रविवार, २८ जुलै, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

     " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."


११ 

गुप्तभाव

           आता स्वामींनी त्याचं कारण सांगितलं आणि मला याविषयी लिहिण्यास सांगितलं. कलियुगात अवतार अवतरतो, तेव्हा त्याला अनेक कृती गुप्तपणे करणे भाग असतं, म्हणूनच कलियुगात अवतार येत नाहीत.
            प्रथम, त्यांनी मला प्रशांति निलयम सोडायला लावले. त्यानंतर मला सांगण्यात आले,' यापुढे पुस्तके लिहू नका. स्वामींचे नाव तुमच्याशी जोडू नका.' अनेकांनी माझ्या पुस्तकांमध्ये चुका काढल्या. मी काय करू? लिहू नको का? या सर्व गोष्टींचा मला खूप मनस्ताप होतो. मी इथे जन्माला का आले?' मी परमेश्वराची प्राप्ती करणारच' फक्त हा एक विचार घेऊन मी जन्माला आले. जशी मी मोठी होत गेले, तसा हा विचार एकमेव ध्येय झाला. परमेश्वराने स्वतः सांगितले की ते पुट्टपर्तीत आहेत. मी कोण आहे आणि आमचं नातं काय हे त्यांनी सांगितलं. त्यांनी मला पुस्तके लिहिण्यास सांगितले. स्वामी आणि मी, आमच्यातील शाश्वत नातं अनेक नाडी ग्रंथांनी प्रकट केले आहे. त्या सर्वांनी सांगितले आहे की माझा जन्म हा फक्त अवतारकार्यासाठी आहे.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २५ जुलै, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

     " निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते."


११ 

गुप्तभाव

           स्वामींनी नंतर मला गुरुपौर्णिमेसाठी पुट्टपर्तीला बोलवले, परंतु प्रशांति निलयममध्ये नाही. शेवटच्या दिवशी त्यांनी मला आश्रमात दर्शनासाठी येण्यास सांगितले आणि म्हणाले हे 'अदृश्यरुपात' होते. मी हे एका प्रकरणात लिहिले आहे. मी त्यांच्या दर्शनासाठी खूप रडले. त्यानंतर त्यांनी मला माझ्या वाढदिवसासाठी बोलवले. मी यावेळी त्यांना अजिबात पाहिले नाही. परंतु माझा वाढदिवसाला अनेक दूतांमार्फत त्यांनी माझे सांत्वन केले. अनेक वस्तूंना त्यांनी उघडपणे आशीर्वाद दिले. मला खूप आनंद झाला. प्रत्येक वेळी ते मला येण्यास सांगतात, पण आश्रमात बोलवत नाहीत. लोक कदाचित विचारतील, तरीसुद्धा तुम्ही पुट्टपर्तीला कसं काय जाता? दुसरा कोणीही असं जाणार नाही.' मला वाटते ते पूर्ण अवतार आहेत, त्यांच्या प्रत्येक कृतीला काहीतरी विशेष कारण असते. म्हणून मी नेहमीच येत राहीन.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

मंगळवार, २३ जुलै, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
             मदुराईच्या एका भक्ताच्या घरामध्ये स्वामींचे चमत्कार होत असत, एके दिवशी ते फक्त मला त्यांच्या घरी घेऊन गेले. तेथे मी स्वामींकडे मंगळसूत्र मागितले. स्वामींनी विभूती, कुंकू आणि अक्षता दिल्या व ते म्हणाले," आता नाही." दुसऱ्या एका भक्तांच्या घरात अनेक चमत्कार होत असत. तेथे अनेक वस्तू साक्षात होत असत. तेथेही मी मांगल्याच्या अपेक्षेने गेले होते. हे प्रसंग माझ्या मनात घोळत असताना मदुराईच्या एका भक्ताचा मला फोन आला ते म्हणाले," अम्मा स्वामींनी सामुदायिक विवाहांसाठी पाच मंगळसूत्र दिली आहेत व त्यांची सर्व व्यवस्था करायची आहे. विवाह समारंभ वडक्कमपट्टीमध्ये आयोजित करावा असा मी विचार करतो आहे तुम्ही यावर विचार करा आणि मला कळवा."
             संध्याकाळच्या ध्याना अगोदर माझ्या अवस्थेमध्ये एक मोठा बदल घडल्याचे मला जाणवले. मी विलाफ करत होते," स्वामी, स्वामी.... माझे दुर्गे मध्ये रूपांतर करा. मला सर्वांचा उद्धार करायचा आहे मला अधिक शक्ती प्रदान करा!"
स्वामी-  आता तू हे सर्व विसर. जग, जगातील लोकांच्या समस्या सारं काही विसर आणि माझ्याबरोबर गोकुळात चल.
वसंता- नाही स्वामी मला एकटीला कोणताही आनंद नको सर्वांना दिव्य आनंद मिळायला हवा.
स्वामी-  थोड्या वेळासाठी हे सार तू विसर. रडू नकोस. दिव्य आनंदाची अनुभूती घे.
वसंता- नाही स्वामी जर मी एकटीच हा आनंद लुटत असेन तर मी एखाद्या चोरीच्या मालमत्तेचा आनंद लुटण्यासारखे आहे आणि मला तसे नको आहे. जगातील प्रत्येकाला तो आनंद मिळायला हवा. तोपर्यंत मलाही आनंद नको. जगातील सर्व समस्यांचा त्रासाचा अंत झाला पाहिजे जर तुमच्या या अत्यंत करुणाघन अवतार काळात लोकांना मुक्ती मिळाली नाही तर त्यांना कशी आणि कोण मुक्ती प्रदान करणार?
            स्वामींनी माझा हात धरून ओढले आणि ते मला राधेच्या घरामध्ये घेऊन गेले.


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २१ जुलै, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

        " निर्मल हृदय स्वछ आरशासारखे प्रतिबिंबित होते."


११ 

गुप्तभाव

           पूर्वीच्या अवतारांचे जीवन कथांप्रमाणे आहे. त्यांच्या जीवनातील घटना तिसरी व्यक्ती कथेच्या रूपात नमूद करते. मी आमचे भाव संभाषण स्वरूपात लिहिते. हा अवतार त्याचे भाव व्यक्त करण्यासाठी आला आहे. उपनिषद हे गुरु- शिष्याचे संभाषणस्वरूप आहे.  मी अवताराच्या त्रुटींविषयी लिहिले. या सर्व अवतारांमध्ये त्रुटी का बरे दिसतात? अवताराचे मूळ कोणते? त्याच्या नावारूपामागचे कारण काय? अवताराचे स्वरूप कोणते?  त्यांचे भाव काय आणि त्यांच्या कुटुंबांचे कारण काय?
            या सर्व प्रश्नांबद्दल मी लिहिते आहे. सत्ययुग कसे येते आणि कर्मकायदा कसा कार्यरत होतो हे मी सांगते आहे. माझ्या अश्रूंवाटे  मी स्वामींकडून अनेक उच्चस्तरीय सत्ये समजून घेत आहे. ह्या सत्यांची गुपिते आजपर्यंत जगासमोर आणली गेली नव्हती. ही गुपिते प्रकट झाली ती आमच्या ध्यानातील संभाषणांद्वारे, ती काही कथा स्वरूपात नव्हेत; मी आमचे भाव लिहून व्यक्त करते. जरी स्वामी जे काही सांगतात तेच मी लिहिते, तरीसुद्धा मी जे लिहिले ते बरोबर आहे का याबद्दल मी नेहमीच सांशक असते. खरंच का हे सर्व स्वामी मला सांगताहेत, की त्यात काही माझ्या मनाची खेळही आहेत? मला याची नेहमीच भीती वाटत असते, म्हणूनच स्वामी सर्व पत्रे पुस्तकांची प्रकरणी आणि पुस्तक स्विकार करून त्याची सत्यता पटवून देतात.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


गुरुपौर्णिमा संदेश


कर्तव्यं हाच परमेश्वर - कर्म हीच भक्ती



            जर आपण आपली लहान मोठी सर्व कर्मं  परिपूर्णतेने केली तर सामान्य कर्मं भक्तीमध्ये परिवर्तित होतात. जेव्हा आपण आपली सर्व कर्मं या पद्धतीने परमेश्वराला समर्पित  करतो तेव्हा ती सामान्य कर्मं कर्मयोग बनतात. मी माझ्या 'साई गीता प्रवचनम' या पुस्तकातील 'कर्मयोग' या प्रकरणांमध्ये,  सकाळपासून रात्रीपर्यंत मी माझे प्रत्येक कर्म कशाप्रकारे करते याविषयी सविस्तर लिहिले आहे.
              जर आपण घरामधील आपली सर्व कर्मं परमेश्वराप्रीत्यर्थ केली  तर ते परमेश्वराच्या चरणावरील एक पुष्प बनते.  तुम्ही तुमच्या मुलाला दूध पाजताना वा खाऊ घालताना जर त्याला परमेश्वर समजून खाऊ घातलेत तर या भावनेने तुम्ही यशोदा आणि तो बाळकृष्ण व्हाल. अधून मधून तुम्ही मंदिरात जाता परमेश्वराला भक्ती, सेवा अर्पण करता परंतु तीच संधी  दररोज तुमच्या घरामध्ये  तुम्हाला उपलब्ध आहे. स्वामींचे स्तुतीस्तवन करणारी हजारो गीतं मी रचली आहेत त्यातील एक खाली देत आहे.

परमेश्वराचे साम्राज्य पाहते
मी सर्वत्र
कृपा तयांची पाहते मी कोसळणाऱ्या जलप्रपातात
केवळ त्यातच नव्हे तर पाहते
जलाच्या प्रत्येक थेंबात
या जलाविना जीवन आपले मृतवत
परमेश्वराची कृपा दर्शवतो उगवता सूर्य
कृपेविना तयाच्या नाही होत सूर्योदय
रात्र सरुनी होतो सूर्याचा उदय
सूर्याविना आपण सुस्त निष्क्रिय
कृतज्ञता करू अर्पित  त्याप्रती सुप्रभातीसी अन ......
निरंतर समर्पित करू भक्ती त्या दिनकरासी
शीतल मंद झुळुकी स्मरण देती मज त्याच्या स्पर्शाचे
मधूचा स्वाद जणु माधुर्य परमेश्वराचे
अवखळ वासरू देई बाळकृष्णाचा आनंद मज
वायुही दर्शवी कृपा तयांची मज
वायुविना जगावे कसे जीवन
हंबरुनी धेनु साद घालिते वत्सास
साद ऐकुनी स्मरते मी परमेश्वराच्या मातृभावास
जे साद घालिती तिज व्याकुळ होऊनी
प्रभू परमेश


जय साईराम

गुरुवार, १८ जुलै, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये प्रतिबिंबित होते."


११ 

गुप्तभाव

           आता मला कळते आहे की स्वामी व्हाईटफिल्डला का गेले आणि त्यांनी मला तिथे का बोलवले. सरळ पुट्टपर्तीला  मला बोलवण्याची ती वेळ योग्य नव्हती. त्यांनी बंगळूरला जाऊन मला तिथे बोलवले. एका बाजूस स्वामी मला बोलवण्याच्या योग्य वेळेची वाट पहात आहेत आणि दुसऱ्या बाजूस ते माझे अश्रू आणि माझा ध्यास सहन करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांनी पुट्टपर्ती सोडले आणि मला दर्शन दिले.
             मी आत जाऊ शकत नाही, तोपर्यंत स्वामी बाहेर येऊन मला दर्शन देतील. हे कलियुगाचे स्वरूप आहे. म्हणूनच या युगात अवतार अवतरत नाहीत. जर ते अवतरले तर त्यांच्या कृती युग प्रतिबिंबित करतात.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, १४ जुलै, २०२४

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो. "


११ 

गुप्तभाव

            त्यांनी अजूनही बरीच काही लिहिले होते. हे पत्र प्रशांति निलयममधील पत्रपेटीत टाकले होते. त्यावेळी मी स्वामींच्या दर्शनाच्या   ध्यासानी आणि रडत होते. मला प्रशांति निलयममध्ये जाण्यास बंदी घालण्यापूर्वी मी दर दोन महिन्यांनी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. आता सर्व बंद झाल्यामुळे मला खूप यातना होत आहेत. गेल्या वर्षी स्वामी म्हणाले," आपण २७ मे ला भेटू." मी स्वामींना विचारले," मी तुमचे पुट्टपर्तीत दर्शन कसे घेणार? ते मला अडवतील."

             मी स्वामींच्या दर्शनाशिवाय कशी जगणार? मी अजूनच रडले. मग मी एसव्ही आणि एडींना पुट्टपर्तीला पाठवले. त्यांनी नवीन साडी, मंगळसूत्र आणि जोडवी स्वामींचे  आशीर्वाद घेण्यासाठी खरेदी केले. ते इथून ता. २० ला निघाले आणि ता. २१ मे ला बंगळूरला पोहोचले. ते पुट्टपर्तीच्या बसची वाट पहात होते. इतक्यात मला स्वामी व्हाईटफिल्डसाठी  निघाले हे सांगणारे अनेक फोन आले. मी लगेच एसव्ही आणि एडींना फोन केला आणि त्यांना पुट्टपर्तीला ना जाता व्हाईटफिल्डला जाण्यास सांगितले. त्याच दरम्यान स्वामींनी 'ब्रह्मसूत्र' हे पुस्तक घेतले. मीसुद्धा जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी प्रथमच मी स्वामींना सात महिन्यानंतर पहात होते. त्यांचे दर्शन झाले तेव्हा तेही रडले आणि मीसुद्धा. याविषयी मी 'शिवसूत्र' पुस्तकात लिहिले आहे.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ११ जुलै, २०२४

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर, ते मन आणि ती गोष्ट एक होऊन जाते. परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते. "


११ 

गुप्तभाव

             स्वामींनी माझं सांत्वन केलं. म्हणाले, "अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर त्याच्या नातेवाईकांना पाहिले आणि युद्धास नकार दिला. तो म्हणाला,' माझ्या नातेवाईकांना मारून मिळणारा विजय मला नको.' अर्जुनाने गांडीव खाली ठेवले. अर्जुनासारखेच तुझे भाव आहेत; तुला वाटते की ज्यांनी तुला त्रास दिला ते माझे आहेत. तू लिहू शकत नाहीस. तू तुझे गांडीव, पेन फेकून दिलेस. तू लिही.  जे घडलं ते सर्व लिही. तरच तुझे भाव शांत होतील. तुझं गांडीव तुझ्या हातात घे."

             त्यानंतरच मी माझं पेन घेऊन लिहायला लागले. मी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक दूत पाठवले. स्वामींनी स्वतःच्या हातानी पत्र लिहिले आणि मला पाठवले. पत्रात त्यांनी पुढील मजकूर अधोरेखित केला होता. " काही मित्र मला गुलाम बनवू पहात आहेत. परंतु मला जे करायला हवे ते मी करीनच. "

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ७ जुलै, २०२४

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "


११ 

गुप्तभाव

             माझ्या वाढदिवशी ' भगवंताचे अखेरचे सात दिवस ' हे पुस्तक स्वामींनी घेतल्यानंतर मला प्रशांति निलयममध्ये बंदी घातली गेली. माझ्या अश्रूंचा बांध फुटला आणि मी माझी पेन फेकून दिले. थोड्याच दिवसात एक दुत आले. त्यांनी इथेच या क्षणी मुक्ती या माझ्या पुस्तकाची प्रत दाखवली आणि माझ्याशी तेलगूमध्ये बोलले. त्यांनी पुस्तक २२ नोव्हेंबर २००७ ला खरेदी केले होते, ती तारीखही दाखवली. मग त्यांनी मला पुट्टपर्तीला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले आणि म्हणाले," तुम्ही आलात की मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन." ते ७ वा. आले आणि ७:३० वा. परत गेले. त्यांचे नाव राजय्या असे होते. दोन दिवसानंतर पुट्टपर्तीहून सेवादलाचे एक गृहस्थ आले. त्यांना बरीच त्रास आहेत असे ते सांगत होते. कोणीतरी त्यांना म्हणाले,' तुम्ही खूप वृद्ध झाला आहात, आता तुम्ही सेवा करू नका.' त्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवले आणि म्हणाले की त्यांना प्रशांति निलयमशिवाय आयुष्यात दुसरे काहीच माहित नाही. ते आले, बोलले, जेवले आणि गेले. ते म्हणाले," मी सरळ प्रशांति निलयमहून आलो आणि परत तिथे जाणार.' अशाप्रकारे अनेक दूत आले.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




गुरुवार, ४ जुलै, २०२४

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."


११ 

गुप्तभाव

१३ फेब्रुवारी २००९ ध्यान.
वसंता- स्वामी, मला उद्या तुमचं दर्शन होईल का?
स्वामी- नक्कीच होईल, तू ये.
वसंता- तुम्ही म्हणालात की आपलं जीवन शारीरिक देहातील नाही. त्यामुळे मला माझे भाव व्यक्त करायची भीती वाटते.
स्वामी- हे भाव शारीरिक देहाच्याही पलीकडचे आहेत. तुझा स्वभाव आहे तसाच राहील. पूर्वीच्या अवतारांचे जीवन हे कथांसारखे आहे. कारण त्यात त्रयस्थ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील घटना सांगते. आपलं जीवन हे 'शारीरिक जीवन नव्हे तर भावजीवन आहे.' तेच तू लिहिलेलं संभाषणाचे रूप होते. आपण आपले भाव व्यक्त करतो. सर्वांना कळावे म्हणून तू स्वतःचे भाव व्यक्त करतेस. पुढील अवतारात आपण अनुभव घेऊ. अनुभव घेणे याचाच अर्थ शारीरिक जीवन.
वसंता - स्वामी, मला उद्या तुमचं दर्शन होईल का?
स्वामी - आपण नक्कीच एकमेकांना पाहू, तू ये .....तू माझ्या मागे ये.
वसंता- आपण एकमेकांना असे लपत शपथ का भेटतो?
स्वामी- हाच कलियुगातील अवतारांचा स्वभाव आहे. इथे गुपित आहे, अनेक गोष्टी गुप्त आहेत. गुप्तदूतांद्वारे मी तुझी पुस्तके आणि पत्रे घेतो. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला जगासमोर आणीन. आता वियोग असह्य होऊन तू रडतेस म्हणून तुझं सांत्वन करण्यासाठी मी कित्येक गोष्टी करतो. योग्य वेळ येईपर्यंत आपलं जीवन हे असंच असेल.
वसंता- म्हणूनच का तुम्ही मला पूर्वी सांगितलेलं होतं की अवतार कलियुगात अवतरत नाहीत ?
स्वामी - होय, म्हणूनच आपल्याला इथे इतका त्रास होतो आहे. गेल्या २७  मे ला मी व्हाईटफील्डला आलो आणि म्हणालो, मी तुला इथे भेटेन.
वसंता- स्वामी, मला तुमच्या मागे यायला भीती वाटते. कोणापासून त्रास होऊ नये.
स्वामी - तुला यायला सांगतो आहे...... कोणीही तुला त्रास देणार नाही.
वसंता- स्वामी, तुम्ही मला लिहिण्यास सांगत आहात..... पण हे सर्व कसं लिहू ?
स्वामी- तुला नेहमीच भीती वाटते आणि तू साशंक असतेस. म्हणून मी तुझी पत्र आणि पुस्तक घेऊन तुला दिलासा देतो.
वसंता - अवतार हे सर्व गुप्तपणे का बरं करतो?
स्वामी- कलियुग, अवताराचे हेच स्वरूप आहे. तू हे सर्व लिही. गुप्तदूत  पाठवणे, गुप्त संदेश, पत्रे पुस्तके घेणे- तुला जगासमोर आणण्याची वेळ येईपर्यंत हे सर्व गुप्तरितीने होत आहे. मला तुझे अश्रू पाहवत नाहीत म्हणून मी हे सर्व करतो. म्हणूनच तुझंच सांत्वन करण्यासाठी प्रत्येक वेळी मी तुला इथे बोलतो. तू इथे असतेस तेव्हा कित्येक जण येतात आणि तुला भेटतात, त्यामुळे तुझ्या मनाला काहीसा विरंगुळा मिळतो. तू त्यांच्याशी आनंदाने बोलतेस.
ध्यानाची समाप्ती.


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम