ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - १०
प्रोफेसर रुहेलांनी वसंतसाईंची घेतलेली मुलाखत
एस पी आर : अम्मा, तुमच्या गतजन्मातील राधेच्या वा त्यापूर्वीच्या कोणत्याही जन्मातील काही स्मृती तुमच्याकडे आहेत का?
अम्मा : मी पूर्व जन्मात राधा असल्याचे स्वामींनी मला ध्यानामध्ये सांगितले. ध्यानामध्ये स्वामी मला गोकुळात घेऊन गेले. त्यांनी मला यमुना नदी, कालिया घाट, जंगल आणि नंदगावातील कृष्णाचे घर दाखवले. जेथे त्यांच्या पालकमातेने यशोदेने त्यांना उखळाला बांधून ठेवले होते ती जागाही दाखवली आणि एका विशिष्ट घराकडे जाणारा रस्ता दाखवला. स्वामी मला म्हणाले की हे राधेचे घर आहे.
मला स्वतःला, माझ्या कोणत्याही पूर्व जन्मातील स्मृति नाहीत.
एस पी आर : अम्मा, तुम्ही ध्यानामध्ये पाहिलेल्या राधेच्या घराचे कृपया वर्णन करू शकता का?
ते अगदी छोटसं आणि साधं घर होतं. त्या घरामध्ये तीन-चार खोल्या होत्या. बाहेरच्या बाजूस दोन छोटे खांब होते. बाहेरील बाजूस फरश्यांचा मंडप होत. मी आत मधील सर्व खोल्यांमध्ये गेले आणि मी स्वामींना दाखवले की पूर्वजन्मात, राधा असताना कृष्णाच्या काळामध्ये, कृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी त्या खिडकी जवळ उभी राहत असे. कृष्ण त्या रस्त्यावरून येत आहे वा नाही हे पाहण्यासाठी मी त्या दारासमोर उभी राहत असे. मी एका खोलीत गेले आणि स्वामींना सांगितले की या खोलीमध्ये मी दररोज तासन तास कृष्णासाठी अश्रू ढाळत असे.
तेथे एक पलंग होता परंतु मी जमिनीवरती कोसळले. मी स्वामींना सांगितले, " मी कृष्णासाठी तासंतास अश्रू ढाळत होते आणि माझी शुद्ध हरपली. हा माझा गोकुळातील पहिला अनुभव होता. माझ्या ध्यानामधील हे दृश्य पाहून मी भयभीत झाले. मी त्वरित देवघरातून बाहेर आले. हे दृश्य आठवून मी अश्रू ढाळत होते. त्यावेळी माझे सांत्वन करण्यासाठी घरामध्ये कोणीही नव्हते. ते भाव माझे मी सहन केले. २५ नोव्हेंबर १९९७ रोजी दुपारी ४ वाजता मी हे दृश्य पाहिले. नंतर स्वामींनी मला ध्यानामध्ये सांगितले की राधा विवाहित होती आणि तिला मुलबाळं नव्हते.
हा उतारा प्रोफेसर एस.पी. रुहेला- यांच्या "राधेचा पुनर्वतार वसंत साई " या पुस्तकातून घेतला आहे.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा