ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम तुमच्याकडे येईल."
५
उतारा ( रामबाण औषध )
प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यांचे विश्वरूप दाखवले. ते काळाचं विश्वरूप होतं, सर्वांचा संहार करणारे रौद्ररूप होते. अर्जुनाने प्रभूच्या जबड्यात सर्व जीव चिरडले जाताना पाहिले. सर्वांचा भयावह मृत्यु पाहून त्याचा भीतीने थरकाप झाला. मी माझे विश्वरूप पाहिले. ते नवनिर्मितीचं आंनंददायी नृत्य होत. हे रूप प्रलयाविना सर्वांचं परिवर्तन करते. हे रूप पाहताना जराही भीती वाटत नाही, किंबहुना ते सर्वत्र आनंद देते. त्याची व्याप्ती काळ अथवा स्थानापुरती मर्यादित नाही. ही अमरत्वाची स्थिती आहे.
२८ जून २००७, दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी, प्लिज मला कृष्णाच्या विश्वरूपाविषयी आणि शक्तीच्या विश्वरूपाविषयी थोडं अजून सांगा नं !
स्वामी - कृष्णाने परमेश्वराचे कालरूप प्रकट केले. ते संहार दाखवते. शक्ती परिवर्तनाचे कार्य करते. अर्जुन बंधमुक्त व्हावा म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीता शिकवली. तू तुझ्या आनंददायी रूपात सर्वांचे परिवर्तन करते आहेस. कृष्णाचे कालरूप हे कर्मकायद्यानुसार होते. त्याने सर्व सजीवांना गिळंकृत केले. तुझे रूप हे आनंदमयी आहे. त्याचा कर्माच्या हिशोबाशी काही संबंध नाही. हे स्वयंभू रूप आहे; तू तुझी निर्मिती सगळीकडे पाहत आहेस.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा