रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " सर्वांना प्रेम द्या परंतु कोणत्याही एका व्यक्तीप्रती अधिक प्रेम प्रदर्शित करू नका. "


सहस्रार


            जर या इच्छा जागृत झाला तर या लहान ' मी '(अहंकार) च्या पाकळ्या कमळाच्या मध्यभागी असणाऱ्या आत्मज्योतीला म्हणजे मोठ्या ' मी' ला स्पर्श करतात. जेव्हा या पाकळ्या छोट्या ज्योतीला स्पर्श करतात, तेव्हा त्या प्रकाशाची शक्ती पाकळ्यांमध्ये येते व वानसारुपी पाकळ्यांची शक्ती वाढते.
            उदाहरणार्थ, रावणाने कठोर तपश्चर्या केली. आत्म्याचा प्रकाश वर  वर सरकू लागला. तपश्चर्याने शंकराला प्रसन्न करण्यासाठी, रावणानी एक एक करून आपली डोकी कापली. त्याची शक्ती इतकी वाढली की संपूर्ण कैलास हादरून गेले.
            रावणाच्या मनात वासना जागृत झाली. त्याच्या मनात सीतेला पळवण्याचा विचार आला. हा विचार कमळाच्या मध्यभागी असलेल्या आत्मज्योतीला  भिडला; विचाररुपी पाकळी मध्ये खूप शक्ती आली. या पाकळीने रावणाची संपूर्ण तपश्चर्या शोषून घेतली. त्याची वासना वृद्धिंगत झाली. त्याने परमेश्वराच्या पत्नीला पळवण्याचे धाडस केले! लबाडी आणि फसवणूक करून त्याने दिव्यमातेला पळवले. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण राक्षस कुळाचा नाश झाला.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा