बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - ७


        माझ्या डायरीमध्ये मी पाहिलेलं स्वामींचं एक वचन आपण पाहूया.
        स्वामी म्हणतात, "परमेश्वर हा प्रत्येक जीवाचा प्राण (श्वास)आहे." हा प्राण वा जीवप्रवाह मनुष्याच्या वाढीस कारणीभूत आहे. श्वासाविना जीवन अशक्य आहे. श्वासाविना देह निष्प्राण असतो. परमेश्वर हा सर्वांचा अंतर्यामी आहे.
         हा प्राण शिशुला बालक, बालकाला युवक बनवतो. या प्राणशक्तीमुळे प्रत्येक मनुष्याची वाढ होते. या प्राणशक्तीलाही अंतर्यामी म्हणतात.
         जेव्हा साधक साधना करतो, तेव्हा त्याचा अंतरात्मा  विकसित होतो आणि विस्तार पावतो. प्रथमतः तो अंतरात्मा नीलरंगाच्या ज्योतीस्वरूपात, तांदुळाच्या दाण्याच्या टोकाच्या आकारामध्ये अस्तित्वात असतो. जेव्हा एखाद्याला तो देह नाही याची जाणीव होते आणि तो त्याच्यातील दुर्गुण नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा अंतरात्मा विकसित होऊ लागतो. भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात, अंतरात्म्याच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून ते संपूर्ण देहाला व्यापून टाकणाऱ्या अंतरात्म्याच्या अखेरच्या अवस्थेपर्यंत पाच अवस्था वर्णन केल्या आहेत. अंतरात्म्याची पहिली अवस्था  'उपद्रष्टा' म्हणजे जीव करत असलेल्या सर्व कर्मांचा साक्षी. जीव साधना आणि प्रयत्न करू लागल्यावर अंतरात्मा 'अनुमंता' ( प्रोत्साहन देणारा ) या अवस्थेत येतो. त्यानंतर जीव त्याची साधना आणि प्रयत्न सुरू ठेवतो आणि अंतरात्मा 'भर्ता', 'भोक्ता' आणि अखेरीस 'महेश्वर' ह्या अवस्थांमध्ये येतो. अखेरच्या,'महेश्वर' अवस्थेमध्ये, तो जीवाला पूर्णतः व्यापून टाकतो आणि जीव शिव बनतो.
                           

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा