ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. "
२
कर्मयोग उपाय
आज स्वामींनी भावना, ह्या रूप आणि कर्मांशी कशा संबंधित असतात याविषयी सांगितले.
२५ जून २००६ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, मला तुम्हाला पहायचं आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात, दुसरं काहीही नको.
स्वामी - तू
नेहमी रडतेस, 'मला तुम्हाला पहायचं आहे, मला तुम्हाला पहायचं आहे !' हे
फक्त रूप आहे. मी तुझ्याबरोबरच आहे. आपण सर्वांमध्ये शिव आणि शक्ती म्हणून
वास करीत आहोत. आपण सर्वत्र आणि सर्वांच्या ठायी सर्व होऊन आहोत. मुक्ति
निलयममध्ये मी तुझ्याबरोबर असतो. हे सत्य तुला आनंद देईल. रूप तुला समाधान
देऊ शकणार नाही. तू माझ्या दर्शनासाठी येतेस, तेव्हा तुझ्या मनात अनेक
निरनिराळे भाव उमलतात, ' स्वामी आज आले, पण मी त्यांना पाहू शकले नाही.
मल्ल चांगली जागा मिळाली होती, पण ते आलेच नाहीत.... ' तू भावना व्यक्त
करतेस, उद्विग्न होतेस, रडतेस आणि नाराज होतेस. हे रडणाऱ्या साड्यांच्या
गोष्टीसारखेच आहे. इथे सगळा आनंदीआनंद आहे. ताटातूट नाही. रूप नाही, फक्त
तत्व आहे. म्हणूनच इथे नेहमी आनंद आहे. मुक्ति निलयम हे 'तत्व ' आहे,
प्रशांती निलयम हे रूप आहे.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा