली तर तो अजाणतेपणी पुन्हा त्याच चुका करीत राहील. म्हणूनच आपण त्यांची कर्म आपल्या भौतिक देहावर घेऊन कर्माचा हिशोब समतोल करीत आहोत. कर्मकायद्यानुसार कर्म समतोल झाल्यावरच संपतात. कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे लोक युगानुयुगे यातना भोगत आहेत. 

ध्यानाची समाप्ती  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " परमेश्वरावर केंद्रित असणारे भक्ताचे प्रेम विस्तार पावते आणि जीवात्मा परमात्मा बनतो. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे. "
१५
कोळी 
 
          हे लिहिल्यावर मला थकवा आला आणि मी छोटीशी विश्रांती घेतली. मी सहजच फळीवरून ' तपोवनम् ' हे पुस्तक उचलले आणि २६२ वे पान उघडले. तिथे लिहिले होते की एकदा स्वामी मुंबईमध्ये धर्मक्षेत्रला गेले. कारुण्यानंद नावाचे भक्त त्यांच्याबरोबर होते. एकदा कारुण्यानंदांनी त्यांच्या खिडकीतून कचराकुंडीत पडलेल्या अन्नासाठी काही मुलांना भटक्या कुत्र्याशी झटापट करताना पाहिले. त्यांना वाईट वाटले आणि त्या मुलांची दया आली. अचानक, स्वामी खोलीत आले आणि त्यांनी स्वामींना ते दृश्य दाखवले. कारुण्यानंदांनी स्वामींना विचारले, ' स्वामी, हे अस का बरं ?" 
         स्वामी म्हणाले, " पूर्वजन्मी ही मुले खूप ऐषारामात रहात होती. त्यांनी खूप किंमती आणि चविष्ट अन्न खाल्ले. ते थोडेसे खाऊन बाकीचे कचऱ्याच्या टोपलीत फेकून देत असत. ते काय करताहेत हे त्यांना कळत नव्हते आणि म्हणूनच ह्या जन्मी त्यांच्यावर कचराकुंडीतून जेवण वेचायची पाळी आली. त्यांच भाग्य त्यांनीच बनवले, त्यातून कोणाची सुटका नाही." 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम 

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " मेणबत्ती जशी प्रकाश देण्यासाठी स्वतः जळते, तसे तुम्ही जगातील सर्वांना प्रेम द्या. "
१५
कोळी 

           कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या किड्यांना कोळी विषाचे इंजेक्शन देतो. त्यामुळे ते पांगळे होतात. नंतर कोळी त्याच्या भक्षाला रेशमी आवरणात गुंडाळतो. त्याला भूक लागली की ताज अन्न त्याच्यासाठी तयार असत. किडा जिवंत असतो पण फिरू शकत नाही. 
           अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवले जाते. त्याचप्रमाणे, कोळी त्याच अन्न ताज रहाव म्हणून रेशमी जाळ्यात गुंडाळतो. जरी किड्याला सुटका व्हावी असे वाटत असले तरी ते अशक्य असते. त्याला घट्ट बांधलेल असत. आणि म्हणून तो फिरुच शकत नाही. 
           माणसाची स्थितीही अशीच आहे. तो त्याच्या पूर्वकर्मांची पीडा भोगत असतो. जरी त्याला तो का भोगतो आहे हे समजले तरी त्याचे भवितव्य आधीच ठरलेले असते, तो ते बदलू शकत नाही. प्रत्येकजण स्वतःचे भवितव्य स्वतःच निर्माण करत असतो, पण स्वतःला सोडवू शकत नाही; त्याची पूर्वजन्मांची कर्म त्याला पांगळा बनवतात.

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
श्री वसंत साईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने  
रत्न - २
राधेचा कृष्णाशी योग *

आम्ही दिल्लीमध्ये असताना, स्वामींनी मला ऋषिकेश मधील वशिष्ठ गुहेस  भेट देण्यास सांगितले.
 १७ एप्रिल २००२ रोजी, पहाटे चार वाजता, भगवान बाबांनी, त्यांच्याशी माझे ऐक्य होण्यासाठी, मला शुद्ध सत्त्व  बनवले. हे शुद्ध सत्त्वाचे परमेश्वराशी झालेले ऐक्य आहे.
स्वामींनी विविध प्रकारे ह्या प्रसंगाला आशीर्वाद दिले अचानकपणे,कम्प्युटरच्या पडद्यावर त्यांचा आशीर्वाद देणारा संदेश  दृश्यमान झाला तसेच माझ्याबरोबर आलेल्या जवळच्या भक्तांना ह्या प्रसंगास पुष्टी देणारे आध्यात्मिक अनुभव आणि अलौकिक दृश्यांची अनुभूती आली. ह्या  प्रसंगाचे महत्त्व काय? आणि तो प्रसंग का घडला?
स्वामींनी ह्या अलौकिक ऐक्याला * सत्य युगाच्या पायाभरणीचा दगड * असे घोषित केले. ह्याचा भक्कम पुरावा ते वृंदावन  व्हाईटफील्ड येथे देतील असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, १७ मे रोजी, मी ज्या घरामध्ये राहत होते तेथे स्वामींच्या  फोटोवर गुलाबी रंगाचे डाग आढळले. स्वामी म्हणाले,"  राधेचे माझ्या मध्ये विलयन झाल्याचा हा पुरावा मी तुझ्यासाठी  दिला आहे.राधेच्या कायेचा रंग गुलाबी आहे."
२४ एप्रिलला स्वामींनी आम्हाला  दिल्लीहून मथुरा, वृंदावनला जाण्यास सांगितले. वास्तविक, एक आठवडा गोदर स्वामींनी मला पहाटे ४च्या  ध्यानामध्ये, नारद मुनींच्या उपस्थितीत,साई कृष्णाचा वसंत राधेशी विवाह संपन्न झाल्याचे दाखवले. स्वामींनी ह्या दिव्य ऐक्याचे अनेक पुरावे  दाखवले. वृंदावन येथील मंदिरात गेल्यावर, आम्हाला अनेक अलौकिक  अनुभव आले आणि अनेक चमत्कारही घडले.
स्वामींनी सांगितले की हा प्रसंग, कृष्णासाठी,राधा आर्ततेने घालत असलेल्या सादेची समाप्ती करणारा आहे.

-- श्री वसंत साई अम्मा 🕉🆚

🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸

🌸ओम श्री साई वसंतामृत दायकाय नमः🌸

जय साईराम 

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" परमेश्वराप्रती असणारे प्रेम हेच खरे प्रेम. बाकीसर्व आसक्ती. "
१५
कोळी 

        पुट्टपर्तीत झालेल्या जागतिक युवा परिषदेच्यावेळी मी एक कविता लिहिली होती. 
' युवाशक्तीच्या पकडीतून परमेश्वर निसटू शकत नाही
परमेश्वराच्या जाळ्यातून युवक सुटू शकत नाही. '
          या अमृतमयी जाळ्यातून कोणीही सुटू शकत नाही. ह्या वैश्विक जाळ्यातून परमेश्वराचीही सुटका होणार नाही. तो अंतर्यामी वास करतो. म्हणून स्वतःला लपवू शकणार नाही. त्याला बाहेर येऊन स्वतःचे अस्तित्व दाखवावेच लागेल; बहिर्यामी होऊन!
*   *   *

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" प्रेम  करा अधिक प्रेम करा..... कोणालाही दुखवू नका. "
१५ 
कोळी 

          आज, माझ्या खोलीत सापडलेल्या कोळ्याचा काढलेला फोटो आम्ही बारकाईने पाहिला. त्याच शरीर आणि डोके जवळजवळ माणसासारखे होते. त्याला दोन डोळे, नाक, तोंड होत आणि विभूतीनी भरलेल कपाळ व त्रिकोणी मुकुटपण होता. कोळ्याचे पाय गुलाबी होते आणि हृदयाच्या आकाराच्या शरीरावर आठ निळे ठिपके होते ! 
 
मी कोळी आहे ! मी नव्या निर्मितीचे, सत्ययुगाचे जाळे 
विणत आहे. हृदयाच्या आकाराच्या देहावरील आठ ठिपके 
म्हणजे माझ्या हृदयावर खोल कोरला गेलेला अष्टक्षरी मंत्र 
होय. गुलाबी पाय म्हणजेच प्रेम - मी चोखाळलेला मार्ग 
आहे. सत्ययुगात सर्वजण प्रेमपथावरूनच चालणार आहेत. 
सर्वांचा स्वभाव प्रेमळ असेल. कोळ्याचे हिरवे शरीर हे, 
माझ्यातून स्रवणाऱ्या अमृतानी विणल्या जाणाऱ्या नवीन 
सृष्टीच सदाहरित प्रतिक आहे. या अमृतमयी सृष्टीत सर्वजण 
मुक्तपणे संचार करतील. ते कुठल्याही जाळ्यात अडकू
शकणार नाहीत. 

ही सृष्टी स्वामी आणि माझ्यापासून जन्मास येते. 
इथल्या सर्व मुलांमध्ये माझ रक्त वाहणार आहे. शुकमुनींप्रमाणे 
सर्वांच्या मनात परमेश्वराचेच विचार असतील. या नवीन 
सृष्टीच्या जाळ्यात, चिकट अमृताचा स्त्राव सर्वांना पकडेल 
आणि सर्वांना चिकटून रहायला भाग पाडेल. कोणीही 
अमरत्वाच्या युगातून सुटू शकणार नाही. हेच असेल 
अमृतयुग, आनंदयुग, अमरयुग. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम