शुक्रवार, ३० जून, २०२३

                       ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. " 
कर्मयोग उपाय 

         आज स्वामींनी  भावना, ह्या रूप आणि कर्मांशी कशा संबंधित असतात याविषयी सांगितले. 
२५ जून २००६ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, मला तुम्हाला पहायचं आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात, दुसरं काहीही नको. 
स्वामी - तू नेहमी रडतेस, 'मला तुम्हाला पहायचं आहे, मला तुम्हाला पहायचं आहे !' हे फक्त रूप आहे. मी तुझ्याबरोबरच आहे. आपण सर्वांमध्ये शिव आणि शक्ती म्हणून वास करीत आहोत. आपण सर्वत्र आणि सर्वांच्या ठायी सर्व होऊन आहोत. मुक्ति निलयममध्ये मी तुझ्याबरोबर असतो. हे सत्य तुला आनंद देईल. रूप तुला समाधान देऊ शकणार नाही. तू माझ्या दर्शनासाठी येतेस, तेव्हा तुझ्या मनात अनेक निरनिराळे भाव उमलतात, ' स्वामी आज आले, पण मी त्यांना पाहू शकले नाही. मल्ल चांगली जागा मिळाली होती, पण ते आलेच नाहीत.... ' तू भावना व्यक्त करतेस, उद्विग्न होतेस, रडतेस आणि नाराज होतेस. हे रडणाऱ्या साड्यांच्या गोष्टीसारखेच आहे. इथे सगळा आनंदीआनंद आहे. ताटातूट नाही. रूप नाही, फक्त तत्व आहे. म्हणूनच इथे नेहमी आनंद आहे. मुक्ति निलयम हे 'तत्व ' आहे, प्रशांती निलयम हे रूप आहे. 
ध्यानाची समाप्ती 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम      

गुरुवार, २९ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
कर्मयोग उपाय 

         मी वेगळी कशी आहे ? इतरांमध्ये दोष काढण्याऐवजी मी माझ्यातील त्रुटींचा विचार करते. परिणामतः मी स्वतःला बदलून निर्दोष बनवते. कठीण परिस्थिती निर्माण झाली असताना विचार करा, ' यात माझा सहभाग काय आहे ?' मग कर्माच्या ओझ्याच्या आपल्याला त्रास होणार नाही. हेच कर्मयोगाचं गुपित आहे. 
          स्वामी मला म्हणाले, " तू कशालाही स्पर्श करू शकत नाहीस, तुला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. तू अग्निफूल आहेस. " माझी कर्म मला स्पर्श करीत नाहीत अथवा मला त्यांचा त्रास होत नाही. मला त्यांचं ओझं वाटत नाही त्यामुळे मी माझी कामं विनासायास करू शकते. माझं मन शांत, समतोल असतं. मी जीवनात, नदीत तरंगणाऱ्या ओंडक्याप्रमाणे स्वच्छंद फिरते. मी कशालाही स्पर्श करत नाही, कारण माझ्यात 'मी' नाही, अहंकार नाही. मला काही स्पर्श करीत नाही आणि मी कशालाही स्पर्श करत नाही, त्यामुळे माझ्या मनावर कुठलेही संस्कार नाहीत. हा माझा स्वभाव जन्ममृत्युच्या चक्रात न अडकलेल्या स्वच्छंद पक्ष्यासारखा आहे. 
         जेव्हा आपण मनात कुठलाही विकार न येत कर्म करतो, तेव्हा तो योग होतो.   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २५ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" साधना, साधना, साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. " 
कर्मयोग उपाय 

        ह्या योगाच्या सरावासाठी अत्यावश्यक प्रमुख गुण म्हणजे दोषदृष्टी नसणे. इतरांमध्ये दोष हुडकण्यात आपण स्वतःचेच श्रम वाया घालवत असतो. ते दोष आपल्याम
ध्ये येतात. परंतु आपण इतरांच्या सद्गुणांची प्रशंसा करतो, तेव्हा आपण ते सद्गुण आत्मसात करतो. आपण चांगले पाहतो, तेव्हा त्यातील दैवी शक्ती आपल्याकडे येते. 
         याउलट, दुसऱ्याने निदर्शनास आणलेले आपले दोष आपण मान्य करत नाही, तेव्हा आपण जन्ममृत्युच्या चक्रात अडकतो. ए मान्य करत नाही, तेव्हा आपण जन्ममृत्युच्या चक्रात अडकतो. ते मान्य करून आपण स्वतःला बदलले नाही तर आपण मुक्त कसे होणार ? एखादा आपली चूक निदर्शनास आणतो, तेव्हा आपला अहंकार ती मान्य न तक्रार करून भांडतो. 
        मी वेगळी कशी आहे ? इतरांमध्ये दोष काढण्याऐवजी मी माझ्यातील त्रुटींचा विचार करते. परिणामतः मी स्वतःला बदलून निर्दोष बनवते. कठीण परिस्थिती निर्माण झाली असताना विचार करा, ' यात माझा सहभाग काय आहे ?' मग कर्माच्या ओझ्याच्या आपल्याला त्रास होणार नाही. हेच कर्मयोगाचं गुपित आहे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम

शुक्रवार, २३ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १८ जानेवारी 

       " भक्ताचं भगवंतावरील एकाग्र  प्रेम विस्तारत जात भक्तालाच भगवंत बनवतं. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे."
  
         जो केवळ भगवंतावर प्रेमाचा अखंड वर्षाव करतो ; त्याचं प्रेम विस्तारत जात तो स्वतःच भगवंत होतो . हा भक्त नंतर सिद्ध करतो की,"प्रेम ईश्वर आहे आणि ईश्वरच प्रेम आहे .' हे मी माझ्या जीवनातून दाखवून दिलं आहे .  मी ह्याबद्दल माझ्या आधीच्या अध्यायांमध्ये लिहिलं आहे . स्वामी म्हणाले आहेत,"प्रेम ईश्वर आहे,आणि ईश्वरच प्रेम आहे ." स्वामी आणि मी ह्या प्रेमाचं प्रात्यक्षिक करायला आलो आहोत . माझं संपूर्ण जीवन प्रेम, प्रेम आणि प्रेमच आहे . मी परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करत सिद्ध केलं की; प्रेम ईश्वर आहे . स्वामी जे काही सांगतात ते सर्व मी पुस्तकांत लिहिते . माझ्या पहिल्या पुस्तकात मी लिहिलं की स्वामींनी माझं अवघे अस्तित्व व्यापलंय . आताही मी तेच सांगते आणि स्वामी जे सांगतात तेच मी फक्त लिहिते . माझ्या ध्यानावस्थेत स्वामींशी माझी जी काही संभाषणं होतात ती सर्व पुस्तकाचं रूप घेतात . ते जो मुद्दा सांगतात त्याचा मी विस्तार करते . माझ्याद्वारे केवळ तेच लिहितात . पुन्हा मी म्हणते, माझ्या प्रेमाद्वारे मी प्रेम ईश्वर आहे हे सिद्ध करते . माझं प्रेम इतकं विस्तारत जातं की अख्ख विश्वच "सत्य साई" होतं . त्यांनी मला एका सत्यसाईवर प्रेम करण्यापासून परावृत्त केल्यामुळे माझं प्रेम सर्वांनाच सत्यसाई, 'भगवान' बनवतं . प्रत्येक जण आणि प्रत्येक गोष्ट परमेश्वर  बनते . जर सर्वच सत्य साई झाले तर कोण कोणाला थांबवणार ? हे साई चैतन्य जेव्हा सर्वांमध्ये आणि सर्व गोष्टींत जागृत होते तेव्हा साईयुगाची, सत्ययुगाची पहाट होते . माझी अखंड, एकाग्र साई जाणीव वृद्धिंगत होत अखिल विश्वात हीच जाणीव जागृत करते .  माया आणि ममता ह्यांमुळे सर्वजण वंशावळ निर्माण करतात . माझी नूतन सृष्टी मी भगवान श्रीसत्य साई बाबांपासून निर्माण करते . माझी तपश्चर्या पृथ्वीचं स्वर्गात रुपांतर करते . कलियुग सत्ययुगात परिवर्तीत करते . 
काल आम्ही संदेश शोधत असताना एडीला ३० मे २०११ ची एक कविता मिळाली . ही कविता स्वामींनी गाण्यासारखी लिहिली आहे .  
" हे नारी, तू स्वर्ग धरतीवर आणलास 
तू धरतीला सत्य मार्गावर आणून, तिला मुक्त करण्यासाठी जन्मलीस.  
तुझं प्रेमच रामबाण औषध आहे
तुझ्या खऱ्या खुऱ्या संगमामुळे 
तू प्रत्येकाच्या शरीरातील कैलास दाखवून देतेस . 
सत्य लोक मानवाच्या विवेक बुद्धीत आहे; हे तू दाखवतेस. 
तू ज्या पद्धतीनं निर्मिती करतेस त्याद्वारे तू हे दाखवितेस. "
         आता आपण पाहूयात. मी वैकुंठ धरतीवर आणते . मी हे किती विविध मार्ग चोखाळून केलं त्याबाबत मी लिहिलं आहे . आता आपण नवीन दृष्टिकोनातून पाहू यात . कलियुगात मानव धर्म-मार्ग विसरलाय . सर्वजण अधार्मिक जीवन जगतायत . द्वापार युगातील राजांचे दुर्गुण कलियुगातील सर्व मनुष्यांमध्ये उतरलेत . ह्या कारणास्तव भगवान श्रीसत्य साई बाबा धरतीवर अवतरले . तब्ब्ल ८४ वर्षे त्यांनी शिकवण दिली . आताच्या काळात प्रत्येकामध्ये पशुवृत्ती आहे . आपले दुर्गुण आपल्यामधून नष्ट करणे; हा प्रत्येक मनुष्याचा खरा  धर्म आहे . चांगले संस्कार मनावर बिंबविण्याकरिता आई विविध गोष्टी मुलांना सांगते . अगदी तसंच स्वामींनी हे सर्वांच्या मनावर बिंबविण्याकरिता अनेकविध  उपाय केले . ह्या जगन्मातेनं किती वैविध्यपूर्ण गोष्टी सांगितल्या बरं !  स्वामींनी त्यांचं अवतार कार्य करण्यासाठी त्यांच्या पासून मला वेगळं केलं आणि मी इथे आले . कलीरुपी  राक्षसापासून पृथ्वीला मुक्त करण्याकरिता मी एकाग्र,अखंड, तीव्र तप केलं. ह्या बद्दल मी आधीच्या अध्यायात लिहिलं आहे . त्यात मी म्हणते की, "स्वामी कूर्मावतार आहेत तर मी वराह अवतार ". मी त्यांच्या पाठीवर बसून कली राक्षसाशी युद्ध करते. महाभारतातील युद्धात कृष्ण सारथी होता . महामायेच्या जागतिक युद्धात भगवान माझा रथ होतात . मी त्यांच्यावर बसून 'प्रेम अस्त्रांचा' अखंड वर्षाव करते . माझी प्रेम अस्त्रं अव्याहत सर्वांमध्ये प्रवेश करतात . ह्यामुळे धरतीचा उद्धार होतो . रामायण काळात झालेल्या युद्धात एकदा राम हनुमंताच्या पाठीवर बसून रावणावर बाणांचा वर्षाव करतो . मी स्वामींच्या पाठीवर बसून माझ्या प्रेम बाणांचा वर्षाव करते .  
         कूर्मावताराच्या सहाय्यानं जेव्हा क्षीरसागराचं मंथन केलं गेलं; तेव्हा प्रथम हलाहल विष बाहेर आलंm. मी साई-कूर्मावतारावर बसून सर्वांच्या मनांचं मंथन करते . हे करत असताना जे विष बाहेर पडते ते स्वामी आणि मी प्राशन करतो . सर्वांची कर्मं आणि मनांतील खोल ठसे हे ते विष होय . आमच्या दोघांच्या यातनांचं कारणही हेच आहे .अंतिमतः माझं सहस्रार उघडतं आणि अमृत स्त्रवू लागतं . सर्व हे अमृत प्राशन करतील आणि अमृत युगाचा जन्म होईल . आधी फक्त शिवशंकर हलाहल प्यायले. आता हे विष शिव आणि शक्ती मिळून पितात . कैलास सर्वांच्या शरीरात विद्यमान आहे . कैलास म्हणजे काय ? कैलास सर्वांचं सहस्रार सूचित करतं . मुलाधारात सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होत आज्ञा चक्रातील शिवाला मिळण्यासाठी ऊर्ध्वगामी होते . हा खरा संयोग आहे . तथापि मनुष्य ह्या सत्याबाबत जागृत होत नाही .  त्याचा योग 'मी आणि माझं' च्या लौकीक जीवनाशी होतो. त्याचा हा संयोग त्याच्या दुःखाचं तसंच त्याच्या जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकण्याचं कारण असतं . कलियुग अज्ञानमय आहे . लोकांना ह्या सत्याची जाणीव नाहीये . म्हणून हा सर्वोत्तम अवतार भगवान श्रीसत्य साई बाबा अवतरला आणि त्यांनी ८४ वर्षं ह्या सत्याची शिकवण दिली . तथापि किती जणांना ह्या सत्याचं ज्ञान झालं ? मी आजीवन तप करून वैश्विक मुक्ती मागण्याइतकी शक्ती प्राप्त केली . स्वामींनी संमती दिली. आता स्वामी फिरून येतील तेव्हा सर्वजण जीवन मुक्त अवस्था प्राप्त करतील . मुलाधारातील शक्ती आज्ञा चक्रातील साई शिवात विलीन होईल . सर्वांचं शरीर कैलास आहे; हे यावरून सिद्ध होतं. 
लोकं बद्रीनाथ, केदारनाथ, कैलास अशा ठिकाणी तीर्थयात्रेला जातात . खरं तर याची काहीच गरज नाही,कारण खरा कैलास तुमच्या शरीरातच आहे . तुम्ही शक्ती आहात . साधना करत ह्या शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही शिवामध्ये विलीन होऊ शकता . आज्ञा चक्र म्हणजेच कैलास . स्वामी आल्यानंतर, माणसं आपल्याच शरीरातील कैलासात - शिवामध्ये विलीन होतात नंतर ती माणसं जीवन मुक्त अवस्थेत आनंदाने ह्या जगात वावरतात .    
         सत्यलोक सुद्धा मानवी शरीरातच आहे. सत्यलोक म्हणजे विवेक बुद्धी. प्रत्येकानं भगवंताचं मनन आणि चिंतन करीत साधना करायला हवी. अशा साधनेमुळं अज्ञानांध:कार दूर होऊन ज्ञानाचा उजेड पसरतो . बुद्धी, ज्ञानाच्या धगधगत्या तेजानं संपृक्त होते . हे लौकिक ज्ञान नव्हे तर ब्रह्मज्ञान होय . ह्या ज्ञानाच्या साहाय्यानं माणूस महान ज्ञानी होऊ शकतो . साधना आणि भक्तीमुळेच महान संत व ज्ञानी निर्माण झाले . त्यांचं प्रज्ञान जागृत झालं आणि त्यांनी म्हटलं, "प्रज्ञानं ब्रह्मा". साधकाचे प्रज्ञान जागृत झाले की; तो सर्वज्ञ होतो . तो 'ब्रह्म' चा जाणकार होतो . म्हणून हे महावाक्य सांगते,'प्रज्ञानं ब्रह्म'. सत्यलोक ब्रह्मदेव  आणि सरस्वती यांचं निवासस्थान आहे . ब्रह्मज्ञानामुळे साधकाची बुद्धी सत्यलोकच होते आणि तो कशाचीही निर्मिती करू शकतो; म्हणजे तो सृष्टीकर्ता होतो. सामान्य माणसाची बुद्धी आपल्याच विचारात गुंतलेली असते. हे आसक्तीमुळे होत असतं . ह्याचा परिणाम म्हणून ते पुढील जन्माची निर्मिती करतात . अशा रीतीनं प्रत्येक जण स्वतःचं नशीब स्वतःच लिहीत असतो . हे काही ब्रह्मा आणि सरस्वती यांचं काम नाहीये तर प्रत्येक जीवाचं स्वतःचंच कार्य आहे . केव्हा व कुठे जन्माला यायचं,आई वडील कोण असावेत हे सर्व प्रत्येक व्यक्तीच लिहीत असते . व्यक्तीच सर्व काही ठरवत असते .   
          'मी आणि माझं' ह्या भाव तरंगांद्वारे निर्माण होणाऱ्या अहंकार व आसक्तीमुळे हे सर्व घडत असतं . ह्यामुळे आठवणींचे खोल ठसे निर्माण होतात . हे ठसे माणसाचं प्रारब्ध लिहितात. सत्य लोक म्हणजे सर्वांमध्ये विद्यमान विवेक बुद्धी; हे मी माझ्या तपश्चर्येद्वारे दाखवून दिले . सर्वांमधील ही बुद्धी मी बदलते आणि तेथे सत्यलोक निर्माण करते . आता सरस्वती तुम्हाला सत्यज्ञान प्रदान करेल . साधारणपणे मानव केवळ लौकीक माहिती गोळा करीत असतो; त्यामुळे तो कायमचा जन्म - मृत्यूच्या चक्रात अडकलेला असतो . साक्षात्काराने  त्याला मायेच्या जगापासून सावध करावं, जेणेकरून तो महान ज्ञानी बनेल. माझ्या तपाद्वारे मी सर्वांमधील सत्यलोक उघडते . तसेच मी वैकुंठ धरतीवर आणते . मी अखिल विश्वासाठी वैकुंठाची द्वारे खुली करते . मी सर्वांच्या शरीरातील कैलासाची दारे आणि त्यांच्या बुद्धीमधील सत्यलोकाची दारे उघडते . प्रत्येकाकडे अशी प्रचंड ऊर्जा असते,तथापि कोणालाही ह्याची जाणीवच नाहीये . मग ते विश्व परिवर्तन कसं बरं करू शकतील. ह्या अध्यायाचा हा सुविचार मी माझ्या जीवनात पूर्णत्वाने आचरणात आणला . भगवान सत्यसाईंप्रती माझी प्रेमभक्ती विस्तारत विस्तारत हे जग वैकुंठात परिवर्तीत करते तसेच प्रत्येक मानवी रूप कैलास, सत्यलोकात बदलवते. तीर्थयात्रेला जायचं म्हणजे खूप शारीरिक कष्टांचा सामना करावा लागतो; भरपूर पैसेही खर्च होतात ; परंतु उपयोग काय ? केवळ दूरदूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुक्ती मिळवू शकाल का ? नाही, कधीच नाही . ते गंगेत केलेल्या स्नानासारखंच आहे. तुम्ही तुमची साधना करा आणि आतल्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्हाला खराखुरा कैलास आणि सत्यलोक ह्यांचं तुमच्या आतच दिव्य दर्शन होईल. तुम्ही मुक्ती प्राप्त कराल आणि मग तुमचं मन मानसरोवरासारखं निर्मळ, नितळ होईल .

जय साईराम 
 

गुरुवार, २२ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर, ते मन आणि ती गोष्ट एक होऊन जाते. परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते. "
कर्मयोग उपाय 

           आजही मला कुठल्याही गोष्टींचा भौतिक अर्थ तोडून सर्व परमेश्वराशी जोडण्याची सवय आहे. मी बाहेर गेले की नेहमी दुकानदारांच्या पाट्या, ट्रक आणि बसवरील सुविचार वाचून ते परमेश्वरशी जोडते. उदा. ' मून सुपर मार्केट ' चा बोर्ड पाहिला, तेव्हा माझ्या मनात लगेच विचार आला, ' कृष्ण हा चंद्र आहे; जर आपण कृष्णाकडे गेलो तर आपल्याला सर्व वस्तू मिळतील.' अशाप्रकारे मी भौतिक अर्थ तोडून सर्व गोष्टी परमेश्वराशी जोडण्याचो सवय लावून घेतली. माणसाने ' तोडणे आणि जोडणे' च्या सरावाची प्रयत्नपूर्वक सवय करून घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही जे काही बघता, ऐकता किंवा करता, ते आपोआपच परमेश्वराशी जोडता. 
         आता आपण याची दुसरी बाजू पाहूया. जेव्हा हीच स्वयंपाक करण्याची क्रिया तुम्ही नकारात्मक भावनेनी करता, तेव्हा त्यात फक्त तुमचे श्रम वाया जातात. एका घरात दोन स्त्रिया आहेत, प्रत्येकजण चिडून विचार करते, ' मी एकटीनीच का हे काम करायचं ? ती का नाही येत करायला ?' त्या त्यांची कामं एक ओझं म्हणून दूषित भावनेने करतात. त्यामुळे ती कर्म होतात. इतरांशी जुळवून घेता आलं नाही की तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि यातून कर्माच्या ओझ्यात भर पडते. कर्म करताना त्याचं ओझं न वाटता परमेश्वराशी एकतान होऊन केलं जातं, तेव्हा त्याचा कर्मयोग होतो.     

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम 

रविवार, १८ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो ."
कर्मयोग उपाय 

          माझ्या ' योगसूत्र ' या पुस्तकात मी आपल्या रोजच्या साध्या कृती आणि गोष्टी योगामध्ये परिवर्तन करण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत.सर्वांमध्ये फक्त परमेश्वरच वास करीत आहे हे सत्य एकदा जाणलंत की तुम्ही सगळ्या गोष्टी परमेश्वरशी जोडण्यांतील आनंद अनुभवाल. दरवाजा, एक सामान्य दरवाजाच मानलात तर त्यातून काहीच आनंद मिळणार नाही, पण तीच वस्तू परमेश्वराशी जोडण्यासाठी असून असा विचार कराल की ' हा मोक्षाचा दरवाजा आहे', तर मग तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना परमेश्वराशी जोडू शकता. मी लहानपणी आमच्या खोलीतील प्रत्येक वस्तू परमेश्वराशी जोडत असे. दिवाणखान्यातील खांब हा प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रकट होणाऱ्या नृसिंहावताराचा खांब होत असे. खोलीच्या मध्यभागी असणारा झोपाळा हा राधाकृष्णासाठी असे. अशाप्रकारे मी सर्वकाही परमेश्वरासाठी जोडण्याची स्वतःला सवय लावून घेतली. 
         तुम्ही अगदी रोजची घरगुती कामं दिव्यत्वाशी जोडलीत, तर तुम्हाला अवजड कामाचेसुद्धा ओझे वाटणार नाही. ' स्वयंपाक करणे' ह्या कर्माचा योग्य कसा होतो याविषयी मी ' साई गीता प्रवचनम् ' या पुस्तकात लिहिले आहे. स्टोव्ह पेटवताना मी विचार करत असे की ' हा स्टोव्ह यज्ञकुंड आहे आन स्वयंपाक नैवेद्य आहे' हे अन्न ग्रहण करणाऱ्या सर्वांमध्ये सात्विक गुण येवोत अशी मी प्रार्थना करीत असे. अशाप्रकारे, सर्व कर्मांचा योग होऊ शकतो.   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

गुरुवार, १५ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबिंबित होते. "
कर्मयोग उपाय
 
          आरशात पाहताना जर आपल्याला चेहऱ्यावर काळा डाग दिसला तर स्वतःशीच आरशाचे आभार मानून ,' धन्यवाद ! मी जर अशीच बाहेर गेले असते तर माझा चेहरा पाहून सर्वजण मला हसले असते. ' असे पुटपुटत तोंड धुतो. आपण ' शीs आरसा ! माझा चेहरा इतका सुंदर असताना तू हा काय डाग दाखवतो आहेस ?' असे ओरडून आरसा फोडत नाही. 
           त्याचप्रमाणे, जे आपले दुर्गुण दाखवतात, त्यांच्यावर आपण रागवता कामा नये, उलट त्यांचे आभार मानावेत. ' तुमचे मन शुद्ध करा, स्वतःमध्ये बदल घडवून आणा.' कुठल्याही घटना, माणसे किंवा गोष्टीत गुंतून भावनांच्या आहारी जाऊ नका. इच्छा हेच भावनांच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. आपलं मन कुठल्याही इच्छांमध्ये गुंतू न देण्याविषयी आपण जागरूक राहायला हवे.  

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ११ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते. "
कर्मयोग - उपाय 

          सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर श्वाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. 'मी कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग होतो. अशाप्रकारे, भावना हेच बंधन किंवा मुक्तीचे कारण असते. 
           कर्म हा मनाचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. एकांतात मन शांत असल्यासारखे वाटते. जेव्हा आपण इतरांबरोबर काम करतो, उदा. कुटुंबात, शाळेत, नोकरीच्या ठिकाणी अथवा आश्रमात, तेव्हा लपलेले भाव उफाळून वर येतात. समोरचा माणूस आपल्या मताशी सहमत झाला नाही तर क्रोध आणि नाराजी उद्भवते. अशावेळी एकांतात अनुभवलेली शांती कुठे जाते ?

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 


शुक्रवार, ९ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने

रत्न - ५


ओम श्री साई वसंत साईसाय नमः

       या मंत्राचा जन्म २३ मे १९९८ रोजी झाला. स्वामींनी स्वतः हा मंत्र लिहिला. हा शिवशक्ती मंत्र आहे, जो शक्तीचे परमेश्वराशी ऐक्य घडवून आणतो. मनुष्य सामना करत असलेल्या मन, देह, आणि आत्मा अशा तिहेरी व्याधीच्या निवारणासाठी हा मंत्र रामबाण उपाय आहे. 'प्रेम निवारण साई' या पुस्तकामध्ये या मंत्राने अनेक व्याधींचे कसे निवारण झाले  याविषयी मी लिहिले आहे. त्यामध्ये मी थोडीफार उदाहरणे दिली आहेत. आता हजारो लोकं या मंत्राने व्याधी मुक्त झाले आहेत. वाईट गुण आणि वाईट चारित्र्य  हे मनोविकार आहेत. हा मंत्र सर्व दुर्गुणांचा नाश करून मनाला योग्य दिशेला वळवतो. अखेरीस तो आत्म्याला जन्म मृत्यूचा चक्रातून मुक्त करून, मोक्ष प्रदान करतो. हा मंत्र वैश्विक कर्मांचा संहार करून वैश्विक मुक्तीही प्रदान करतो.

शिव आणि शक्तीचा योग म्हणजेच नवनिर्मिती. हा मंत्र निर्मितीचा पाया आहे.

माझ्या पालकांचा विवाह २३ मे १९३७ रोजी झाला. याच दिवशी या मंत्राचे बीजारोपण झाले.

२३ ऑक्टोबर 1938 या दिवशी  या मंत्राचा अर्ध भाग म्हणजे शक्ती चा जन्म माझ्या म्हणजे वसंतेच्या रुपाने झाला.

२३ नोव्हेंबर १९२६ रोजी स्वामी म्हणजे सत्य साईबाबा यांच्या रुपाने शिवाचा जन्म झाला.

मंत्राच्या रुपाने शिव आणि शक्तीचे मिलन होण्यास ६० वर्षाचा कालावधी लागला कारण ह्यासाठी  शक्तीला ६० वर्षे तप करावे लागले.

शक्तीचा तपाने प्रसन्न होऊन शिव तिच्यावर कृपा वर्षाव करण्यासाठी आला. त्याने त्याच्या नावा समवेत तिचे नाव जोडून मंत्र निर्मित केला.


🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸

जय साईराम 

गुरुवार, ८ जून, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते. "

कर्मयोग - उपाय 


          आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवसाप्रमाणे आहे. प्रवासी एकमेकांशी हसत, खेळत , बोलत एकत्र प्रवास करतात ; प्रत्येकाचे स्टेशन आले की उतरून जातात . ट्रेनच्या प्रवाशांप्रमाणेच कुटुंबात सर्वजण एकत्र येतात ; ते कर्मांनुसार एकमेकांना जोडलेले असतात. एकमेकांचे ऋण फेडले की वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी. म्हणजे मन त्यात घुटमळत राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तीला जर त्रास होत असेल तर आपण विचार करावा, ' मी माझी शांती का बरे बिघडवावी ? प्रत्येकजण आपल्या कर्मानुसार सुख किंवा, दुःख भोगत असतो. मी शांत राहून त्याच्यासाठी प्रार्थना करेन. '  


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ४ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 
सुविचार 
       " जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही. "
कर्मयोग - उपाय 

          सर्वसाधारण कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे कर्मयोग. कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे काय ?  याचा अर्थ असा की परिणामांचे ओझे न वाहता केलेले कर्म. कर्म करताना त्याविषयी मनात जे विचार येतात त्याचे ओझे होते. सुख- दुःख, चिंता, आवड-नावड या सर्व भावनांनी भरलेल्या विचारांचा मनावर ताण येतो. या भावना म्हणजेच बंधने. त्याचे संस्कार बनतात. ते 'मी' म्हणजेच अहंकाराची भावना निर्माण करतात. जर 'मी ' हा नसेल तर आपण चिंता आणि भीतीपासून मुक्त होऊ, आपली कर्म सहजतेने होत राहतील. अशी कर्म शुद्ध आणि निर्दोष असतात. हाच योग आहे. स्थिर मन म्हणजेच योग. 'मी कर्ता आहे' ही भावनाच आपली शांती बिघडवते. 
           आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. धावपळीच्या जीवनात आपण अगदी थोडी विश्रांती घेतो. या सर्व धकाधकीतून आपण काय मिळवतो ? बायको, मुले, अधिकारपद आणि थोडीशी मालमत्ता. यासाठी आपण किती धडपड करतो, कित्येक वेळा दैवाला दोष देतो आणि मनःशांती हरवून बसतो. जीवनात जराही शांती नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी माणूस सिनेमाला जातो, मित्रांना भेटतो, कादंबऱ्या, मासिकं वाचतो. हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. काही काळ कदाचित तो त्याची दुःख विसरेल, पण घरी परतल्यावर ती पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसतील. माणसानी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. सखोल चिंतन केल्यावर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनःशांती मिळेल. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
कर्मयोग - उपाय 

           कर्मकायदा म्हणजे काय आहे ? सर्वांनी आपल्या पूर्व आणि वर्तमान कर्मांची प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी यांचा अनुभव घ्यायलाच हवा. हा परमेश्वरचा कायदा आहे, तो पृथ्वीवरील जीवनाला लागू होतो. 
           भगवद्गीतेत, माणसाला त्याची कर्म समतोल करण्यासाठी आणि कर्माचा परिणामांपासून त्याला मुक्त करण्याचे अनेक मार्ग दाखवले आहेत. हे प्रकरण म्हणजे, 'ज्ञान गीता - गुप्त भांडार' या अप्रकाशित गीतेवरील पुस्तकाचा सांराश आहे. मला असे वाटते की कर्मयोग हा कर्मकायद्याचा अनुभवसिद्ध उपाय आहे, म्हणून मी हा सारांश इथे समाविष्ट केला आहे. 
          कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृती म्हणजे कर्म. उदा. बोलणे, लिहिणे, बसणे, आराम करणे ही सर्व कर्मच आहेत. क्षणभरही कोणी कर्माशिवाय राहू शकत नाही. प्रत्येकजण काही ना काही कामात गुंतलेला असतो. झोपेत होत असलेली श्वासाची क्रिया हेही कर्मच होय. योग्य म्हणजे परमेश्वराशी जोडणे. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम