ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
११
गुप्तभाव
१३ फेब्रुवारी २००९ ध्यान.
वसंता- स्वामी, मला उद्या तुमचं दर्शन होईल का?
स्वामी- नक्कीच होईल, तू ये.
वसंता- तुम्ही म्हणालात की आपलं जीवन शारीरिक देहातील नाही. त्यामुळे मला माझे भाव व्यक्त करायची भीती वाटते.
स्वामी- हे भाव शारीरिक देहाच्याही पलीकडचे आहेत. तुझा स्वभाव आहे तसाच राहील. पूर्वीच्या अवतारांचे जीवन हे कथांसारखे आहे. कारण त्यात त्रयस्थ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील घटना सांगते. आपलं जीवन हे 'शारीरिक जीवन नव्हे तर भावजीवन आहे.' तेच तू लिहिलेलं संभाषणाचे रूप होते. आपण आपले भाव व्यक्त करतो. सर्वांना कळावे म्हणून तू स्वतःचे भाव व्यक्त करतेस. पुढील अवतारात आपण अनुभव घेऊ. अनुभव घेणे याचाच अर्थ शारीरिक जीवन.
वसंता - स्वामी, मला उद्या तुमचं दर्शन होईल का?
स्वामी - आपण नक्कीच एकमेकांना पाहू, तू ये .....तू माझ्या मागे ये.
वसंता- आपण एकमेकांना असे लपत शपथ का भेटतो?
स्वामी- हाच कलियुगातील अवतारांचा स्वभाव आहे. इथे गुपित आहे, अनेक गोष्टी गुप्त आहेत. गुप्तदूतांद्वारे मी तुझी पुस्तके आणि पत्रे घेतो. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला जगासमोर आणीन. आता वियोग असह्य होऊन तू रडतेस म्हणून तुझं सांत्वन करण्यासाठी मी कित्येक गोष्टी करतो. योग्य वेळ येईपर्यंत आपलं जीवन हे असंच असेल.
वसंता- म्हणूनच का तुम्ही मला पूर्वी सांगितलेलं होतं की अवतार कलियुगात अवतरत नाहीत ?
स्वामी - होय, म्हणूनच आपल्याला इथे इतका त्रास होतो आहे. गेल्या २७ मे ला मी व्हाईटफील्डला आलो आणि म्हणालो, मी तुला इथे भेटेन.
वसंता- स्वामी, मला तुमच्या मागे यायला भीती वाटते. कोणापासून त्रास होऊ नये.
स्वामी - तुला यायला सांगतो आहे...... कोणीही तुला त्रास देणार नाही.
वसंता- स्वामी, तुम्ही मला लिहिण्यास सांगत आहात..... पण हे सर्व कसं लिहू ?
स्वामी- तुला नेहमीच भीती वाटते आणि तू साशंक असतेस. म्हणून मी तुझी पत्र आणि पुस्तक घेऊन तुला दिलासा देतो.
वसंता - अवतार हे सर्व गुप्तपणे का बरं करतो?
स्वामी- कलियुग, अवताराचे हेच स्वरूप आहे. तू हे सर्व लिही. गुप्तदूत पाठवणे, गुप्त संदेश, पत्रे पुस्तके घेणे- तुला जगासमोर आणण्याची वेळ येईपर्यंत हे सर्व गुप्तरितीने होत आहे. मला तुझे अश्रू पाहवत नाहीत म्हणून मी हे सर्व करतो. म्हणूनच तुझंच सांत्वन करण्यासाठी प्रत्येक वेळी मी तुला इथे बोलतो. तू इथे असतेस तेव्हा कित्येक जण येतात आणि तुला भेटतात, त्यामुळे तुझ्या मनाला काहीसा विरंगुळा मिळतो. तू त्यांच्याशी आनंदाने बोलतेस.
ध्यानाची समाप्ती.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा