गुरुवार, २२ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर, ते मन आणि ती गोष्ट एक होऊन जाते. परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते. "
कर्मयोग उपाय 

           आजही मला कुठल्याही गोष्टींचा भौतिक अर्थ तोडून सर्व परमेश्वराशी जोडण्याची सवय आहे. मी बाहेर गेले की नेहमी दुकानदारांच्या पाट्या, ट्रक आणि बसवरील सुविचार वाचून ते परमेश्वरशी जोडते. उदा. ' मून सुपर मार्केट ' चा बोर्ड पाहिला, तेव्हा माझ्या मनात लगेच विचार आला, ' कृष्ण हा चंद्र आहे; जर आपण कृष्णाकडे गेलो तर आपल्याला सर्व वस्तू मिळतील.' अशाप्रकारे मी भौतिक अर्थ तोडून सर्व गोष्टी परमेश्वराशी जोडण्याचो सवय लावून घेतली. माणसाने ' तोडणे आणि जोडणे' च्या सरावाची प्रयत्नपूर्वक सवय करून घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही जे काही बघता, ऐकता किंवा करता, ते आपोआपच परमेश्वराशी जोडता. 
         आता आपण याची दुसरी बाजू पाहूया. जेव्हा हीच स्वयंपाक करण्याची क्रिया तुम्ही नकारात्मक भावनेनी करता, तेव्हा त्यात फक्त तुमचे श्रम वाया जातात. एका घरात दोन स्त्रिया आहेत, प्रत्येकजण चिडून विचार करते, ' मी एकटीनीच का हे काम करायचं ? ती का नाही येत करायला ?' त्या त्यांची कामं एक ओझं म्हणून दूषित भावनेने करतात. त्यामुळे ती कर्म होतात. इतरांशी जुळवून घेता आलं नाही की तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि यातून कर्माच्या ओझ्यात भर पडते. कर्म करताना त्याचं ओझं न वाटता परमेश्वराशी एकतान होऊन केलं जातं, तेव्हा त्याचा कर्मयोग होतो.     

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा