गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


उतारा ( रामबाण औषध )


           कित्येक देवतांनी माझ्या दिव्य दृश्यात येऊन मला त्यांची शक्ती दिली आहे, हे मी मागेच लिहिले आहे. मला धन्वंतरी, गायत्री, सरस्वती, हनुमान, हयग्रीव, दत्तात्रय इत्यादींकडून शक्ती मिळाली. काही वर्षांनंतर स्वामींनी मला सांगितले, " तुझ्या तपस्येमुळे सर्व शक्ती निर्माण झाल्या. त्या काही कोणी देवतांनी तुला दिल्या नाहीत. तुझ्यातील अंतर्भूत शक्तींनीच वेगवेगळी रूपं घेऊन 'त्यांच्या ' शक्ती तुला दिल्या. तुला 'मी' नसल्यामुळे तू म्हणालीस की देवतांनी त्यांच्या शक्ती तुला दिल्या. "

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा