रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते. " 


तप 

            मी इतकं तप का बरे केलं ? स्वामी म्हणतात, माझ्या जन्माआधी मी लक्ष्मीगुहेत तप केले. मी परमेश्वराची शक्ती असूनही इतकी तपश्चर्या का केली? परमेश्वर अवतार घेण्याअगोदर किंवा अवतार घेतल्यावरसुद्धा कधीही तपश्चर्या करीत नाही. मग मीच का ? कारण मला 'मी' नाही. मी कोण आहे हे मला माहीत नाही, म्हणून परमेश्वरप्राप्तीसाठी मी तप केले. परमेश्वर अवतार म्हणून आला तर तो एका मर्यादेत कार्य करतो. तो त्याची संपूर्ण शक्ती प्रकट करू शकत नाही. तो साक्षी अवस्थेत असतो. तो त्याचा कर्मकायदा तोडू शकत नाही. परंतु जेव्हा परमेश्वराची चित्शक्ती मानवी रूपात जन्म घेते, तेव्हा तिला अशा मर्यादा नसतात. सगळे नियम, कायदे मोडून ती परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करू शकते. प्रेमाला कुठल्याही मर्यादा नसतात ते त्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांचा नाश करते. मानवी देहातील अपरिमित शक्ती दाखवण्यासाठी मी इथे आले आहे. यासाठी मला इतकी तपश्चर्या करायलाच हवी. माझ्या तपश्चर्येद्वारे कर्मकायदा कसा मोडला हे या पुस्तकातून दिसून येईल.
            परमेश्वर अवतार घेतो, तेव्हा तो त्याची संपूर्ण शक्ती प्रकट करू शकत नाही. त्याची दैवी शक्ती आकर्षून जगदोध्दारासाठी वापरली जावी म्हणून मी आले आहे. भगवंत अवतरीत झाल्यावर त्याला कर्मकायद्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे मी तपश्चर्या करून भगवंताला या पेचातून मुक्त करत आहे.   

  

संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा