ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो. "
११
गुप्तभाव
त्यांनी अजूनही बरीच काही लिहिले होते. हे पत्र प्रशांति निलयममधील पत्रपेटीत टाकले होते. त्यावेळी मी स्वामींच्या दर्शनाच्या ध्यासानी आणि रडत होते. मला प्रशांति निलयममध्ये जाण्यास बंदी घालण्यापूर्वी मी दर दोन महिन्यांनी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. आता सर्व बंद झाल्यामुळे मला खूप यातना होत आहेत. गेल्या वर्षी स्वामी म्हणाले," आपण २७ मे ला भेटू." मी स्वामींना विचारले," मी तुमचे पुट्टपर्तीत दर्शन कसे घेणार? ते मला अडवतील."
मी स्वामींच्या दर्शनाशिवाय कशी जगणार? मी अजूनच रडले. मग मी एसव्ही आणि एडींना पुट्टपर्तीला पाठवले. त्यांनी नवीन साडी, मंगळसूत्र आणि जोडवी स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी खरेदी केले. ते इथून ता. २० ला निघाले आणि ता. २१ मे ला बंगळूरला पोहोचले. ते पुट्टपर्तीच्या बसची वाट पहात होते. इतक्यात मला स्वामी व्हाईटफिल्डसाठी निघाले हे सांगणारे अनेक फोन आले. मी लगेच एसव्ही आणि एडींना फोन केला आणि त्यांना पुट्टपर्तीला ना जाता व्हाईटफिल्डला जाण्यास सांगितले. त्याच दरम्यान स्वामींनी 'ब्रह्मसूत्र' हे पुस्तक घेतले. मीसुद्धा जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी प्रथमच मी स्वामींना सात महिन्यानंतर पहात होते. त्यांचे दर्शन झाले तेव्हा तेही रडले आणि मीसुद्धा. याविषयी मी 'शिवसूत्र' पुस्तकात लिहिले आहे.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा