गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       " मधुर बोला, मधुर वागा. केवळ तोंडाने नव्हे तर अंतःकरणापासून ! "


सहस्रार

 

            सहस्त्र पाकळ्यांचे कमळ म्हणजेच माणसाच्या अनेक  वासना. उदाहरणार्थ, लालसा, परंपरा, सवयी आणि अतृप्त इच्छा. कमळाच्या मध्यभागी असलेला प्रकाश म्हणजेच आत्मज्योत. नारायणसूक्तात म्हटले आहे की हा निळा प्रकाश अगदी तांदळाच्या दाण्याचा अग्राइतका सूक्ष्म असतो. हाच आहे सर्वांत सर्वांतर्यामी आत्मा. या आत्मप्रकाशाला कशाचा स्पर्श होता कामा नये. तो अस्थिर नसून स्थिर असावा.
           आत्मा म्हणजे अंतर्यामी स्थिती 'मी'.ह्या  'मी' ला आपल्या नावारूपाशी जोडणाऱ्या 'मी' चा स्पर्श होता कामा नये. सहस्त्र पाकळ्यांचे कमळ हे नावारूपाने जोडल्या जाणाऱ्या देहाचे निदर्शन करते. सहस्त्र पाकळ्या म्हणजेच ह्या  'मी' च्या आवडीनिवडी. हा 'मी' ही एक  विचारांची प्रक्रिया आहे. ती ठामपणे सांगते, ' हे नाव-रूप म्हणजे 'मी' आहे. मला पत्नी, तीन मुले आहेत. हे माझं घर आहे. मला बढती मिळायला हवी. माझ्या मुलीचं लग्न व्हायला हवं. मी माझ्या शेजाऱ्याला मदत करायला नको.... वगैरे, वगैरे.' कमळाची प्रत्येक पाकळी ही आपल्या आवडीनिवडी आणि अतृप्त इच्छांची संबंध जोडते.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा