ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे. "
६
अमृतकलश फोडला
त्वचारोगतज्ञ म्हणाले की दातांमुळे मला त्वचेची अॅलर्जी झाली आहे. मी ताबडतोब डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घ्यावे. मी, जावे का न जावे या संभ्रमात होते. मी स्वामींना प्रार्थना करून म्हटले की मी नाही जाणार.
संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, मी डेंटिस्टकडे जायला हवे का ?
स्वामी - नको
वसंता - स्वामी, माझा देह पूर्णम्व्हायला हवा.
स्वामी - तसेच होईल. डॉक्टरकडे जायची अजिबात गरज नाही. तू स्वतःच सगळं करशील.
१६ जुलै २००७ ध्यान
वसंता - स्वामी माझ्या लिखाणाविषयी सांगा.
स्वामी - तू म्हणजे सर्वांचे सुवर्णात परिवर्तन करणारा किमयागारांचा परीस आहेस. तू मूळ धातूचेच सुवर्णात रूपांतर करतेस. लोहयुगाचे सुवर्णयुगात होत आहे.
वसंता - मी डॉक्टरकडे जाणार नाही. तुम्हीच मला बरं करा.
स्वामी - तू स्वतःच सर्व काही करशील. तू धन्वंतरी आहेस.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा