ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निर्मल हृदय स्वच्छ आरशासारखे प्रतिबिंबित होते. "
३
तप
तपश्चर्या आणि पातिव्रत्य
तपश्चर्या आणि पातिव्रत्य हे जणू माझे दोन नेत्रच आहेत. तप म्हणजे काय ? मी कोणते तप केले ? माझे पातिव्रत्य हेच माझे तप. पातिव्रत्य म्हणजे काय ? माझे तप हेच माझे पातिव्रत्य. हे दोन्ही अलग करता येत नाही. ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; वेगळ्या नाहीत. हे नाणं म्हणजेच 'त्याग '. मी माझ्या प्रत्येक आचार, विचार व उच्चाराबाबत अत्यंत दक्ष असते. परमेश्वराविषयी नसलेला अगदी एक शब्दसुद्धा माझ्या पातिव्रत्याविरुद्ध आहे. भरभरून येणाऱ्या ज्ञानाचं हेच कारण आहे. ज्ञान, पातिव्रत्य आणि तपश्चर्या हे वेगळं नाही. माझी तपश्चर्या आणि माझं पातिव्रत्य आणि तपश्चर्या हे वेगळं नाही. माझी तपश्चर्या आणि माझं पातिव्रत्य यामुळेच युग बदलणार आहे. जन्मापासून केलेल्या प्रतिज्ञा आणि व्रतं ही तपश्चर्या झाली. स्वामींशिवाय दुसरा कसलाही विचार न करण्याचा माझा स्वभाव हे पातिव्रत्य झालं.
मी अगदी क्षणभरही परमेश्वराचा विसर पडू देत नाही. ही झाली तपश्चर्या.
मी दुसरा कसलाही विचार न करता फक्त परमेश्वराचाच विचार करते. हे आहे पातिव्रत्य.
अशा अनेक पतिव्रता आहेत ज्या त्यांच्या पतीला परमेश्वर मानतात. त्या त्यांच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानी महान झाल्या. मी परमेश्वराला पती मानते हेच माझे पातिव्रत्य. ते जगाची कर्म जाळून विश्वामुक्ती प्रदान करते.
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा