बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - जानेवारी २० 

          " तुमचे  चांगले  अथवा वाईट सर्व भाव, विचार आणि कर्मं ह्यांची कर्मांच्या नोंदवहीत नोंद होत असते."


चांगली अथवा वाईट; तुमची सर्व कर्मे कर्मांच्या नोंदवहीत नोंद केली जातात. कर्मांच्या नोंदी म्हणजे अनेक जन्मांच्या साठवलेल्या आठवणी आणि संस्कार. हे कर्मांचे ठसे म्हणजे तरी काय? आपण केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या नोंदी म्हणजेच हे ठसे. प्रत्येक विचार, शब्द आणि कृती ह्यांची नोंद होत असते. सर्वोत्तम अवतार भगवान सत्य साईंनी हे सांगितलं आहे.
मानवी मनात सर्वप्रथम भाव तरंग उद्भवतात. ह्या पातळीवरच आपण हा भाव तरंग चांगला आहे की वाईट ह्यावर सारासार विचार करावयास हवा. ह्या पद्धतीचा वापर करून आपण वाईट भाव तरंगांचा त्याग करावा. आपण जर हे केलं नाही तर हे भाव विचारात बदलतात आणि विचार कृतीत उतरतात. वाईट विचारांमुळे वागणुक वाईट होते आणि मन दुर्गुणांचं घर होतं. हे आठवणींचे ठसे आपल्याला कायम जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये  अडकवून ठेवतात. मनुष्याला त्याच्या जन्माचा उद्देश काय ह्याची जाणीवच नसते. आपल्याला केवळ भगवत प्राप्तीकरता हा मनुष्य जन्म दिला गेला आहे. तथापि त्याला वाटतं की हा जन्म वंशावळ निर्माण करण्यासाठी आहे. ह्यामुळे माणूस बंधनात  जखडला जातो. म्हणून प्रत्येकाने ही बंधनं आणि आसक्ती ह्यापासून मुक्त होण्याचा आटोकाट प्रयत्न करावयास हवा. श्रीकृष्णानं भगवत गीतेमध्ये उद्घोषित केलं आहे की,'केवळ कर्मच माणसाला बंधनातून मुक्त करू शकते.' आपल्या हातात सर्व आहे. आपण दिवसभरात करत असलेल्या प्रत्येक कर्माचा योग साधावा, म्हणजे ते सर्व भगवंताशी जोडावे.
भगवत गीता हा सर्व शास्त्र ग्रंथांचा राजा आहे. ह्या राजाची इच्छा आहे की,"त्याची अवघी प्रजा सकाळपासून रात्रीपर्यंत जी काही कार्ये करते ती तिने भक्तिभावानं करावी, पूजा समजून करावी." तुमची अर्धा तास किंवा दहा मिनिटं राखुन ठेवुन केलेली पूजा त्याला नकोय! गीतेचा १५वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. इथे सर्व शिकवण पूर्णत्वाला जाते. म्हणून ह्या अध्यायाला पूर्ण योग अथवा पुरुषोत्तम योग म्हणतात.
तीच भगवत गीता भगवान श्री सत्यसाई यांनी अजून सोपी करून शिकवली. त्यांनी वेद, उपनिषदे,आणि शास्त्रग्रंथ यांमधील सत्य सर्व साधारण मनुष्याला समजेल अशा पद्धतीनं सोपं करून सांगितलं. श्री सत्यसाई हा महोत्तम अवतार कली युगात अवतरला,त्यानं त्याचं प्रेम आणि कारुण्य यांचा वर्षाव मानवतेवर केला. यामुळं त्यानं सर्वांची कर्मं स्वतःवर घेतली आणि शरीराचा त्याग केला. सर्वाना भगवंताची रूची समजावी यासाठी त्यांना जीवनमुक्त करावे, ही त्याची इच्छा आहे. आपण सर्व किती भाग्यवान आहोत! पूर्वीच्या कुठच्याही युगात हे कधी घडलेलं नाहीये.
मी एकदा एक नाटक लिहिलं, त्याचं नाव होतं, 'मेन गेट', आणि ते कर्म कायद्यावर आधारित होतं. असं म्हणतात की चित्रगुप्त आपल्या सर्वांच्या सर्व कर्मांचा हिशोब ठेवतो. आम्ही प्रथम मुक्ती निलायममध्ये आलो त्या दिवशी येथील मैदानावर बऱ्याच म्हशी हिंडत होत्या. यमदेवाचं वाहन म्हैस आहे.  कर्मांचे हिशोब जाळून टाकण्यासाठी स्वामींनी मुक्ती निलायमची स्थापना केली. ही स्वामींची कर्मभूमी आहे. येथील स्तूप सर्व कर्मे जाळून सर्वांना मुक्त करतो. तुम्ही सकाळ पासून रात्रीपर्यंत जे काही करता ते परमेश्वराचा विचार करत करा. तर आणि तरच मरतेवेळी तुमच्या मुखात आणि मनात परमेश्वराचं नाम येईल. आपलं पुढच्या जन्मातील जीवन आपला प्रत्येक विचार, शब्द आणि आचार ठरवत असतात. अतृप्त इच्छा हे आपल्या पुढील जन्मांचं कारण आहे. म्हणून आपण आपल्या इच्छा कमी करायलाच हव्यात. तुम्ही तुमचं सामान कमी करत तुमचा भगवत प्राप्तीचा मार्ग सुकर करा.  

२९ जून २०१६ : सायंध्यान
(मी सारखी अश्रू ढाळत आहे. आम्ही स्वर्गात जातो. तिथे मी म्हणते...)
वसंता : ऋषी, देवगण,साधू, संत; अहो माझा न्याय कुठे आहे? अहो देव देवता मला न्याय हवाय. स्वामी मला इथे सोडून अर्ध्यावर का निघून गेले? तुम्ही नाडीग्रंथांमध्ये लिहिलेलं सर्व खोटं आहे का? सांगा मला.
(मला अश्रू आवरत नाहीत...)   
स्वामी : तू अशी का रडतेयस? ये, बैस इथं. मी काय सांगतो ते ऐक. अगं तू स्वतः न्यायदेवता आहेस. तू हातात तराजू घेऊन जन्मलीस. आता मी तुला कारण सांगतो. शनी दशा साडेसात वर्षांची असते. मी सव्वादोन वर्षं शनी दशा भोगली आणि देह सोडला. आता पाच वर्षं आणि तीन महिने झाले. म्हणजे साडेसात वर्षं जवळ जवळ संपत आली. मी लवकरच येईन.
 वसंता : देवाला कशी हो शनी दशा?
स्वामी: कारण की मी कर्मं माझ्यावर घेऊन सामान्य मनुष्यासारखाच त्रास सहन केला. मी तुला हे सुचवू इच्छितो.
वसंता : इतर अवतारांच्या जीवनावर त्यांच्या जन्मपत्रिकेचा प्रभाव पडला होता का?
स्वामी : रामाला बारा कला होत्या. तो अनभिज्ञ होता. कालदेवानं येऊन त्याला सांगितलं की त्याचं अवतार कार्य पूर्ण होऊन प्रस्थानाची वेळ झाली. नंतर रामानं त्याच्या मुलांचा राज्याभिषेक केला आणि त्यानं शरयू नदीत प्रवेश केला.
वसंता : कृष्णाचं काय?
स्वामी : ऋषीच्या शापामुळं द्वारका समुद्रात बुडाली. शिकाऱ्याच्या बाणाचे निमित्त होऊन कृष्णानं देह सोडला. सर्वांनी कर्म कायद्याचं पालन केलं. काळजी करू नकोस. मी येईन.
ध्यान समाप्त.   
आता आपण पाहुयात. काल संध्याकाळी ध्यानात असताना मी ऋषी,देवगण,साधू, संत सर्वाना आळवून अश्रू ढाळत होते. मी सर्वाना विचारत होते की माझा न्याय कुठे आहे. स्वामी मला एकटीला सोडून का गेले? विरह व्यथा असह्य होऊन मी अश्रू ढाळत होते. माझे आणि स्वामींचे नाडी ग्रंथ सिद्ध, ऋषी,आणि मुनींनी लिहिले आहेत. मी ब्रह्मा, शिव,विष्णू तसेच सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी ह्या सर्व देव देवतांची कळवळून प्रार्थना केली. स्वामी आले, त्यांनी माझं सांत्वन केलं. माझी जन्मरास ‘तुला’ आहे. ‘तुला’ म्हणजे तराजू. म्हणून स्वामी म्हणाले, "तू न्याय देवता आहेस." मी केवळ चांगल्या लोकांसाठीच  न्याय मागितला नाही तर वाईट लोकांकरता सुद्धा मागितला. सर्व म्हणतात की, कैकेयी आणि मंथरा वाईट आहेत. परंतु मी भगवंताबरोबर वाद घातला,"त्या वाईट का आहेत? त्यांच्याशिवाय रामानं राक्षसांचा नाश केला असता का? त्याचं नाव होऊन त्याला प्रसिद्धी मिळाली असती का?" लहानपणापासून माझ्या मनात असे उदार विचार असत.  
स्वामींनी एकदा एक कविता सांगितली.  ते म्हणाले की मी अवताराला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं  करणारी न्याय देवता आहे. सर्वाना न्याय मिळावा म्हणून मी वाद घालते. हे खरं असेलही पण मला न्याय मिळाला नाही. परमेश्वरानं मला अर्ध्यावर का सोडून दिलं? असा विचार करत मी अश्रू ढाळते. आता स्वामींनी नवीन कारण सांगितलं. ते म्हणाले त्यांच्या आयुष्याची अखेरची काही वर्षं त्यांच्या जीवनावर शनीचा प्रभाव होता. साडेसातीची दोन वर्षं आणि तीन महिने त्यांनी भोग भोगला व देह सोडला. ह्याला आता पाच वर्षं आणि तीन महिने झाले. असं म्हणतात की साडेसातीचा भोग साडे सात वर्षांचा असतो.
स्वामींनी आणि मी दोन हजार नऊला एकमेकांना मुद्देनहळ्ळीला स्थूल देहात पाहिलं. त्यावेळी आम्ही दोघांनीही विरह वेदनेत अश्रू ढाळत एकमेकांचा निरोप घेतला. त्यानंतर मी स्वामींना पाहिलं नाही. ईसवी सन २०१० मध्ये आम्ही विश्व ब्रह्म गर्भ कोट्टमचं बांधकाम पूर्ण केलं. तेव्हा आम्ही ह्या इमारतीच्या उद्घाटनाच्या आमंत्रण पत्रिका तयार केल्या होत्या. त्यावेळेस स्वामी दिल्लीला गेले होते. तेथीलआमच्या एका भक्तानं आमंत्रण पत्रिका व इमारतीचा आराखडा स्वामींना दिला. स्वामींनी सर्व स्वतःच्या हातात घेऊन पाहिलं आणि आशीर्वदित केलं. ह्या घटनेचे फोटो काढले गेले.       
सन २०११ मध्ये स्वामी खूप आजारी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांनी २३ एप्रिलला देह सोडला. मला कल्पनातीत धक्का बसला, मी धाय मोकलून रडत होते. तद् नंतर स्वामींनी मला त्यांचे आणि माझे नाडी ग्रंथ पहावयास सांगितले. त्या नाडी ग्रंथात सर्व ऋषी आणि सिद्धांनी घोषित केलं आहे की माझ्या आक्रोश आणि आकांतामुळे स्वामी परत येतील. त्यानंतर पाच वर्षं आणि तीन महिने अनेक संदेश देऊन स्वामींनी माझं सांत्वन केलं. परमेश्वरावर शनीचा प्रभाव कसा पडू शकतो? ह्यावर स्वामींनी वैश्विक कर्मं स्वतःवर घेत सामान्य जनांप्रमाणे यातना भोगल्या, म्हणून हे झालं असं स्पष्टीकरण दिलं. मी स्वामींना इतर अवतारांच्या जीवनाबद्दल विचारलं. "ते त्यांचं जीवन पत्रिकेनुसार जगले का?", असं विचारलं. रामाला बारा कला होत्या. बाकी चार कला लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, आणि हनुमान  ह्यांच्यामध्ये विभागल्या गेल्या होत्या. त्यांना प्रत्येकी एक कला होती.
राम साक्षी भावात होता. त्याला स्वतःचं सत्य माहीत नव्हतं. काल-देवानं येऊन त्याला सांगितलं,"आता तुझं कार्य समाप्त झालंय, तू तुझ्या निजधामाला जाण्याची वेळ झालीय." त्याचं अवतार कार्य संपलं ह्याबाबत तो अजाण होताआणि जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा त्यानं लगोलग त्याच्या पुत्रांचा राज्याभिषेक केला, स्वतः शरयू नदीत उतरून ह्या जगाचा निरोप घेतला.
द्वापार युगात यादव कुळाच्या काही  तरुणांनी काही ऋषींची मस्करी केली. सांबन ह्या कृष्णाच्या मुलाला त्यांनी गर्भवती स्त्रीचा वेष घालून, ते त्याला ऋषींकडे घेऊन गेले आणि त्यांनी ऋषींना विचारलं की ह्या मुलीला काय जन्माला येईल? मुलगा की मुलगी? ऋषींनी क्रोधाविष्ट होऊन उत्तर दिले,"लोखंडी मुसळ जन्मेल आणि तुमच्या कुळाचा नाश होईल." तत्क्षणी एक मुसळ साक्षात झाले. घाबरलेल्या युवकांनी त्या मुसळाचे तुकडे करून मग त्याची पूड केली. ती पूड त्यांनी समुद्रात फेकून दिली. तरीसुद्धा एक तुकडा उरला ज्याचा नाश ते करू शकले नाहीत. तो तुकडा सुद्धा त्यांनी समुद्रात फेकला. ही पूड समुद्र किनाऱ्यावरील गवतात शिरली.  योग्य वेळ आल्यावर एक दिवस सर्वजण समुद्र किनाऱ्यावर गेले आणि मदिरापान करून गोंधळ घालू लागले. अचानक त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. किनाऱ्यावरचे गवत उखडून ते एकमेकांवर भिरकावू लागले. त्या गवतात मुसळाची पूड होती, त्यामुळे सर्वजण यमसदनी गेले. वाली नावाच्या शिकाऱ्याला मुसळीचा छोटा तुकडा मिळाला. त्यापासून त्यानं बाणाचे अणुकुचीदार टोक तयार केले. तो जंगलात शिकारीला गेला. तेव्हा कृष्ण जंगलात एका झाडाखाली विश्रांती घेत होता. त्याच्या पायाचा अंगठा हळुवार मागे पुढे डोलत होता. थोड्या अंतरावरून पहाणाऱ्या वालीला तो हलणारा अंगठा पक्षी वाटला. त्याने बाण सोडला, त्या बाणाने कृष्णाच्या अंगठ्याचा वेध घेतला. परमेश्वरानं देह सोडला. त्यासुमारास द्वारका समुद्रात बुडाली आणि कृष्णाचा अवघा वंश नष्ट झाला. भगवंताला वंशावळ नाही. त्याच्या वंशात एक जरी वाईट माणूस जन्मला तरी कृष्णाचं नाव बदनाम होईल. म्हणून कृष्णाचाच हा मास्टर प्लॅन होता. म्हणून मी स्वामींना सांगितलं की आम्ही जेव्हा हे जग सोडू तेव्हा आमच्या मुलांनीही यावं आणि आमच्या बरोबर हे जग सोडावं.

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा