ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - १८ जानेवारी
" भक्ताचं भगवंतावरील एकाग्र प्रेम विस्तारत जात भक्तालाच भगवंत बनवतं. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे."
जो केवळ भगवंतावर प्रेमाचा अखंड वर्षाव करतो ; त्याचं प्रेम विस्तारत जात तो स्वतःच भगवंत होतो . हा भक्त नंतर सिद्ध करतो की,"प्रेम ईश्वर आहे आणि ईश्वरच प्रेम आहे .' हे मी माझ्या जीवनातून दाखवून दिलं आहे . मी ह्याबद्दल माझ्या आधीच्या अध्यायांमध्ये लिहिलं आहे . स्वामी म्हणाले आहेत,"प्रेम ईश्वर आहे,आणि ईश्वरच प्रेम आहे ." स्वामी आणि मी ह्या प्रेमाचं प्रात्यक्षिक करायला आलो आहोत . माझं संपूर्ण जीवन प्रेम, प्रेम आणि प्रेमच आहे . मी परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करत सिद्ध केलं की; प्रेम ईश्वर आहे . स्वामी जे काही सांगतात ते सर्व मी पुस्तकांत लिहिते . माझ्या पहिल्या पुस्तकात मी लिहिलं की स्वामींनी माझं अवघे अस्तित्व व्यापलंय . आताही मी तेच सांगते आणि स्वामी जे सांगतात तेच मी फक्त लिहिते . माझ्या ध्यानावस्थेत स्वामींशी माझी जी काही संभाषणं होतात ती सर्व पुस्तकाचं रूप घेतात . ते जो मुद्दा सांगतात त्याचा मी विस्तार करते . माझ्याद्वारे केवळ तेच लिहितात . पुन्हा मी म्हणते, माझ्या प्रेमाद्वारे मी प्रेम ईश्वर आहे हे सिद्ध करते . माझं प्रेम इतकं विस्तारत जातं की अख्ख विश्वच "सत्य साई" होतं . त्यांनी मला एका सत्यसाईवर प्रेम करण्यापासून परावृत्त केल्यामुळे माझं प्रेम सर्वांनाच सत्यसाई, 'भगवान' बनवतं . प्रत्येक जण आणि प्रत्येक गोष्ट परमेश्वर बनते . जर सर्वच सत्य साई झाले तर कोण कोणाला थांबवणार ? हे साई चैतन्य जेव्हा सर्वांमध्ये आणि सर्व गोष्टींत जागृत होते तेव्हा साईयुगाची, सत्ययुगाची पहाट होते . माझी अखंड, एकाग्र साई जाणीव वृद्धिंगत होत अखिल विश्वात हीच जाणीव जागृत करते . माया आणि ममता ह्यांमुळे सर्वजण वंशावळ निर्माण करतात . माझी नूतन सृष्टी मी भगवान श्रीसत्य साई बाबांपासून निर्माण करते . माझी तपश्चर्या पृथ्वीचं स्वर्गात रुपांतर करते . कलियुग सत्ययुगात परिवर्तीत करते .
काल आम्ही संदेश शोधत असताना एडीला ३० मे २०११ ची एक कविता मिळाली . ही कविता स्वामींनी गाण्यासारखी लिहिली आहे .
" हे नारी, तू स्वर्ग धरतीवर आणलास
तू धरतीला सत्य मार्गावर आणून, तिला मुक्त करण्यासाठी जन्मलीस.
तुझं प्रेमच रामबाण औषध आहे
तुझ्या खऱ्या खुऱ्या संगमामुळे
तू प्रत्येकाच्या शरीरातील कैलास दाखवून देतेस .
सत्य लोक मानवाच्या विवेक बुद्धीत आहे; हे तू दाखवतेस.
तू ज्या पद्धतीनं निर्मिती करतेस त्याद्वारे तू हे दाखवितेस. "
आता आपण पाहूयात. मी वैकुंठ धरतीवर आणते . मी हे किती विविध मार्ग चोखाळून केलं त्याबाबत मी लिहिलं आहे . आता आपण नवीन दृष्टिकोनातून पाहू यात . कलियुगात मानव धर्म-मार्ग विसरलाय . सर्वजण अधार्मिक जीवन जगतायत . द्वापार युगातील राजांचे दुर्गुण कलियुगातील सर्व मनुष्यांमध्ये उतरलेत . ह्या कारणास्तव भगवान श्रीसत्य साई बाबा धरतीवर अवतरले . तब्ब्ल ८४ वर्षे त्यांनी शिकवण दिली . आताच्या काळात प्रत्येकामध्ये पशुवृत्ती आहे . आपले दुर्गुण आपल्यामधून नष्ट करणे; हा प्रत्येक मनुष्याचा खरा धर्म आहे . चांगले संस्कार मनावर बिंबविण्याकरिता आई विविध गोष्टी मुलांना सांगते . अगदी तसंच स्वामींनी हे सर्वांच्या मनावर बिंबविण्याकरिता अनेकविध उपाय केले . ह्या जगन्मातेनं किती वैविध्यपूर्ण गोष्टी सांगितल्या बरं ! स्वामींनी त्यांचं अवतार कार्य करण्यासाठी त्यांच्या पासून मला वेगळं केलं आणि मी इथे आले . कलीरुपी राक्षसापासून पृथ्वीला मुक्त करण्याकरिता मी एकाग्र,अखंड, तीव्र तप केलं. ह्या बद्दल मी आधीच्या अध्यायात लिहिलं आहे . त्यात मी म्हणते की, "स्वामी कूर्मावतार आहेत तर मी वराह अवतार ". मी त्यांच्या पाठीवर बसून कली राक्षसाशी युद्ध करते. महाभारतातील युद्धात कृष्ण सारथी होता . महामायेच्या जागतिक युद्धात भगवान माझा रथ होतात . मी त्यांच्यावर बसून 'प्रेम अस्त्रांचा' अखंड वर्षाव करते . माझी प्रेम अस्त्रं अव्याहत सर्वांमध्ये प्रवेश करतात . ह्यामुळे धरतीचा उद्धार होतो . रामायण काळात झालेल्या युद्धात एकदा राम हनुमंताच्या पाठीवर बसून रावणावर बाणांचा वर्षाव करतो . मी स्वामींच्या पाठीवर बसून माझ्या प्रेम बाणांचा वर्षाव करते .
कूर्मावताराच्या सहाय्यानं जेव्हा क्षीरसागराचं मंथन केलं गेलं; तेव्हा प्रथम हलाहल विष बाहेर आलंm. मी साई-कूर्मावतारावर बसून सर्वांच्या मनांचं मंथन करते . हे करत असताना जे विष बाहेर पडते ते स्वामी आणि मी प्राशन करतो . सर्वांची कर्मं आणि मनांतील खोल ठसे हे ते विष होय . आमच्या दोघांच्या यातनांचं कारणही हेच आहे .अंतिमतः माझं सहस्रार उघडतं आणि अमृत स्त्रवू लागतं . सर्व हे अमृत प्राशन करतील आणि अमृत युगाचा जन्म होईल . आधी फक्त शिवशंकर हलाहल प्यायले. आता हे विष शिव आणि शक्ती मिळून पितात . कैलास सर्वांच्या शरीरात विद्यमान आहे . कैलास म्हणजे काय ? कैलास सर्वांचं सहस्रार सूचित करतं . मुलाधारात सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होत आज्ञा चक्रातील शिवाला मिळण्यासाठी ऊर्ध्वगामी होते . हा खरा संयोग आहे . तथापि मनुष्य ह्या सत्याबाबत जागृत होत नाही . त्याचा योग 'मी आणि माझं' च्या लौकीक जीवनाशी होतो. त्याचा हा संयोग त्याच्या दुःखाचं तसंच त्याच्या जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकण्याचं कारण असतं . कलियुग अज्ञानमय आहे . लोकांना ह्या सत्याची जाणीव नाहीये . म्हणून हा सर्वोत्तम अवतार भगवान श्रीसत्य साई बाबा अवतरला आणि त्यांनी ८४ वर्षं ह्या सत्याची शिकवण दिली . तथापि किती जणांना ह्या सत्याचं ज्ञान झालं ? मी आजीवन तप करून वैश्विक मुक्ती मागण्याइतकी शक्ती प्राप्त केली . स्वामींनी संमती दिली. आता स्वामी फिरून येतील तेव्हा सर्वजण जीवन मुक्त अवस्था प्राप्त करतील . मुलाधारातील शक्ती आज्ञा चक्रातील साई शिवात विलीन होईल . सर्वांचं शरीर कैलास आहे; हे यावरून सिद्ध होतं.
लोकं बद्रीनाथ, केदारनाथ, कैलास अशा ठिकाणी तीर्थयात्रेला जातात . खरं तर याची काहीच गरज नाही,कारण खरा कैलास तुमच्या शरीरातच आहे . तुम्ही शक्ती आहात . साधना करत ह्या शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही शिवामध्ये विलीन होऊ शकता . आज्ञा चक्र म्हणजेच कैलास . स्वामी आल्यानंतर, माणसं आपल्याच शरीरातील कैलासात - शिवामध्ये विलीन होतात नंतर ती माणसं जीवन मुक्त अवस्थेत आनंदाने ह्या जगात वावरतात .
सत्यलोक सुद्धा मानवी शरीरातच आहे. सत्यलोक म्हणजे विवेक बुद्धी. प्रत्येकानं भगवंताचं मनन आणि चिंतन करीत साधना करायला हवी. अशा साधनेमुळं अज्ञानांध:कार दूर होऊन ज्ञानाचा उजेड पसरतो . बुद्धी, ज्ञानाच्या धगधगत्या तेजानं संपृक्त होते . हे लौकिक ज्ञान नव्हे तर ब्रह्मज्ञान होय . ह्या ज्ञानाच्या साहाय्यानं माणूस महान ज्ञानी होऊ शकतो . साधना आणि भक्तीमुळेच महान संत व ज्ञानी निर्माण झाले . त्यांचं प्रज्ञान जागृत झालं आणि त्यांनी म्हटलं, "प्रज्ञानं ब्रह्मा". साधकाचे प्रज्ञान जागृत झाले की; तो सर्वज्ञ होतो . तो 'ब्रह्म' चा जाणकार होतो . म्हणून हे महावाक्य सांगते,'प्रज्ञानं ब्रह्म'. सत्यलोक ब्रह्मदेव आणि सरस्वती यांचं निवासस्थान आहे . ब्रह्मज्ञानामुळे साधकाची बुद्धी सत्यलोकच होते आणि तो कशाचीही निर्मिती करू शकतो; म्हणजे तो सृष्टीकर्ता होतो. सामान्य माणसाची बुद्धी आपल्याच विचारात गुंतलेली असते. हे आसक्तीमुळे होत असतं . ह्याचा परिणाम म्हणून ते पुढील जन्माची निर्मिती करतात . अशा रीतीनं प्रत्येक जण स्वतःचं नशीब स्वतःच लिहीत असतो . हे काही ब्रह्मा आणि सरस्वती यांचं काम नाहीये तर प्रत्येक जीवाचं स्वतःचंच कार्य आहे . केव्हा व कुठे जन्माला यायचं,आई वडील कोण असावेत हे सर्व प्रत्येक व्यक्तीच लिहीत असते . व्यक्तीच सर्व काही ठरवत असते .
'मी आणि माझं' ह्या भाव तरंगांद्वारे निर्माण होणाऱ्या अहंकार व आसक्तीमुळे हे सर्व घडत असतं . ह्यामुळे आठवणींचे खोल ठसे निर्माण होतात . हे ठसे माणसाचं प्रारब्ध लिहितात. सत्य लोक म्हणजे सर्वांमध्ये विद्यमान विवेक बुद्धी; हे मी माझ्या तपश्चर्येद्वारे दाखवून दिले . सर्वांमधील ही बुद्धी मी बदलते आणि तेथे सत्यलोक निर्माण करते . आता सरस्वती तुम्हाला सत्यज्ञान प्रदान करेल . साधारणपणे मानव केवळ लौकीक माहिती गोळा करीत असतो; त्यामुळे तो कायमचा जन्म - मृत्यूच्या चक्रात अडकलेला असतो . साक्षात्काराने त्याला मायेच्या जगापासून सावध करावं, जेणेकरून तो महान ज्ञानी बनेल. माझ्या तपाद्वारे मी सर्वांमधील सत्यलोक उघडते . तसेच मी वैकुंठ धरतीवर आणते . मी अखिल विश्वासाठी वैकुंठाची द्वारे खुली करते . मी सर्वांच्या शरीरातील कैलासाची दारे आणि त्यांच्या बुद्धीमधील सत्यलोकाची दारे उघडते . प्रत्येकाकडे अशी प्रचंड ऊर्जा असते,तथापि कोणालाही ह्याची जाणीवच नाहीये . मग ते विश्व परिवर्तन कसं बरं करू शकतील. ह्या अध्यायाचा हा सुविचार मी माझ्या जीवनात पूर्णत्वाने आचरणात आणला . भगवान सत्यसाईंप्रती माझी प्रेमभक्ती विस्तारत विस्तारत हे जग वैकुंठात परिवर्तीत करते तसेच प्रत्येक मानवी रूप कैलास, सत्यलोकात बदलवते. तीर्थयात्रेला जायचं म्हणजे खूप शारीरिक कष्टांचा सामना करावा लागतो; भरपूर पैसेही खर्च होतात ; परंतु उपयोग काय ? केवळ दूरदूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुक्ती मिळवू शकाल का ? नाही, कधीच नाही . ते गंगेत केलेल्या स्नानासारखंच आहे. तुम्ही तुमची साधना करा आणि आतल्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्हाला खराखुरा कैलास आणि सत्यलोक ह्यांचं तुमच्या आतच दिव्य दर्शन होईल. तुम्ही मुक्ती प्राप्त कराल आणि मग तुमचं मन मानसरोवरासारखं निर्मळ, नितळ होईल .
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा