गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "


सहस्रार


            जेव्हा पाकळ्या उमलतात तेव्हा सहस्रार उघडते. स्वामी म्हणाले," तू कशाला स्पर्श करत नाहीस आणि कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही." स्वयंप्रकाशी ज्योती पाकळ्यांना स्पर्श करत नाही. या जगात मला कशाचेही बंधन नाही. मला कुठल्याही आवडी निवडी नाहीत. त्यामुळे हा 'मी' कशालाही अथवा कोणालाही स्पर्श करत नाही. जगातील घटना मला स्पर्श करत नाहीत अथवा मला बाधा आणत नाहीत. काहीही आणि कोणीही मला स्पर्श करू शकत नाही. हीच 'मी विना मी' ची स्थिती आहे. ही आहे निर्विचार, निरिच्छ अवस्था, स्वयंप्रकाशित प्रेमाची अवस्था. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " जसे भाव तसे जीवन. "


सहस्रार


            ज्याच्यामध्ये अहंकार नाही, तिथे पाकळ्याच नसतात. फक्त प्रकाश उजळेल. पाकळ्यांचा अभाव हे इच्छा, आवडीनिवडी नसण्याचे निदर्शन करते. जिथे अहंकारच नाही, तिथे इच्छा कशा असतील ? या अवस्थेत 'मी आणि माझे ' नसते. फक्त परमेश्वर, तेजोगोल असतो. तो वर वर सरकतो, सहस्त्रार उघडून अत्युच्च पातळीवर जातो. तो स्वयंप्रकाशी ताऱ्यांसारखा असतो. तो कशालाही स्पर्श न करता स्वयंप्रकाशी ज्योती स्वरूपात राहतो.
            पाकळ्या हे मनातील विचार आणि इच्छांचे प्रतिनिधित्व करतात. निरिच्छ, निर्विकार असणे म्हणजेच निस्वार्थी किंवा निहंकारी अवस्था. हे पूर्णपणे फुललेलं मन, पूर्ण उमललेलं कमळ आहे. यालाच म्हणतात सहस्त्रार उघडणे. जेव्हा कमल बंद असते, तेव्हा पाकळ्या प्रकाशाला भिडतात.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग
 

अनुक्रमणिका

 
भाग पहिला -  ऋग्वेद
 
१) सर्वसंगपरित्याग -  भेट प्रेमाची
२) कुमारीपासून ते कुबेरापर्यंत
३) सर्वधर्मान परित्यज्य
४) स्वप्न सत्यात उतरले
५) गुरु पौर्णिमा
६) भरभरून आशीर्वाद
७) जीवन हीच गीता
८) कल्पना?  नाही, भाव!
९) सत्य -  मिथ्या
१०) सूक्ष्म साई  वा स्थूल साई
११) राधेचा महिमा
१२) परमदाता परमेश्वर
१३) उटी वा वृंदावन ?
१४) पिशाच्च योनीचा उद्धार
१५) वाढदिवस म्हणजे काय?
१६) असीम प्रेम
१७) प्रभूची अंगठी व रुमाल?
१८) चित्र!
१९) प्रत्येक कुटुंबातून एक
२०) नववेद
 
 
भाग दुसरा - यजुर्वेद
 
अवताराचे रहस्य - एक

भाग तिसरा - सामवेद 

१) अवताराची रहस्य - दोन
२) पुसून न टाकता येणारे संस्कार.
३) अमृत कलश
४) लाल कमळ
५) पारिजात
६) प्रेमाचा छंद
७) सर्वव्यापी ब्रम्हाची संकेत
८) प्रेमाचे केंद्र
९) प्रदीप्त कर्पूरासम
१०) आत्मसंन्यास
११) सीमोल्लंघन
१२) तुळशीचा गंध
१३) ज्ञानाचे फळ
१४) मुक्तीचे अनेक प्रकार
१५) पूर्ण
१६) संपूर्ण
१७) वैकुंठ
१८) पृथ्वीसुद्धा चष्मा घालते
१९) वृंदावनमधील दिव्य बालक
२०) त्यागाचे पुष्प
२१) परिपूर्ण - परम ज्ञान
२२) आत्म - निवेदन
२३) स्पष्टीकरण कोश


या पुस्तकामध्ये जेथे जेथे स्वामींचा संदर्भ आला आहे, ते लेखिकेला आलेले ध्यानावस्थेतील अनुभव आहेत.



उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार  

" परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेम हा मार्ग आहे. "


सहस्रार


             ज्यांनी तपश्चर्येनी आध्यात्मिक शक्ती प्राप्त केली आहे, त्यांच्या मनातील अगदी पुसटसादेखील वाईट विचार त्यांच्या अधोगतीचे कारण होऊ शकतो. एखादी व्यक्ती कदाचित तपश्चर्येची शक्ती प्राप्त करेल. पण जर त्याला अहंकार असेल तर तो त्याची तपश्चर्येची शक्ती खेचून घेईल आणि त्याचा अहंकार अधिक शक्तिशाली होत जाईल. त्यामुळे त्याची अधोगती होते. हीच स्थिती असते ' योगभ्रष्टा ' ची. साधनेमुळे तपश्चर्येची शक्ती फक्त वाढतच असते. तरीसुद्धा आपण तिकडे आकर्षिले जाता कामा नये. आत्म- परीक्षण आणि विवेकाचा मार्गावरील आपला प्रवास चालू ठेवावा. कुठल्याही वाईट विचारांचा लवलेशही असू नये.

           

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "


सहस्रार


            जर या इच्छा जागृत झाला तर या लहान ' मी '(अहंकार) च्या पाकळ्या कमळाच्या मध्यभागी असणाऱ्या आत्मज्योतीला म्हणजे मोठ्या ' मी' ला स्पर्श करतात. जेव्हा या पाकळ्या छोट्या ज्योतीला स्पर्श करतात, तेव्हा त्या प्रकाशाची शक्ती पाकळ्यांमध्ये येते व वानसारुपी पाकळ्यांची शक्ती वाढते.
            उदाहरणार्थ, रावणाने कठोर तपश्चर्या केली. आत्म्याचा प्रकाश वर  वर सरकू लागला. तपश्चर्याने शंकराला प्रसन्न करण्यासाठी, रावणानी एक एक करून आपली डोकी कापली. त्याची शक्ती इतकी वाढली की संपूर्ण कैलास हादरून गेले.
            रावणाच्या मनात वासना जागृत झाली. त्याच्या मनात सीतेला पळवण्याचा विचार आला. हा विचार कमळाच्या मध्यभागी असलेल्या आत्मज्योतीला  भिडला; विचाररुपी पाकळी मध्ये खूप शक्ती आली. या पाकळीने रावणाची संपूर्ण तपश्चर्या शोषून घेतली. त्याची वासना वृद्धिंगत झाली. त्याने परमेश्वराच्या पत्नीला पळवण्याचे धाडस केले! लबाडी आणि फसवणूक करून त्याने दिव्यमातेला पळवले. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण राक्षस कुळाचा नाश झाला.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " मधुर बोला, मधुर वागा. केवळ तोंडाने नव्हे तर अंतःकरणापासून ! "


सहस्रार

 

            सहस्त्र पाकळ्यांचे कमळ म्हणजेच माणसाच्या अनेक  वासना. उदाहरणार्थ, लालसा, परंपरा, सवयी आणि अतृप्त इच्छा. कमळाच्या मध्यभागी असलेला प्रकाश म्हणजेच आत्मज्योत. नारायणसूक्तात म्हटले आहे की हा निळा प्रकाश अगदी तांदळाच्या दाण्याचा अग्राइतका सूक्ष्म असतो. हाच आहे सर्वांत सर्वांतर्यामी आत्मा. या आत्मप्रकाशाला कशाचा स्पर्श होता कामा नये. तो अस्थिर नसून स्थिर असावा.
           आत्मा म्हणजे अंतर्यामी स्थिती 'मी'.ह्या  'मी' ला आपल्या नावारूपाशी जोडणाऱ्या 'मी' चा स्पर्श होता कामा नये. सहस्त्र पाकळ्यांचे कमळ हे नावारूपाने जोडल्या जाणाऱ्या देहाचे निदर्शन करते. सहस्त्र पाकळ्या म्हणजेच ह्या  'मी' च्या आवडीनिवडी. हा 'मी' ही एक  विचारांची प्रक्रिया आहे. ती ठामपणे सांगते, ' हे नाव-रूप म्हणजे 'मी' आहे. मला पत्नी, तीन मुले आहेत. हे माझं घर आहे. मला बढती मिळायला हवी. माझ्या मुलीचं लग्न व्हायला हवं. मी माझ्या शेजाऱ्याला मदत करायला नको.... वगैरे, वगैरे.' कमळाची प्रत्येक पाकळी ही आपल्या आवडीनिवडी आणि अतृप्त इच्छांची संबंध जोडते.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " तुम्ही जेथे आहात आणि जे काही करत आहात ते कार्य परमेश्वराची पूजा समजून करा. "


कर्माचा हिशोब मिटला  

 

             माझी स्थिती यापेक्षा निराळी आहे. मला कुठल्याही मर्यादा नाही. माझ्यावर बंधने घालणारी संघटना नाही. मला अडथळे आणणारी कुंपणे नाहीत, ना कायदे, ना नियम, ना ही धर्मग्रंथांच्या किंवा धर्माच्या आज्ञा पाळणे. मी सर्व धर्मांपासून मला मुक्त केले आहे. या अवतारावर असलेल्या माझ्या प्रेमामुळेच मी स्वतःला सर्व धर्मांपासून मुक्त करू शकले. या प्रेमशक्तीमुळेच मी कर्माचा हिशोब बंद करू शकले. विश्वमुक्ती हेच माझं ध्येय आहे आणि ते मी साध्य करणारच.  

 


सहस्रार

 

            ' शिव शक्ती स्वरूप ' या पुस्तकात स्वामी म्हणाले,
             मन हे सहस्त्र पाकळ्यांच्या कमळासारखा आहे. त्याची प्रत्येक पाकळी ही एका विशिष्ट हेतू अथवा इच्छेकडे व,ळलेली असते. या कमळाच्या मध्यभागी असलेली ज्योत ' अहं '  च्या एका विशिष्ट हेतू किंवा इच्छेने प्रेरित अशा एखाद्या पाकळीकडे  कलते, तेव्हा ती यश-अपयश, सुख-दुःख अशा द्वैतभावनांच्या प्रभावाखाली जाते. पण जर ज्योत १000 इच्छांकडे न कलता  स्थिर आणि उर्ध्वगामी राहिली तर ती देहापासून दूर राहते. माणसाचा देह, मन अथवा अंतर्बाह्य इंद्रियांवर परिणाम झाला तरी ती ज्योत अबाधित राहते.
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग
 

समर्पण

 
            तुम्ही या पुस्तकाचे वाचन सुरू करण्यापूर्व, भगवान श्री श्री श्री सत्यसाई बाबांच्या चरण कमलांशी मी अत्यंत कृतज्ञता समर्पित करते, ज्यांनी मला आणि समस्त विश्वाला त्यांचे स्तवन करण्याचे महद् भाग्य प्रदान केले. त्यांचे स्तवन करण्यासाठी माझी काय पात्रता आहे? मी अत्यंत प्रेमपूर्वक आणि विनयपूर्वक हे पुस्तक त्यांना समर्पित करते.

देवांचे देव महादेव चिरायु होवोत
त्यांचा तेजोमय किरीट
चिरायु होवो
त्यांचे करुणाघन लोचन
चिरायु होवोत
त्यांचे मधुर, प्रेमळ बोल
चिरायु होवोत
दीनजनांना सांत्वना देणारी त्यांची कृपा चिरायु होवो
चंदेरी घंटानादासम त्यांचा कोमल आवाज
चिरायु होवो
सकलजनांचे रक्षण करणारे त्यांचे पावन
चिरायु होवोत
सकलजनांना आसरा देणारे त्यांचे सुवर्ण चरण चिरायु होवोत
त्यांचा सत्याचा मार्ग चिरायु होवो
साक्षात परब्रम्ह प्रभू
चिरायु होवोत
माझे प्रभु
चिरायु होवोत

वसंत साई

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "


कर्माचा हिशोब मिटला  

 

             म्हणूनच मी सर्वांसाठी मुक्ती मागितली. मी म्हणाले, " लोकांची कितीही कर्म असोत, कितीही भयंकर पापे असोत, तरीसुद्धा सर्वांना मुक्ती मिळावी." स्वामी परमेश्वराच्या अवस्थेत आहेत. मी त्यांच्यापासून अलग होऊन एका भक्ताच्या स्वरूपात आहे. त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी मी भक्तिमार्गाचा अवलंब करून तपश्च्रर्या करते आहे. फक्त एका व्यक्तीची भक्ती संपूर्ण जगाची कर्म कशी नाहीशी करू शकते हे मी माझ्या जीवनाद्वारे दाखवते आहे. अवतार अवतरतो, त्यांचं कार्य करतो आणि या धरतीचा निरोप घेतो. राम आणि कृष्ण राजा म्हणून आले. आता स्वामी राज म्हणून आले नाहीत, कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. ते प्रश्नांना उत्तरे देतात, आपल्या समस्या सोडवतात, सर्वांना ज्ञान देतात. ते सामान्य लोकांमध्ये मुक्तपणे वावरतात.
           तरीसुद्धा, त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्यांनी त्यांच्यावर काही बंधने घातली असावीत असे दिसते. स्वामी त्यांना या मायाजालात ठेवताहेत.    

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " जसे भाव तसे जीवन. "


कर्माचा हिशोब मिटला  

२५ जुलै २००७
           आधीच्या प्रकरणात मी स्वामींना विचारले, " तुम्ही मला दात द्याल का ?" ते म्हणाले की ते देतील, पण कधी ते सांगितले नाही. ते म्हणतात, " मी मला अलग केले." जर त्यांनी स्वतःस विभाजित करून मला निर्माण केले तर मग मी त्यांच्यासारखी असायला हवे. दात कधी येतील हे मला का माहीत नाही ? ते येतील की नाही येणार ? मला का बरं माहीत नाही ? जर स्वामींना ठाऊक आहे तर मग मला का नाही ? कारण, मला जर कळले तर मी साक्षी अवस्थेत आहे असा अर्थ होईल. मी साक्षी अवस्थेत राहू शकत नाही. तो माझा स्वभाव नाही.
            एकदा एक श्रीमंत जोडपे आपल्या एकुलत्या एका आंधळ्या मुलाला स्वामींकडे घेऊन आले. अश्रू ढाळत त्यांनी स्वामींना, मुलाला दृष्टी द्यावी यासाठी प्रार्थना केली. स्वामींनी त्यांना सांगितले की ह्या मुलाने मागच्या जन्मी एका माणसाला दोन्ही डोळ्यांनी आंधळे केले म्हणून तो या जन्मी स्वतः आंधळा झाला आहे. स्वामींनी त्यांनाच विचारले, " मी काय करू मला सांगा. तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ?" अशाप्रकारे स्वामींनी त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवले. स्वामींप्रमाणे जर मला हे सर्व कळत असतं तर मी त्यांच्यासारखीच राहिले असते का ? नाही. हा माझा स्वभाव नाही.    

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम