गुरुवार, २९ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
कर्मयोग उपाय 

         मी वेगळी कशी आहे ? इतरांमध्ये दोष काढण्याऐवजी मी माझ्यातील त्रुटींचा विचार करते. परिणामतः मी स्वतःला बदलून निर्दोष बनवते. कठीण परिस्थिती निर्माण झाली असताना विचार करा, ' यात माझा सहभाग काय आहे ?' मग कर्माच्या ओझ्याच्या आपल्याला त्रास होणार नाही. हेच कर्मयोगाचं गुपित आहे. 
          स्वामी मला म्हणाले, " तू कशालाही स्पर्श करू शकत नाहीस, तुला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. तू अग्निफूल आहेस. " माझी कर्म मला स्पर्श करीत नाहीत अथवा मला त्यांचा त्रास होत नाही. मला त्यांचं ओझं वाटत नाही त्यामुळे मी माझी कामं विनासायास करू शकते. माझं मन शांत, समतोल असतं. मी जीवनात, नदीत तरंगणाऱ्या ओंडक्याप्रमाणे स्वच्छंद फिरते. मी कशालाही स्पर्श करत नाही, कारण माझ्यात 'मी' नाही, अहंकार नाही. मला काही स्पर्श करीत नाही आणि मी कशालाही स्पर्श करत नाही, त्यामुळे माझ्या मनावर कुठलेही संस्कार नाहीत. हा माझा स्वभाव जन्ममृत्युच्या चक्रात न अडकलेल्या स्वच्छंद पक्ष्यासारखा आहे. 
         जेव्हा आपण मनात कुठलाही विकार न येत कर्म करतो, तेव्हा तो योग होतो.   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा